किशोर नांदलस्कर यांची ‘ही’ शेवटची इच्छा राहिली अपूर्ण, वाचून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी…

किशोर नांदलस्कर यांची ‘ही’ शेवटची इच्छा राहिली अपूर्ण, वाचून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी…

ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचे दोन दिवसांपूर्वीच करणाने नि’धन झाले. त्यांचे वय हे 70 वर्षाच्या वर होते. त्यांनी आपल्या अभिनयाने अनेकांना मंत्रमुग्ध केले होते. त्यांनी जवळपास 40 नाटक 25 मालिका आणि 25 चित्रपटांमध्ये काम केले होते. त्यांनी सर्वात शेवटी सिंघम या चित्रपटात काम केले होते.

या चित्रपटात ते मंत्र्याच्या केबिन बाहेर उभे असलेले शिपाई होते. त्यांचा रोल हा छोटा असला तरी अनेकांना तो खूप आवडला होता. विशेष करून किशोर नांदलस्कर यांची भूमिका ही गोविंदा यांच्यासोबतच्या जिस देश मे गंगा रहता है, या चित्रपटांमध्ये गाजली होती.या चित्रपटामध्ये गोविंदा याची भूमिका होती. गोविंदा याची भूमिका चांगली होती.

मात्र, तरी देखील किशोर नांदलस्कर यांची भूमिका ही अतिशय भाव खाऊन गेली होती. या चित्रपटामध्ये शक्ती कपूर यांची देखील भूमिका होती. तसेच रिंकी खन्ना हिने देखील या चित्रपटात भूमिका केली होती. मात्र, सर्वांना ही भूमिका खूप आवडली होती. किशोर नांदलस्कर गेल्यानंतर अनेकांनी त्यांच्याबद्दलच्या आठवणींना उजाळा करून दिला आहे.

किशोर नांदलस्कर हे छोट्या-मोठ्या भूमिका जरी चित्रपटात करीत असले तरी ते खूप श्रीमंत असे व्यक्तिमत्त्व होते. नागपाडा येथे त्यांचा भला मोठा बंगला आहे. या बंगल्यामध्ये अनेक चित्रपटांचे चित्रीकरण होत असते. मालिकांचे चित्रीकरण देखील येथे होत असते. त्यामुळे ते या बंगल्याच्या माध्यमातून आपला उदरनिर्वाह चालवत होते.

तसेच मुंबईमध्ये त्यांचे दोन फ्लॅट देखील असल्याचे सांगण्यात येत होते. या फ्लॅटच्या माध्यमातून ते आपले दैनंदिन खर्च भागवत होते. किशोर नांदलस्कर गेल्यानंतर अनेक अभिनेत्यांनी त्यांच्याबद्दलच्या आठवणी सो’शल मी’डियाच्या माध्यमातून शे’अर केल्या आहेत. ज्येष्ठ अभिनेते विजू माने यांनी देखील त्यांच्याबद्दलची आठवण शेअर केली आहे.

विजू माने यांनी किशोर नांदलस्कर यांच्या बद्दलची आठवण सांगताना म्हटले आहे की, 2014 मध्ये आम्ही एका चित्रपटाचे चित्रीकरण करत होतो. त्यावेळी एका गाण्याचे चित्रीकरण आम्हाला करायचे होते. या वेळी ज्येष्ठ अभिनेते रमेश देव म्हणाले की, आपण सर्वजण मिळून नाचू या चित्रपटामध्ये रमेश देव, सीमा देव, उदय सबनीस आणि किशोर नांदलस्कर हे सर्वजण त्या गाण्यावर नाचू लागले.

या वेळी विजू माने हे किशोर यांना घेऊन बाजूला गेले. त्यावेळी किशोर नांदलस्कर विजू माने यांना म्हणाले होते की, रमेश देव यांचे किती वय असेल त्यावेळेस विजू माने म्हणाले होते की, त्यांचे वय ८० वर्ष आसपास आहे.

त्यानंतर किशोर नांदलस्कर म्हणाले की, मला देखील या वयात आल्यानंतर नाचायचे आहे, त्यावर माने म्हणाले की, आपण एखादा चित्रपट करू आणि तुझी ही इच्छा पूर्ण करू, असे सांगतांना विजू माने हे अतिशय भावनिक झाली. किशोर नांदलस्कर यांची ही इच्छा मला पूर्ण करता आली नाही, असे त्यांनी सांगितले. असे सांगताना त्यांना त्यांच्या भावना अनावर झाल्या होत्या.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *