फक्त १ रुपयांत लक्ष्मीकांत बेर्डे यांनी ‘या’ चित्रपटात केले होते काम..महेश कोठारे यांनी सांगितला तो रंजक किस्सा…

बॉलिवूडमध्ये सलमान खान याला सर्वांचा मित्र असे समजले जाते. तसे मराठी चित्रपट सृष्टीत देखील असे कलाकार आहेत की, ते एकमेकांचे अतिशय जीवश्चकंठश्च आहेत. सुरुवातीला नाव घ्यायच झाल तर आपण लक्ष्मीकांत बेर्डे आणि महेश कोठारे यांचे घेऊ शकतो. ही जोडी अतिशय लोकप्रिय अशी होती. मात्र, काही वर्षांपूर्वी अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे यांचे निधन झाले.
मात्र, असे असले तरी लक्ष्मीकांत बेर्डे हा अनेकांना आजही आठवतो. त्याचा दमदार असा अभिनय आणि त्याची हस वण्याची कला ही सर्वांनाच खूप आवडते. लक्ष्मीकांत बेर्डे यांचे चित्रपट लागले की, आजही प्रेक्षक एवढ्या आवडीने पाहत असतात. लक्ष्मीकांत बेर्डे याने विनोदी भूमिकासह चरित्र आणि इतर भूमिका देखील खूप मोठ्या प्रमाणात केल्या.
त्याच्या इतर भूमिका देखील खूप चांगल्या चालल्या होत्या. मात्र, असे असले तरी त्यांच्या विनोदी भूमिकाना खूप प्रेक्षक वर्ग मिळाला होता. लक्ष्मीकांत बेर्डे यांनी काम केलेले अनेक चित्रपट आजही अनेकांना आठवतात. झपाटलेला, माझा छकुला, धूम धडाका, धांगडधिंगा यासारखे चित्रपट त्यांनी महेश कोठारे यांच्या सोबत केले. महेश कोठारे यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांना सोडून काही मोजकेच चित्रपट केले आहे.
लक्ष्मीकांत बेर्डे आणि त्यांची खूप जिवलग अशी मैत्री होती. लक्ष्मीकांत बेर्डे याच्यासाठी महेश कोठारे हे काहीही करायला तयार असत, असे सांगण्यात येते. लक्ष्मीकांत बेर्डे ज्या वेळेस एका नाटकात काम करत होते. त्यावेळेस बबन प्रभूने या कलाकाराचे निधन झाले होते. त्यानंतर त्याची भूमिका लक्ष्मीकांत बेर्डे यांनी साकारली होती.
या नाटकांमध्ये महेश कोठारे यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांना पाहिले होते. त्याच वेळेस महेश कोठारे एका चित्रपटाची निर्मिती करण्याच्या विचारात होते. हा चित्रपट हिंदीतील रिमेक होता. या चित्रपटाचे हिंदीमध्ये नाव ‘प्यार किये जा’ असे होते.या चित्रपटात त्यांची एक कॉमेडी भूमिका होती. ती महमूद यांनी साकारली होती.
या पात्रासाठी महेश कोठारे यांना कुठला अभिनेता भेटत नव्हता. त्यानंतर त्यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांना या चित्रपटासाठी विचारणा केली. त्यासाठी लक्ष्मीकांत बेर्डे यांनी लगेच होकार दिला. मात्र, महेश कोठारे म्हणाले की, आपल्याकडे सध्या मानधन देण्यासाठी अधिक पैसे नाहीये. त्यामुळे आपल्याला तुझी मदत होईल का? त्यावेळेस लक्ष्मीकांत बेर्डे यांनी केवळ एक रुपया मानधन घेतले होते.
ही आठवण महेश कोठारे यांनी एका मुलाखतीत सांगितली होती. लक्ष्मीकांत बेर्डे यांचा एवढा मोठा दिलदारपणा पाहून महेश कोठारे देखील अवाक झाले होते. त्यानंतर या दोघांची जोडी चांगलीच चर्चेत आली. त्यानंतर या दोघांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केले आणि हे सर्व चित्रपट यशस्वी राहिले हे विशेष.