मयुरी देशमुखच्या पतीने ग’ळफा’स घेऊन सं’पवलं होत आयुष्य; वाढदिवसाच्या दिवशी भावनिक कविता पोस्ट करत म्हणाली; प्रत्येक क्षण मी…

मयुरी देशमुखच्या पतीने ग’ळफा’स घेऊन सं’पवलं होत आयुष्य; वाढदिवसाच्या दिवशी भावनिक कविता पोस्ट करत म्हणाली; प्रत्येक क्षण मी…

राजा राणीचा संसार म्हणजे नक्की काय? आपल्या आवडीच्या जोडीदारासोबत घरच्यांच्या मर्जीने थाटामाटात लग्न करायचं आणि मग स्वतःच्या घरात संपूर्ण आयुष्य, प्रत्येक सुख-दुःखात एकमेकांची साथ द्यायची, आशा सुंदर संसाराला आपल्यालाकडे राजा-राणीचा संसार म्हणतात.

आजच्या काळात आपल्या आवडीचा जोडीदार मिळणं दुर्मिळच. आणि त्यात त्याच्यासोबत लग्न होणं हे त्याहून दुर्मिळ. मात्र, खरोखर काही नशीबवान असतात जे आपला जोडीदार अचूक निवडतात आणि त्याच्यासोबत विवाह देखील करतात.मराठी चित्रपटसृष्टीत अशीच एक राजा-राणीची सुंदर जोडी होती, आशुतोष आणि मयुरी या दोघांची.

‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेतून घराघरातून पोहोचलेल्या मयुरीला, आशुतोषच्या रूपात हवा तसा अगदी मनात होता तसा स्वप्नांचा राजकुमार मिळाला आणि त्या दोघांनी लग्न देखील केलं. २०१६ मध्ये या दोघांनी आपल्या आयुष्याची नवी सुरुवात केली. सुंदर आणि निरागस अशी मयुरी आणि तिला साजेसा राजबिंडा आशुतोष अशी त्या दोघांची खरोखर राजा-राणीची जोडी वाटतं होती.

चार वर्षांच्या त्यांच्या संसारात, त्यांनी काही दुःखाचे क्षण देखील सोसले असतील, मात्र एकमेकांची साथ कधीच नाही सोडली. अनेकवेळा आपल्या सोशल मिडियावरून ते एकमेकांसाठी असलेलं आपलं प्रेम व्यक्त करत असत. त्याची जोडी कित्येक चाहत्यांची आवडीची जोडी होती. मात्र, त्यांच्या या सुखी संसाराला कोणाची तरी नजर लागली आणि होत्याच नव्हतं झालं.

आशुतोष एक होतकरु तरुण होता. त्याच्या अभिनयाचे आणि त्याच्या कामाचे सगळीकडून चांगलेच कौतुक होत होते. मात्र, त्याला हवं तशी नशिबाची साथ मिळत नव्हती. त्याला हवे तसे काम मिळत नव्हतं, आणि त्यातल्या त्यात बिग बजट सिनेमाचे तर मिळतच नव्हते. त्यामुळे त्याचा धीर सुटू लागला आणि नै’राश्या’ने त्याला ग्रा’सले.

आणि त्यातून त्याने अगदी टोकाचा निर्णय घेतला, जुलै २०२० मध्ये त्याने ग’ळफा’स घेतला. आलेल्या नै’रा’श्यातून त्याने आपले आयुष्य संप’वले, आणि राजा-राणीचा संसार मोडून पडला. मयुरीला एकटं सोडून, आशुतोष गेला. त्यानंतर मयुरीने मोठ्या हिंमतीने स्वतःला सावरलं, पुन्हा स्वतः उभं केलं. तिने कामामध्ये स्वतःला गुंतवून टाकलं.

मराठी मनोरंजन विश्वामध्ये तिने आपलं नाव कमवलंच होत मात्र, आता हिंदी मनोरंजन विश्वामध्ये देखील तिने आपली ओळख निर्माण केली आहे. हे सर्व असलं तरीही, आपल्या प्रेमाची, साथीदाराची आठवण तिला येतेच. काल आशुतोषचा वाढदिवस होता. मयुरीने पुन्हा एकदा आपल्या जुन्या सुंदर आठवणींना उजाळा देत सुंदर असा व्हिडीओ आणि अत्यंत भावुक करणारी कविता पोस्ट केली आहे.

तिच्या पोस्टने सर्वच चाहत्यांना अत्यंत भावुक केले आहे. ‘मी तुझ्या आठवणीत आयुष्य जगत आहे, प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण..’ असा आशय असणारी एक इंग्रजी कविता मयुरीने शेअर केली आहे. तिची कविता वाचताना अनेकांना आपल्या भावना अनावर झाल्या, अनेकांचे डोळे पाणावले. अनेकांनी तिच्या पोस्टवर असे वेगवेगळे कमेंट्स देखील केलं आहे.

हे सर्व स’हन करुन तू पुन्हा उभी राहिलीस यासाठी तुझे कौतुक, अशीच स्ट्रॉंग रहा, असे देखील अनेक नेटकाऱ्यानी तिच्या पोस्टवर कमेंट केलं आहे. मयुरीने आता हिंदी टेलिव्हिजन सृष्टीमध्ये देखील आपला चांगलाच जम बसवला आहे. इमली या मालिकेतील तिची भूमिका चांगलीच लोकप्रिय झाली आहे. ग्रे आणि लग्न कल्लोळ या मराठी सिनेमामध्ये देखील तिच्या कामाचे चांगलेच कौतुक करण्यात आले होते.

‘आयुष्य कितीही पुढे गेलं तरीही, आपल्या साथीदाराची जागा कधीच भरून निघू शकत नाही. मी अजूनही स्वतः ला सावरत आहे, मला अनेकवेळा आशुतोष माझ्यासोबतच असल्याचा भास होतो. दुसऱ्या लग्नाबद्दल माझा काहीही विचार नाहीये. मला आशुतोषने जे प्रेम दिल, ते या एका जन्मासाठी पुरेसं आहे,’ असं मयुरीने एका मुलाखतीमध्ये सांगितलं होत.

admin

Leave a Reply

Your email address will not be published.