आपल्याला माहित नसलेले ‘मराठी’ इंडस्ट्रीतील १० ‘सेलिब्रिटी भावंड’ 9 व्या जोडीने ‘हिंदी’ इंडस्ट्रीमध्येही कमवलंय नाव..

नुकतंच आपण सर्वानी रक्षा बंधनचा सण साजरा केला. सर्वच भावा बहिणींनी हा सण मोठ्या उत्सहात साजरा केला. सर्वसामान्यांप्रमाणे, सेलेब्रिटीजने देखील हा सण साजरा केला. बऱ्याच सेलेब्रिटीजने आपल्या भावंडांसोबत फोटोज शेअर केले. त्या फोटोजला देखील भरभरून लाईक्स आलेत. यामुळे अनेक सेलेब्रिटी खरोखर भाऊ बहीण आहेत हेसुद्धा सर्वाना समजले. एकदा बघू या आपल्या मराठमोळ्या सेलेब्रिटी भावंडांची जोडी.
1) अमृता देशमुख-अभिषेक देशमुख :- सध्या आई कुठं काय करते या मालिकेने सगळीकडेच धुमाकूळ घातला आहे. या मालिकेतील सर्वच पात्र, प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. त्यापैकी, तिन्ही भांवंड तर सर्वाना खूपच आवडले. अगदी खऱ्या-खुऱ्या भावा- बहिणीप्रमाणे ते राहतात. याचे कारण देखील तसेच आहे.
या मालिकेतील यश आणि इशा म्हणजेच अभिषेक व अमृता देशमुख सख्खे भाऊ-बहीण आहेत. ‘फ्रेशर्स’ या अमृताने मालिकेत परीची भूमिका साकारली होती. अमृता आणि अभिषेक दोघेही पुण्याचे असून त्यांनी शिक्षण सुद्धा पुण्यातच पूर्ण केलं आहे. अभिषेक आई कुठं काय करते मध्ये काम करत आहे तर, अमृता ‘मी तुझीच रे’ मालिकेत काम करतेय.
2) खुशबु तावडे- तितिक्षा तावडे :- तेरे लिये, तारक मेहता का उलटा चष्मा, प्यार की एक कहाणी, तेरे बिन यासारख्या हिंदी मालिकांत खुशबू तावडेने काम केले आहे. गेली अनेक वर्ष ती, मराठी आणि हिंदी टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे. आता तिची बहीण तितिक्षा देखील तिच्या पाठोपाठ मराठी टीव्ही इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे.
‘तू अशी जवळी रहा’ या मालिकेमधून तितिक्षाला खरी ओळख मिळाली. ‘आम्ही दोघी’ या मालिकेत खुशबू झळकली होती आणि सध्या मेरे साई या मालिकेत देखील ती काम करत आहे. या दोघी डोंबिवली मधेच राहतात आणि तिथेच त्यांनी शिक्षण पूर्ण केले आहे.
3) संदेश कुलकर्णी आणि सोनाली कुलकर्णी :- मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने केवळ मराठीच नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये देखील आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिचा भाऊ संदेश देखील अनेक वर्षांपासून याच इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे कदाचित सर्वाना ठाऊकही नाही.
संदेश आणि सोनाली दोघेही कॉलेजमध्ये असतानाच अभिनय करत होते. संदेश कुलकर्णी यांनी अनेक मालिका, नाटक आणि सिनेमांमध्ये काम केलंय. मात्र नाटकांचं, मालिकांच आणि सिनेमाचं संवाद लेखन, ऍक्शन सीन्स यामध्ये त्यांनी जास्त काम केले आहे. जॉनच्या बहुचर्चित रॉकी हॅण्डसम सिनेमामध्ये देखील तो झळकला होता.
4) मृण्मयी गोडबोले-सह्रद गोडबोले :- चि व सौ कां, ये रे ये रे पावसा, राजवाडे अँड सन्स सारख्या हिंदी सिनेमामध्ये काम करणाऱ्या मृण्मयी गोडबोलेला आज सर्वच जण ओळ्खतात. प्रसिद्ध अभिनेते श्रीरंग गोडबोले यांचे दोन्ही मुलं म्हणजेच मृन्मयी आणि सुहृद गोडबोले चित्रपट सृष्टीमध्ये काम करत आहेत. सुहृद गोडबोलेने अभिनया सोबतच निर्माती क्षेत्रात देखील काम केलं आहे.
5) मृण्मयी देशपांडे-गौमती देशपांडे:- गेली कित्येक वर्षे मृन्मयी देशपांडे मराठी चित्रपटसृष्टीमध्ये काम करत आहे. तिने काही मालिकांमध्ये देखील काम केले आहे. फर्जंद या सिनेमामध्ये तिने रेखाटलेल्या केसरच्या भूमिकेला प्रेक्षकांची खास दाद मिळाली.
तिची बहीण गौतमी देखील आता अभिनय क्षेत्रात काम करते. सारे तुझ्यासाठी या मालिकेमधून गौतमीने अभिनय क्षेत्रात प्रवेश केला आहे. कुंकू या मराठी मालिकेतून मृण्मयीला खास ओळख मिळाली. अ’ग्निहोत्र मालिकेमधील तिची भूमिका आजही चाहत्यांच्या मनात घर करून आहे.
6) वंदना गुप्ते-भारती आचरेकर :- मराठी सिने इंडस्ट्रीतील सिनियर बहिणींची लोकप्रिय जोडी म्हणून या दोघीना ओळखले जाते. वंदना आणि भरती या दोघीनी केवळ मराठीच नाही तर हिंदी सिनेसृष्टीमधे देखील काम केले आहे. अनेक मालिकांमध्ये आणि सिनेमामध्ये या दोघीनी काम केले आहे. आजही त्यांचा भला-मोठा चाहतावर्ग आहे. केवळ अभिनयच नाही तर या दोघी बहिणी उत्तम गायिका देखील आहेत.
8) पूर्णिमा तळवलकर-पल्लवी वैद्य :- सध्या रंग माझा वेगळा मालिकेत, दीपा आणि श्वेताच्या आईच्या भूमिका साकारणाऱ्या पूर्णिमा अनेक वर्षांपासून मराठी सिनेसृष्टीमधे काम करत आहेत. त्याचबरोबर त्यांची बहीण म्हणजेच पल्लवी देखील बऱ्याच वर्षांपसून अभिनय क्षेत्रात काम करत आहे.
पल्लवी आणि पूर्णिमा दोघीही सख्ख्या बहिणी आहेत आणि त्यांचं माहेरचं आडनाव भावे आहे. स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेत पल्लवीने पुतळा राणीची भूमिका साकारली होती. त्यांच्या या भूमिकेचे सगळीकडून भरभरून कौतुक करण्यात आले. तर पूर्णिमा याआधी ‘होणार सून मी…’ आणि ‘फुलपाखरू’ या मालिकेत झळकली होती.
8) भार्गवी चिरमुले-चैत्राली गु’प्ते :- स्वराज्य जननी जिजामाता या मालिकेत जिजाऊंच्या भूमिकेत झळकणारी भार्गवी गेली अनेक वर्षे मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीमधे काम करत आहे. भार्गवीने अनेक मराठी सिनेमामध्ये काम केले आहे. चैत्राली गु’प्ते, भार्गवीची सख्खी बहीण आहे. चैत्रालीने देखील अनेक मराठी सिनेमामध्ये काम केलं आहे. पिया अलबेला आणि ये रिश्ते है प्यार के या मालिकांमध्ये देखील चैत्राली झळकत आहेत. तर, सिया के राम या लोकप्रिय मालिकेत भार्गवीने सीतेच्या आईची भूमिका साकारली होती.
9) अनुषा दांडेकर-शिबानी दांडेकर :- ‘ही पोरी साजुक तुपातली’या सुपरहिट मराठी गाण्यामध्ये शिबानी दांडेकरने आपल्या नृत्याने सर्वानाच घायाळ केलं होत. शिबानी आणि अनुषा या दोघी बहिणी हिंदी टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये काम करत आहेत. अनुषाने काही हिंदी सिनेमामध्ये देखील काम केलं आहे. एमटीव्ही चे अनेक शोज ती होस्ट करते. तर, शिबानीने झलक दिखलाजा सारख्या रियालिटी शोमध्ये काम केले आहे. मराठी सिनेसृष्टीत सर्वात ग्लॅमरस बहिणींची जोडी म्हणून या दोघीना ओळखलं जात.
10) अभिनय बेर्डे – स्वानंदी बेर्डे:- मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांची मुलं अभिनय बेर्डे आणि स्वानंदी बेर्डे या दोघांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. ‘ती सध्या काय करते’ या चित्रपटातून अभिनयने, सिनेसृष्टीमधे पदार्पण केले. त्याच्या अभिनयाची सगळीकडूनच तोंडभरून कौतुक झालं होत.