‘महात्मा फुले’ यांच्या जीवनावर येतोय ‘सत्यशोधक’ चित्रपट, ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता साकारणार भूमिका…

महात्मा ज्योतिबा फुले यांनी आयुष्यभर वंचित, दुर्लक्षित, दु’र्बल यांच्या कल्याणासाठी काम केले. त्यांनी अ’शिक्षितांना शिक्षण देण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले होते. त्यांच्या पत्नी सावित्रीबाई यांनी देखील वं’चित घ’टकांसाठी खूप मोठ्या प्रमाणात काम केले. म’हिलांसाठीची पहिली शाळा त्यांनी सुरू केली.
आता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी लवकरच एक चित्रपट येत आहे. या चित्रपटाचे ऐंशी टक्के चित्रिकरण जवळपास पूर्ण झाले. असून लवकरच हा चित्रपट तयार करण्यात येत आहे. त्याकाळचा लुक यावा यासाठी सेटवर देखील मोठ्या प्रमाणात काम करण्यात येत आहे. एकोणीसाव्या शतकामधील लुक येण्यासाठी देखील वेगवेगळ्या प्रकारचे सेट लावण्यात येत आहेत.
हा चित्रपट पाहताना आपल्याला सर्व जुने प्रसंग अनुभवता येतील, असा विश्वास या चित्रपटाचे दिग्दर्शक नीलेश जळमकर यांनी व्यक्त केला आहे. या चित्रपटाचे नाव सत्यशोधक असे आहे. आम्ही आपल्याला या चित्रपटाबद्दल माहिती देणार आहोत. शो’षि’त पी’डि’तांसाठी महात्मा ज्योतिबा फुले यांनी खूप मोठे कार्य केले होते.
त्यांच्या कार्य कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी सत्यशोधक या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत येणार आहे. अनिष्ट प्रथाविरोधात त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात बं’ड देखील पुकारले होते. रू’ढी-प’रंप’रांच्या ग’र्केत अड’कलेल्या स’माजाला त्यांनी या जो’खडातून बाहेर देखील काढून सत्याचा मार्ग दाखवला होता. आपल्या कार्याच्या जोरावर त्यांना महात्मा ही पदवी बहाल करण्यात आली होती.
त्यांच्या प्रत्येक कार्यामध्ये तेवढेच मोठी साथ देणाऱ्या सावित्रीबाईंचा प्रवास देखील थक्क करणारा असाच आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण करणे, हे खूप मोठे आव्हानात्मक काम होते, असे या चित्रपटाचे दिग्दर्शक निलेश रावसाहेब जळमकर यांनी सांगितले. महात्मा फुले यांच्या जीवनावर चित्रपट प्रदर्शन करणे हाच आमचा उद्देश होता, असे देखील त्यांनी सांगितले आहे. या चित्रपटाची निर्मिती प्रवीण तायडे, आप्पा बोराटे यांनी केली आहे.
हा अभिनेता करणार ज्योतिबाची भूमिका
ज्योतिबाच्या भूमिकेसाठी अनेक कलाकारांची निवड करण्यात आली होती. मात्र, या भूमिकेला न्याय देण्यासाठी दिग्दर्शक चांगल्या कलाकाराच्या शोधत होते. त्यानंतर त्यांनी अनेक जणांचे ऑडिशन घेतले. मात्र, त्यांना एकही अभिनेता हा रुजत नव्हता. त्यानंतर त्यांनी अभिनेता संदीप कुलकर्णी याला या चित्रपटासाठी साइन केले.
महात्मा ज्योतिबाची भूमिका आपल्यासाठी करणे खूप आव्हानात्मक आहे. मात्र, आपण हे भाग्य समजतो, असे प्रतिपादन संदीप कुलकर्णी यांनी केले आहे. तर राजश्री देशपांडे हिने सावित्रीबाईंची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचे सेट तयार करण्यासाठी व्ही. एफ. एक्स या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर देखील करण्यात आला आहे. हा चित्रपट हिंदी मध्ये देखील प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात येते.