‘केबीसी’च्या पहिल्या ‘करोडपती’ विजेत्याची बायको आहे ‘ही’ प्रसिद्ध मराठी अभिनेत्री, पहा दिसते इतकी सुंदर…

‘केबीसी’च्या पहिल्या ‘करोडपती’ विजेत्याची बायको आहे ‘ही’ प्रसिद्ध मराठी अभिनेत्री, पहा दिसते इतकी सुंदर…

मनोरंजन

‘कौन बनेगा करोडपती’ (केबीसी) म्हणजे प्रेक्षकांचा आवडता शो. अमिताभ बच्चन गेल्या अनेक वर्षांपासून हा शो होस्ट करत आहेत. देशातील प्रत्येक व्यक्ती या शोचा भाग होण्याची वाट पाहत असतो, तसे प्रयत्न देखील भरपूर लोक करतात पण त्यात यशस्वी मात्र मोजकेच लोक होतात.

कारण या शो च्या मार्फ़त अनेक लोकांचे स्वप्न पूर्ण झाले आहेत. तसेच पर्यंत मोजकेलंच लोक करोडपती झाले आहेत. फक्त काही १५ प्रश्नांची उत्तरे देऊन तुम्ही करोडपती होऊ शकता. पण ते प्रश्न फार साधे नसतात त्यासाठी गहन अभ्यास लागतो. पण याशोचा पहिला विजेता कोण हे तुम्हाला माहित आहे का ? त्याचे नाव हर्षवर्धन नवाथे.

मुंबईचे हर्षवर्धन नवाथे त्यावेळी 27 वर्षांचे होते आणि आयएएस ऑफिसर होण्याचे स्वप्न त्यांनी उराशी बाळगले होते. 2000 साली हर्षवर्धन केबीसीचे विजेते ठरले होते. या नवाथेंची आणखी एक ओळख सांगायची तर ते एका मराठी अभिनेत्रीचे पती आहेत.

होय, हर्षवर्धन यांची पत्नी मराठीची लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिचे नाव सारिका नीलत्कर. 2000 साली हर्षवर्धन केबीसीचे विजेते ठरले होते. त्यानंतर सात वर्षांनी म्हणजे 29 एप्रिल 2007 साली सारिका नीलत्करसोबत त्यांचे लग्न झाले. सारिका या मराठी चित्रपट, टीव्ही आणि रंगभूमीवर कार्यरत आहेत.

चाणक्य, जास्वंदी या नाटकांत सारिकाने काम केले. शिवाय दुरदर्शनवरील ‘गुलाम ए मुस्तफा’ या हिंदी मालिकेत भूमिका साकारली. 2012 मध्ये आलेल्या ‘अजिंक्य’ या चित्रपटात सारिकाला तुम्ही पाहिलं असेल. 2006 साली ‘पहिली शेर दुसरी सवाशेर नवरा पावशेर’ या चित्रपटात सारिकाने अभिनेते अशोक सराफ यांच्यासोबत काम केले होते.

2008 साली संदीप कुलकर्णीसोबत ‘एक डाव संसारा’चा या चित्रपटातही ती झळकली होती. कलर्स वाहिनीवरच्या ‘कुंकू, टिकली आणि टॅटू’ या मालिकेत तिने विभा कुलकर्णीची व्यक्तिरेखा साकारली होती. मोलकरीण बाई या मालिकेत त्यांची भूमिका विशेष लक्षवेधी ठरली.

सारिका आणि हर्षवर्धन यांचे लव्ह मॅरेज नसून अरेंज्ड मॅरेज आहे. कुठल्याही फिल्मी पार्टीत त्यांची भेट झाली नव्हती. आईवडिलांनी निवडलेल्या मुलीसोबत हर्षवर्धन यांनी लग्न केले. या दाम्पत्याला दोन मुले आहेत. थोरला मुलगा सारांश तर धाकटा मुलगा रेयांश आहे. हर्षवर्धन आता डच बेस्ड रिक्रूटमेंट कंपनीत चीफ ऑपरेटिंग ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *