एका नाटकाचे ५० रुपये घेणारे नाना पाटेकर यांचे ‘या’ अभिनेत्रीमूळे बदलले नशीब, पहा रातोरात झाले सुपरस्टार…

एका नाटकाचे ५० रुपये घेणारे नाना पाटेकर यांचे ‘या’ अभिनेत्रीमूळे बदलले नशीब, पहा रातोरात झाले सुपरस्टार…

अभिनेते नाना पाटेकर यांना आज कुठल्याही ओळखीची गरज नाही. नाना पाटेकर कडक शिस्तबद्ध आणि तापट स्वभावाचे म्हणून ओळखले जातात. त्यांना एखादी गोष्ट पटली नाही तर ते वेळीच याबाबत संबंधितांना सांगत असतात. नाना पाटेकर चित्रपट सृष्टी सह त्यांच्या सामाजिक कार्यासाठी देखील ओळखले जातात.

अभिनेता मकरंद अनासपुरे यांच्या सोबत मिळून त्यांनी नाम फाउंडेशनची स्थापना काही वर्षांपूर्वी केली आहे. नाम फाउंडेशन चे कार्य आता खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या फाउंडेशनच्या माध्यमातून अनेकांना मदत देखील करण्यात आलेली आहे. आ’त्म’ह’त्याग्र’स्त शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांना देखील या माध्यमातून मदत केली आहे.

अजून या संघटनेचे काम हे सुरूच आहे. नाना पाटेकर यांना आयुष्यामध्ये खूप मोठा संघर्ष करावा लागला आहे. नाना पाटेकर ज्या वेळी शाळेत जायचे, त्या वेळी त्यांना शाळेपासून जवळपास आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या चुनाभट्टी भागात कामाला जावे लागायचे. नाना पाटेकर यांचे कुटुंब हे खूप मोठे होते. नाना पाटेकर यांना सात भाऊ होते.

मात्र, यातील पाच जणांचा मृ’त्यू झाला होता. नाना पाटेकर यांनी आपल्या करिअरमध्ये वैविध्यपूर्ण अशा भूमिका केली आहे. चरित्र, विनोदी, हा’णामा’री आणि अनेक चित्रपट केले आहे. त्यांनी केलेला प्रहार, क्रांतीवीर, तिरंगा हा चित्रपट प्रचंड चालले होते. त्यानंतर त्यांनी केलेले कॉमेडी चित्रपट देखील आले होते.

यामध्ये वेलकम या चित्रपटाचा समावेश आहे. नाना पाटेकर यांचे वैयक्तिक आयुष्य देखील असेच ‘वा’दग्र’स्त असे राहिलेले आहे. नाना पाटेकर यांच्या पत्नीचे नाव नीलकांती पाटेकर असे आहे. त्यांना एक मुलगा आहे, त्याचे नाव मल्हार पाटेकर असे आहे. नाना पाटेकर हे त्यांच्या पत्नीपासून विभक्त राहतात.

ज्या वेळी नाना पाटेकर यांनी निलकांती यांच्या सोबत लग्न केले होते, त्यावेळेस त्या बँकेत नोकरी करत होत्या. नाना पाटेकर याला अभिनयाची हौस असल्यामुळे त्यांनी यासाठी नानाला प्रोत्साहन देखील दिले होते. नाना यांचा अग्निसाक्षी हा चित्रपट काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामध्ये त्यांच्यासोबत मनिषा कोईराला ही दिसली होती. त्यानंतर या जोडीने खामोशी हा चित्रपट देखील केला होता.

या चित्रपटांमध्ये नाना पाटेकर यांनी एका दिव्यांग कलावंताची भूमिका केली होती. त्यानंतर या दोघांमध्ये प्रे’मसंबं’ध निर्माण झाल्याची च’र्चा त्यावेळी होती. या कारणामुळेच त्यांच्या पत्नी नाना पाटेकर यांच्यापासून दूर राहतात, असे सांगण्यात येते. नाना पाटेकर यांनी ज्या वेळी त्यांच्या करिअरची सुरुवात केली होती.

त्यावेळेस त्यांना केवळ पन्नास रुपये मा’नध’न मिळाले. नाना पाटेकर थेटरमध्ये आर्टिस्ट म्हणून काम करायचे. या वेळी त्यांना पन्नास रुपये मानधन हे पुरायच नाही. एक वेळेस त्यांनी केलेले नाटक दिग्गज अभिनेत्री दिवंगत स्मिता पाटील यांनी पाहिले होते. त्यानंतर या दोघांची ओळख झाली. स्मिता पाटील यांनी नाना पाटेकर यांना बॉलिवूडमध्ये काम करण्याचा सल्ला दिला.

त्यानंतर या जोडीने बॉलिवुडमध्ये एकत्र काम देखील केले होते. नाना पाटेकर यांनी ज्या दिग्दर्शकासोबत काम केले, त्या दिग्दर्शकासोबत नाना पाटेकर यांची एकदा तरी भांडणं झाली असे देखील सांगण्यात येते. त्यामुळे नाना पाटेकर हे चित्रपटाचा करार करताना त्यामध्ये भांडणाचा उल्लेख देखील आवर्जून करायचे.

नाना पाटेकर यांना अतिशय साधे राहणे आवडते. तसेच ते गावात राहणे पसंत करतात. त्यामुळे नाना पाटेकर पुणे किंवा गोव्यामध्ये त्यांच्या खेडेगावात राहण्यास पसंती देतात. नाना पाटेकर हे तापट स्वभावाचे आहेत. तसेच शिस्तबद्ध आहेत, हे देखील ओळखले जाते. एका कार्यक्रमांमध्ये नाना पाटेकर महिलांवर होणाऱ्या अ’त्या’चा’राबाबत बोलत होते. त्यानंतर प्रेक्षकांनी कडाडून टाळ्या वाजवल्या.

मात्र, नाना पाटेकर यावर अतिशय संतापले आणि म्हणाले की, केवळ या संवेदनशील विषयावर चर्चा चालू आहे आणि आपण टाळ्या वाजवतात. त्यानंतर नाना पाटेकर हा कार्यक्रम सोडून निघून गेले. नाना पाटेकर यांनी प्रहार या चित्रपटासाठी आर्मीचे प्रशिक्षण घेतले होते. यासाठी ते तीन महिने सैन्याच्या कॅम्पमध्ये जाऊन देखील राहिले होते.

तसेच नाना पाटेकर यांना त्यांच्या दरिया दिलीसाठी देखील ओळखले जाते. त्यांचे मित्र असलेले दिग्दर्शक एन चंद्रा यांना पैशाची गरज असताना नाना पाटेकर यांनी त्यांचे घर गहाण ठेवून त्यांना पैसे दिले होते. त्यानंतर चंद्रा यांनी नाना पाटेकर यांना पैसे परत करून एक स्कूटर देखील भेट दिली होती.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *