निशब्द ! ‘आई कुठे काय करते’च्या सेटवर वडिलांच्या नि’ध’नाची बा’तमी; तरीही ‘हा’ अभिनेता म्हणाला सीन पूर्ण करूनच…

निशब्द ! ‘आई कुठे काय करते’च्या सेटवर वडिलांच्या नि’ध’नाची बा’तमी; तरीही ‘हा’ अभिनेता म्हणाला सीन पूर्ण करूनच…

दे’शात आणि रा’ज्यात सगळीकडेच को’रो’नाच्या दुसऱ्या ला’टेच्या प्रादुर्भाव वाढतच आहे. ह्यामध्ये सगळीकडेच प’रिस्थिती अ’त्यंत भ’यंक’र आणि दु’र्दै’वी आहे. ह्याच पार्श्वभूमीवर रा’ज्यातील को’रो’नाचा वा’ढता प्रा’दुर्भा’व बघता सर्व मालिका शूटिंग वर बं’दी घा’लण्यात आली होती. त्यामुळे, मराठी मालिकांचे शूटिंग सध्या राज्याच्या बाहेर सुरु आहे.

सिल्व्हासाला मालिकेचं शूटिंग
महाराष्ट्रात लॉ’कडा’ऊन लागू झाल्यानंतर मालिकांचं शूटिंग सध्या राज्याबाहेर ह’लवण्यात आलं आहे. ‘आई कुठे काय करते’चं शूट सध्या सिल्व्हासा येथे होत आहे. अभिच्या साखरपुड्याच्या निमित्ताने देशमुख मंडळी मुंबई सोडून गावातल्या घरी राहायला आल्याचा बदल ह्या कथानकात करण्यात आला आहे.

कुटुंबातील सर्वच सदस्य मालिकेत दिसत असताना मिश्किल भूमिकेने लक्ष वेधून घेणाऱ्या आप्पांची अनुपस्थिती सर्वांना जाणवत होती. आप्पा तात्यांकडे राहायला गेल्याचं मालिकेत दाखवलं असलं, तरी पि’तृशो’क झाल्याने किशोर महाबोलेंना काही काळ मालिकेचं शूटिंग करता आलं नाही. सिल्व्हासाला निघण्यापूर्वीच ही दुःख’द बा’तमी आली होती.

रंगदेवतेने ‘शो मस्ट गो ऑन’ हे ब्रिद जणू अनेक कलाकारांच्या भाळी लिहिलं आहे. म्हणून वैयक्तिक आयुष्यात कितीही क’ठीण प्र’संग आला, तरी रसिक प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी आपल्या एका डो’ळ्यातले ‘आसू’ लपवत, चेहऱ्यावर उसने ‘हासू’ असल्याचा अभिनय कलाकारांना करावा लागतो.

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ मालिकेत अप्पांची भूमिका साकारणारे प्रख्यात अभिनेते किशोर महाबोले ह्यांच्या वाट्याला देखील असाच अति-भावुक क्षण आला. मात्र त्यांनी तरीदेखील मालिकेचं शूटिंग पूर्ण करण्यावर भर दिला.

अभिनेते किशोर महाबोले ह्यांच्या वडिलांचे दोन आठवड्यांपूर्वी दुः’खद नि’ध’न झाले. आपल्या वडिलांच्या नि’ध’नाची दुःखद बा’तमी कळल्यानंतरही महाबोलेंमधील कलाकार जागा होता. सगळं दुःख आपल्या आतमध्ये ठेवून, चेहऱ्यावर आनंदी भाव आणत त्यांनी चक्क मालिकेतील एक मि’श्किल सी’न चित्रित केला.

मनामध्ये वा’दळ असतानाही आपण शांत आणि आनंदी असल्याचा अभिनय केला आणि आणि मगच ते निघाले. ‘आई कुठे काय करते’ मालिकेत अप्पांच्या मुलाची भूमिका साकारणाऱ्या अनिरुद्धने अर्थात प्रख्यात अभिनेते मिलिंद गवळी यांनी सो’शल मी’डियावर आपले ‘ऑनस्क्रीन वडील’ ‘ऑफस्क्रीन पुत्र’ म्हणून कसे आहेत, हे सांगितलं.

अभिनेते मिलिंद गवळी ह्यांनी केली इ’न्स्टाग्रा’म पोस्ट
आप्पा आणि अनिरुद्ध देशमुख जवळजवळ दीड वर्ष बाप आणि मुलगा… आई कुठे काय करते या सिरीयलमध्ये मनातल्या भा’वनांशी खे’ळत आहेत, अनिरुद्धचा आप्पांवर खूप जीव, प्रेम आहे. आप्पांची भूमिका करणाऱ्या किशोर महाबोले यांच्यावर मिलिंद गवळीचा जीव आहे, आदर आहे, प्रेम आहे, खूप शिकायला मिळालं या दीड वर्षाच्या काळात.

असंख्य कविता त्यांच्या मुखोद्गत आहेत, व. पु. काळे तोंडपाठ आहेत, सगळ्यांनाच प्रश्न पडतो मोठमोठे डायलॉग त्यांचे असे पाठ असतात. अतिशय बुद्धिमान, मेहनती आणि हसमुख, आप्पांशिवाय सेटवर कोणालाच करमत नाही, आप्पा हे किरदार सगळ्यांनाच आवडतं. त्यात खूप किशोर महाबोले आहेत, असं मिलिंद गवळींनी लिहिलं आहे.

माझी आणि त्यांची ओळख आई कुठे काय करतेच्या सेटवरच झाली, पहिल्या दिवसापासूनच त्यांच्या मिश्किल स्वभावाने मन जिंकून घेतलं, अतिशय शांत आणि हसमुख स्वभाव, पण एकदा जर तार स’टकली, मग कोणाच्या बापाला ते ऐकत नाहीत.

या दीड वर्षांमध्ये एकदा दोनदाच स’टकली होती आणि क्षणात शांतही झाले आणि कारण काय तर कोणी तरी त्यांचं चार्जर लं’पा’स केलं आणि त्यांना त्यांचा मोबाईल चार्ज करता आला नाही आणि त्यांच्या बायकोशी त्यांना बोलता आलं नाही, म्हणून ती तार स’टकली होती, त्या दिवशी कळलं की बायकोवर किती किती प्रेम आहे आणि किती ते तिला मिस करतात, त्यांच्या मिसेसने त्यांना एखादी गोष्ट सांगितली. तर जग इकडचं तिकडे झालं तरी ते ती ऐकतात, त्यांचा शब्द पाळत, किशोरजींना एकुलती एक मुलगी आहे, तिच्यावर ते छोट्या छोट्या गोष्टींसाठी अवलंबून असतात, ती म्हणेल तसं ते करतात, असंही मिलिंद गवळींनी लिहिलंय.

नक्की त्या दिवशी काय घ’डलं ?
छोटंसं सुखी कुटुंब, कौटुंबिक माणसाने कसे राहावे हे आप्पांकडून शिकण्यासारखं आहे. या क’रो’नाच्या क’ठीण का’ळामध्ये आम्ही एकत्रच आम्ही या सिरीयल शूटिंग करतो आहोत. लॉ’कडा’ऊनमध्येही शूटिंग चालू होतं. खूप धैर्याने आणि शांतपणे आम्हाला सगळ्यांना आधार देत काम चालू ठेवलं.

दोन आठवड्यांपूर्वी त्यांच्या वडिलांचं नि’ध’न झालं, जेव्हा ही बा’तमी त्यांना कळाली तेव्हा आमचा एक मिश्कील असा सीन सुरू होता. बातमी ऐकून हा’दरू’न गेले, आमचे डायरेक्टर रवी करमरकर यांनी आप्पांना ता’बडतो’ब सोलापूरला निघायला सांगितलं आप्पा म्हणाले सीन पूर्ण करतो, मग निघतो, तो प्रसंग माझ्या डो’ळ्यासमोरून कधीही जाणार नाही.

आपल्या वडिलांची अशी बा’तमी कळल्यानंतर हे कलाकार ते सगळं दुः’ख त्याच्या आ’तमध्ये ठेवून चेहऱ्यावर आनंदी भाव आणून एक मिश्किल सीन करतो, म’नामध्ये वा’दळ असताना अभिनय करायचा, की आपण शांत आहोत, आनंदी आहोत, तो सीन केला त्यांनी आणि मग ते निघाले, अशी आठवण मिलिंद गवळींनी सांगितली आहे.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *