लॉकडाऊनमध्ये उपासमारीची वेळ आलेल्या बुधवार पेठेतील महिलांसाठी ‘ही’ तरुणी ठरली देवदूत ! अशा प्रकारे करतेय मदत…

लॉकडाऊनमध्ये उपासमारीची वेळ आलेल्या बुधवार पेठेतील महिलांसाठी ‘ही’ तरुणी ठरली देवदूत ! अशा प्रकारे करतेय मदत…

अनेकांचा रोजगार को’रो’ना म्हणजेच लॉ’कडा’ऊनमुळे ठप्प झाला. त्यातच पुण्याच्या बुधवार पेठे मधील म’हिलांचा उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. लॉ’कडा’ऊनमुळे ह्या महिला अगदी अ’डच’णीत सा’पडल्या आहेत. ह्या अ’डच’णीमध्ये आलेल्या बुधवार पेठेतील म’हिलां’साठी एक तरुणी जणू काही देवदूत बनून आली आहे. ‘आकांक्षा सडेकर ‘ हे त्या तरुणीचे नाव आहे.

राज्यभरात को’रो’नामुळे निर्माण झालेल्या गं’भीर प’रिस्थि’तीनंतर नि’र्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे सहाजिकच मागील पंधरा दिवसांपासून पुण्यातील सर्व व्यवहारात ठप्प आहेत. शहरातील हॉटेल्स, रेस्टॉरंट बंद असून जे उघडे आहेत ते केवळ होम डिलिव्हरी करत आहेत. अनेकांचा रोजगार देखील हिरावला गेला आहे.

ह्या सर्व पार्श्वभूमीवर पुण्यामधील बुधवार पेठ मध्ये असणाऱ्या महिलांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ह्या प’रिस्थितीमध्ये समाजामधील बरेच दानशूर व्यक्ती व काही सामाजिक संघटना ह्या महिलांना मदत करण्यासाठी पुढे येत असल्याचे दिसत आहे. ह्याचप्रकारे एका ब्रिटीश तरुणीने देखील वे’श्या व्यवसाय करणाऱ्या ह्या म’हिलांसाठी आपला मदतीचा हात पुढे केला.

मुंबईत ज’न्म झाल्यानंतर आकांक्षा सडेकर ही तरुणी लहानाची मोठी स्कॉटलंडमध्ये झाली. सहा वर्षांपूर्वी ती पुन्हा भारतात परतली. को’रो’नाची दुसरी लाट ज्यावेळी सुरु झाली त्यावेळी ती देखील पुण्यात होती. यावेळी ट्विटरवरुन एका वैद्यकीय अभ्यासक्रमाचे शिक्षण घेघेत असणाऱ्या विद्यार्थ्याने लॉ’कडा’ऊनमुळे आपले जेवणाचे कसे हाल होत आहेत ह्याची व्यथा मांडली होती.

हे ट्वीट आकांक्षाने पाहिले व अशाप्रकारे अ’डचणीत अडकलेल्यांसाठी तिने हा उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमांतर्गत आतापर्यंत सहा हजार गरजूंपर्यंत जेवणाचे डब्बे पोहोचवल्याचे तिने सांगितले. सुरुवातीला आकांक्षाने एकटीनेच ह्या उपक्रमाला सुरुवात केली होती.

त्यानंतर सो’शल मी’डियावर तिने त्याची माहिती शेअर केल्यानंतर पुण्यातील अजून काही तरुण तिची मदत करण्याकरिता पुढे आले. तेव्हापासून तिचा हा उपक्रम अद्यापही सुरुच आहे. तिच्यासोबत काम करणाऱ्या किशोर नावाच्या तरुणाने या अन्नाची वाहतूक करण्याची जबाबदारी उचलली आहे.

“सुरुवातीच्या काळात आम्ही जेव्हा गरजू व्यक्तींपर्यंत अन्न कोणत्या प्रकारे पोहचावे याच्या विचारात होतो. त्यावेळी आम्हाला काही पोलीस भेटले आणि त्यांनी सांगितले बुधवार पेठेतील वे’श्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना देखील अन्नाची गरज सर्वात जास्त आहे. कारण सहाजिकच लॉ’कडा’ऊन असल्यामुळे घराबाहेर पडण्यास पूर्णपणे बंदी होती.

त्यामुळे बुधवार पेठेतील रस्ते देखील ओस पडले होते. परिणामी या म’हिलांची उपासमार सुरु होती. तेव्हापासून आम्ही येथील महिलांना जेवणाचे डब्बे देण्यास सुरुवात केली. ट्विटरच्या माध्यमातून या उपक्रमाची माहिती दिल्यानंतर अनेक व्यक्ती आमच्या सोबत घेऊन काम करत आहेत,” असं आकांक्षाने आपल्या या उपक्रमाविषयी सांगितले.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *