मालिकेत सासूबाई ! पण खऱ्या आयुष्यात खूपच बोल्ड आहे ‘ही’ मराठी अभिनेत्री; फोटो पाहून थक्क व्हाल..

मालिकेत सासूबाई ! पण खऱ्या आयुष्यात खूपच बोल्ड आहे ‘ही’ मराठी अभिनेत्री; फोटो पाहून थक्क व्हाल..

मनोरंजन विश्वातील मालिका हा अविभाज्य घटक आहे. एकदा एखादी मालिका चाहत्यांना भावली की, त्त्यामधील पात्र देखील चांगलीच लोकप्रियता कमवतात. असे अनेक कलाकार आहेत ज्यांना सिनेमामध्ये आपली जादू नाही उमटवता आली, मात्र मालिकांमध्ये त्यांना भरगोस यश मिळालं.

मराठी टेलिव्हिजन इंडस्टी देखील आता बऱ्यापैकी विस्तारत आहे. सध्या सुरु असलेल्या अनेक मालकांचे टीआरपीसुद्धा चांगले आहेत. त्यामुळे आता मालिकांमध्ये काम करणारे कलाकार देखील चांगलेच प्रसिद्ध होत आहेत. मात्र सुरुवातीच्या काळात, मराठी मालिका आता इतक्या जास्त हिट ठरत नव्हत्या. मराठीच्या तुलनेत हिंदी मालिका बघणाऱ्यांचा वर्ग मोठा होता.

मात्र त्या काळात देखील आपल्या अभिनयाने आणि उत्तम कथानकाच्या बळावर प्रेक्षकांची चांगलीच दाद मिळवली होती. अश्या काही मोजक्या कलाकारांपैकी एक नाव आहे, अभिनेत्री ऐश्वर्या नारकर हिचं. ऐश्वर्या नारकर यांनी आपल्या सुंदरतेच्या बळावर अनेकांचे मन जिंकली आहेत. त्याचा भलामोठा चाहतावर्ग आहे. सुरुवातीच्या काळात त्यांनी अनेक मराठी सिनेमामधून काम केलं आहे.

त्याच्या अभिनयाची आणि आणि सोज्वळ अश्या लूकची नेहमीच चर्चा रंगली होती. चाहत्यांनी त्याना नेहमीच सिम्पल आणि सध्या रूपात पहिले आहे. त्यांनी अनेक हिंदी मालिकांमध्ये देखील काम केलं आहे. ‘बाबुल कि ये गुडिया-घर कि लक्ष्मी बेटीया’ या मालिकेमधून त्यांना खास ओळख आणि लोकप्रियता मिळाली.

त्याचबरोबर त्यांनी अनेक हिंदी मालिकांमध्ये आईची आणि सासूची भूमिका साकारली, आणि त्याच्या या भूमिकांना सदैव चाहत्यांची पसंती मिळाली. नुकतंच त्यांनी श्रीमंताघरची सून या मालिकेत देखील सोज्वळ आणि भोळ्या सासूबाईंची भूमिका साकारली होती. मात्र मालिकांमध्ये अशी भोळी आणि सिम्पल आईची व सासूची भूमिका साकारणाऱ्या ऐश्वर्या नारकरच्या एका फोटोशूटची चांगलीच चर्चा रंगली आहे.

त्यांनी आपल्या भूमिकांपेक्षा अगदी हटके असा फोटोशूट केला आहे. यामध्ये त्यांनी आपल्या बोल्ड आणि हॉ’ट लूकचा प्रथमच आपल्या चाहत्यांना परिचय दिला आहे. त्यांच्या या हॉटलूकला देखील चाहत्यांची चांगलीच पसंती मिळाली आहे. सगळीकडेच त्यांच्या याच लूकची चर्चा सुरु आहे. आजवर सुंदर अश्या, भरजरीत साडी मध्ये दिसणाऱ्या ऐश्वर्याने प्रथमच हॉट शर्टची निवड केली आहे.

पांढऱ्या हॉट शर्ट मध्ये गदग रंगाची लिपस्टिक यामुळे त्यांच्या लूक अजूनच आकर्षित दिसत आहे. त्यांच्या या फोटोवर लाईक्सचा वर्षाव होत आहे. अनेक मराठी कलाकारांनी देखील त्यांचा या लूकला लाईक करत कौतुक केलं आहे. ऐश्वर्या नारकर सोशल मीडियावर नेहमीच चांगल्याच ऍक्टिव्ह असतात. नेहमीच आपले सुंदर असे फोटोज आणि काही व्हिडियोज देखील त्या आपल्या इंस्टाग्राम अकाऊंट वरुन शेअर करत असतात.

अनेक वेळा लाईव्ह येऊन आपल्या चाहत्यांसोबत देखील त्या चर्चा करत असतात. इंस्टाग्रामवर त्यांचे लाखो चाहते आहेत. केवळ मराठीच नाही तर हिंदी सिनेसृष्टीतील देखील अनेक कलाकार त्यांना फॉलो करत आहेत. त्यांचा या हॉट आणि बोल्ड फोटोशूटने मात्र, सर्वच चाहत्यांना एक सुखद आश्चर्याचा धक्काच दिला आहे.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *