एकेकाळी कोहली आणि शिखर धवन सोबत खेळत होता क्रिकेट, आज आहे प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता, क्रिकेट सोडल्याचा होतोय पचाताप…

भारतामध्ये क्रिकेट आणि बॉलिवुड यांचे नाते सर्वश्रुत आहे. बॉलिवुड आणि क्रिकेटमध्ये खूप चांगले जमत असल्याचे उदाहरणं आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात आहेत. काही वर्षांपूर्वी वेस्टइंडीजचे क्रिकेटर विवियन रिचर्ड्स यांनी भारतीय अभिनेत्री नीना गुप्ता यांच्याशी लग्न केले होते. या दोघांना एक अपत्य असून ती सध्या बॉलिवुडमध्ये फॅशन डिझायनर चे काम करते.
याप्रमाणेच काही अभिनेते आहेत, ज्यांनी पहिल्यांदा क्रिकेटमध्ये करियर केले. त्यानंतर बॉलिवूडमध्ये आपले नशीब आजमावले. मात्र, यामध्ये फारच कमी जणांना यश मिळाले आहे. उदाहरण घ्यायचे झाले तर आपण सलील अंकोला या क्रिकेटर्सचे घेऊ शकतो. सलील अंकोला याने काही क्रिकेट सामने खेळले होते.
मात्र, असे असतानाही त्याने मध्येच क्रिकेट सोडून बॉलिवूडमध्ये करिअर करण्यासाठी आपला मोर्चा वळवला. मात्र, त्याला बॉलिवूडमध्ये देखील फारसे यश नाही. काही जाहिराती आणि मॉडेलिंग करून त्याने थोड बहुत नाव कमावले होते. संजय दत्त याच्या कुरुक्षेत्र या चित्रपटांमध्ये सलील अंकोला हा दिसला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केले होते.
मात्र, त्यानंतर त्याला हवे तसे यश मिळाले नाही. त्यानंतर भारताचा एकेकाळी चा आक्रमक फलंदाज अजय जडेजा याने देखील मॅच फिक्सिंगचे आरोप झाल्यानंतर क्रिकेट सोडले. त्यानंतर तो बॉलिवूडमध्ये नशीब आजमावण्यासाठी गेला. मात्र, त्याला फारसे यश मिळालेच नाही. त्याचप्रमाणे विनोद कांबळी याने देखील क्रिकेट सोडून बॉलिवूडमध्ये काही चित्रपट केले.
मात्र, त्याच्या चित्रपटाकडे प्रेक्षक आणि साफ पाठ फिरवली. अलिकडचे आक्रमक खेळाडू विराट कोहली आणि शिखर धवन हे सध्या खूप चर्चेत आहेत. सध्या शिखर धवन हा भारताच्या बी टीमचे नेतृत्व करत आहे, तर विराट कोहली हा ए टीएमचे नेतृत्व करत आहे. 18 ते 22 जून दरम्यान होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सामना होणार आहे, याचे नेतृत्व सध्या विराट कोहलीकडे आहे.
न्यूझीलंड सोबत हा सामना होणार आहे. या सामन्याकडे सगळ्यांचेच लक्ष लागलेले आहे. हे सांगण्याचे कारण म्हणजे या दोघांसोबत खेळलेला एक अभिनेता सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. या अभिनेत्याचे नाव ‘करण वाही’ असे आहे. करण वाही याने 2003 मधून क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. 2017 मध्ये एक मुलाखत त्याने दिली होती.
त्यामुळे तो म्हणाला होता की, विराट कोहली आणि शिखर धवन माझे चांगले मित्र आहेत. शिखर धवन सोबत मी अंडर नाईन्टीन चे सामने दिल्लीकडून खेळलेले आहेत. आमच्या मध्ये खूप चांगली मैत्री आहे. मात्र, त्यानंतर मी क्रिकेटमध्ये फारसे यश मिळवू शकलो नाही. त्यामुळे बॉलिवूडकडे आपला मोर्चा वळवला. विराट कोहली देखील माझा चांगला मित्र आहे.
आणि आमच्या मध्ये संभाषण होत असते, असेही तो म्हणाला. विराट कोहली याला वेगवेगळे पदार्थ खायला खूप आवडतात, असेही तो म्हणाला. किरण वाही याने दिल मिल गये, कुछ तो लोग कहेंगे, तेरी मेरी लव स्टोरी, दावत ए इश्क, हेट स्टोरी 4 यासारख्या मालिका व चित्रपटांतून काम केले आहे. 2018 मध्ये आलेल्या स्क्रेड गेम्स या वेब सिरीज मध्ये देखील त्याने काम केले आहे.