अरे व्वा ! ‘ती परत आलीये’ मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री..

अरे व्वा ! ‘ती परत आलीये’ मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री..

सध्या वेब-सिरीज आणि मालिकांमध्ये देखील ट्रेंड काहीसे बदलत असलेले बघायला मिळत आहे. नेहमीच्या हसत खेळत कौटुंबिक मालिका, किंवा सासू-सुनांचे भांडण याच चौकटीत गुरफटून न राहता आता वेब-सिरीज प्रमाणे मालिका देखील प्रेक्षकांना वेगळं काही आपल्या कथनकामधून देऊन मनोरंजन करत आहेत.

थ्रिलर-सस्पेन्स हा सध्याचा नवीन ट्रेंड मालिकांमध्ये बघायला मिळत आहे. आणि या कथानकांना प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद देखील मिळत आहे. रात्रीस खेळ चाले, या मालिकेने हा ट्रेंड मराठी मालिकांमध्ये सूर केला असे म्हणायला हरकत नाही. त्यापाठोपाठ काही मालिका बनल्या, ज्यांनी असेच काही दाखवण्याच्या प्रयत्न केला.

मात्र सर्वच मालिकांना यश मिळाले नाही. पण, देवमाणूस या मालिकेने मात्र आधीचे सर्व विक्रम तोडले आणि नेहमीच लोकप्रियतेच्या शिखरावर आपली जागा कायम ठेवली. अल्पावधीतच या मालिकेने मोठा चाहतावर्ग निर्माण केला होता. थ्रिलर-सस्पेन्स अशा या मालिकेने नेहमीच्या सासू-सुनाच्या कौटुंबिक मालिकांना टीआरपीच्या शर्यतीत माघे टाकले.

मात्र आता १६ ऑगस्टला ही मालिका चाहत्यांचा निरोप घेणार आहे. देवमाणूस मालिका बंद होणार असली, तरीही त्याच्या जागी येणाऱ्या मालिकेने आपल्या ट्रेलरमधूनच, प्रेक्षकांचा थरकाप उडवला आहे. ‘ती परत आलीये’च ट्रेलर माघील काही दिवसांपासून दिसत आहे. या ट्रेलरला सर्वच चाहत्यांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.

दरम्यान, मालिकेच्या ट्रेलरमधूनच, मालिका चांगलीच थ्रिलर असल्याचं जाणवत आहे. तूर्तास मालिकेच्या, कलाकारांचे नाव समोर आले नाहीये, मात्र अनेक वेगवेगळे नाव समोर येत आहेत. त्यामध्ये प्रसिद्ध अभिनेते विजय कदम या मालिकेत झळकणार असल्याचं बोललं जात आहे. त्याचबरोबर अजून एक नाव सध्या चांगलीच चर्चा रंगवत आहे.

मालिकेच्या प्रमुख पात्राच्या भूमिकेत प्रसिद्ध मराठी अभिनेत्री, ‘कुंजिका काळवीट’ असल्याचं सांगितलं जात आहे. कुंजिकाचा भला मोठा चाहतावर्ग आहे. ‘एक निर्णय’ या मालिकेमधून तिने सिनेसृष्टीमधे पदार्पण केले होते. आपल्या पहिल्याच सिनेमामध्ये तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली होती, त्यानंतर स्वामिनी या मालिकेमध्ये तिला काम करण्याची संधी मिळाली.

स्वामिनी मालिकेमध्ये तिने आनंदीबाईची भूमिका साकारून घराघरात आपली ओळख निर्माण केली. ‘चंद्र आहे साक्षीला’ या मालिकेमध्ये देखील तिने काम केले आहे. सोशल मीडियावर देखील कुंजिकाचा मोठा चाहतावर्ग आहे. ती नेहमीच आपल्या सोशल मीडियावरून आपल्या कामाची माहिती, चाहत्यांपर्यंत पोहचवत असते.

मात्र माघील काही दिवसांपासूनची तिच्या पोस्टवरुन कदाचित तीच येणाऱ्या ‘ती परत येतीय’ मालिकेची प्रमुख अभिनेत्री आहे, असा कयास अनेकांनी लावला आहे. भेट लागी जीवा आणि जिगरबाज या मालिकेत काम करणाऱ्या श्रेयस राजेची देखील या मालिकेत मुख्य भूमिका असणार आहे, असं बोललं जात आहे.

प्रसिद्ध मराठी मालिका फुलाला सुगंध मातीचा या मालिकेत त्याने राजकुमाराची भूमिका साकारली होती. देवमाणूस या मालिकेची तुफान लोकप्रियता आहे, आता त्याच मालिकेच्या जागी थ्रिलर मालिका घेऊन मेकर्स येत आहेत. मात्र, देवमाणूस मालिकेची लोकप्रियता आणि स्तर कायम ठेवणे आता मोठं आव्हान झी मराठीवर असणार आहे.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *