आपले आवडते मराठी कलाकार ‘किती’ शिकले आहेत माहिती आहे का? नंबर ३ चा अभिनेता व्यवसायाने आहे ‘वकील’, जाणून घ्या…..

मनोरंजन
चांगल्या क्षेत्रात नोकरी किंवा काम करायचे असेल तर तुम्हाला चांगल्या पद्धतीच्या शिक्षणाची गरज आहेच. मात्र, असे अनेक क्षेत्रे आहेत की ज्यामध्ये शिक्षण कमी असले तरी तुम्ही यश मिळू शकतात. तसेच तुमच्या कल्पकतेच्या जोरावर देखील तुम्ही र’ग्गड पै’सा कमवू शकता.
मग त्याला शिक्षणाची काहीही गरज नसते. केवळ व्यवहारिक ज्ञान हवे असते. मात्र, मराठी कलाकार देखील काय शिकलेले असतात हे अनेकांना जाणून घ्यायचे असते. तर आम्ही आपल्याला आज मराठी कलाकारांचे शिक्षण काय झाले आहे ते सांगणार आहोत.
१.पूजा सावंत : काही वर्षांपूर्वी ही अभिनेत्री मराठी चित्रपट आणि मालिकेतून आपल्याला दिसली आहे. अतिशय प्रभावी संवादफेक असलेली ही अभिनेत्री जेमतेमच शिकलेली आहे. पूजा सावंत हिने एसआयडब्ल्यूएस मधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे.
२. वैभव तत्ववादी : काही वर्षांपूर्वी या अभिनेत्याने मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. काही मराठी मालिका केल्यानंतर त्याने हिंदीत देखील चित्रपट केले. संजय लीला भन्साळी यांच्या बाजीराव मस्तानी या चित्रपटात त्याने चिमाजी आप्पाची भूमिका साकारून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. वैभव तत्ववादी याचे इंजिनिअरिंगमध्ये शिक्षण पूर्ण झाले आहे.
३. स्वप्निल जोशी : उत्तर रामायण ते काल परवाचा दुनियादारी या चित्रपटातून प्रभावीपणे भूमिका साकारणारा अभिनेता स्वप्नील जोशी यांचे शिक्षण वाणिज्य शाखेत झाले आहे. याशिवाय त्याने एलएलबी पदवी संपादन केली.
४. नेहा महाजन : अतिशय उत्तम अभिनय करणारी अभिनेत्री ही पुण्यात राहते. नेहा हिने काही मालिका काम केले आहे. तिचे शिक्षण मास्टर्स इन फिलोसोफी झाले असून पुणे विद्यापीठातून तिने ही पदवी पूर्ण केली आहे.
५ रितेश देशमुख: आपल्या अभिनयाने बॉलीवुड गाजवणारा हा मराठमोळा लातूरचा पोरगा सध्या सर्वत्र धुमाकूळ घालीत आहे. रितेश देशमुख याचे मुंबईतील कमला रहेजा कॉलेज येथून आर्किटेक मध्ये शिक्षण पूर्ण झाले आहे.
६.सायली पाटील: ही अभिनेत्री काही वर्षांपूर्वीच मराठी चित्रपट सृष्टी व मालिकेतून दिसत आहे. तिने इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमध्ये पदवी संपादन केली आहे.
७ सौरभ गोखले: सौरभ गोखले काही वर्षांपूर्वी झी मराठीवर आलेल्या एका मालिकेतून चमकला होता. सौरभ याचे एमबीएपर्यंत शिक्षण पूर्ण झाले असून सध्या तो विविध मालिकांत काम करत आहे.
८ सुबोध भावे: सध्या झी मराठीवर पुन्हा प्रसारित होणाऱ्या तुला पाहते रे या मालिकेतून घराघरात पोचलेला अभिनेता सुबोध भावे यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे आणि चित्रपटात त्यांनी जबरदस्त असे काम केले आहे. सुबोध भावे यांचे शिक्षण एम कॉम झाले आहेत.
९ रसिका सुनील : मराठी मालिकाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला हा चेहरा म्हणजे रसिका सुनील. युएसमधून मधून फिल्ममेकिंगचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे.
१० सई ताम्हणकर: आपल्या अभिनय आणि मादक अदांनी सर्वांना घायाळ करणारी अभिनेत्री सई ताम्हणकर तरुणांच्या गळ्यातील ताईत आहे. सई हिने हॉटेल मॅनेजमेंटमध्ये अभ्यासक्रम पूर्ण केला आहे.