अतिशय सुंदर आणि ग्लॅमरस दिसते जयवंत वाडकर यांची लेक, सौंदर्यापुढे मराठी अभिनेत्रीही पडतील फिक्या, पहा फोटो..

अतिशय सुंदर आणि ग्लॅमरस दिसते जयवंत वाडकर यांची लेक, सौंदर्यापुढे मराठी अभिनेत्रीही पडतील फिक्या, पहा फोटो..

मराठी सिनेसृष्टीमध्ये असे अनेक कलाकार आहे ज्यांनी आपल्या अभिनयाची छाप मराठीच तर हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटातही सोडली. अनेक मराठी कलाकार आजही हिंदी मराठी आणि दाक्षिणात्य चित्रपटात काम करत आहेत. तसेच आपल्या मराठी सिनेसृष्टी मधील दिग्ग्ज कलाकारांच्या मुली देखील आता आपल्या अभिनयाची छाप सोडण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.

त्यात सचिन पिळगावकर यांच्या मुलीचे नाव घ्यावे लागेल. सचिन पिळगावकर यांच्या मुलीचे नाव श्रेया पिळगावकर असे आहे तिने शाहरुख खान सोबत फॅन चित्रपटातून बॉलिवूड मध्ये पदार्पण केले होते. त्यात तिची भूमिका छोटी असली तरी महत्वाची होती. त्या नंतर तिने अनेक हिंदी चित्रपटात काम केले आहे.

मिर्झापूर सिरीज मध्ये देखील ती झळकली होती. तसेच लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डेने देखील मराठी सिनेसृष्टीत ‘ती सध्या काय करते’ या चित्रपटातून धमाकेदार एन्ट्री केली होती. त्याच्या पाठोपाठ स्वानंदी बेर्डे देखील अभिनयाचे धडे घेत आहे आणि ती सुद्धा लवकर अभिनय क्षेत्रात पदार्पण करेल. पण आज आपण जयवंत वाडकरच्या मुलीबद्दल बोलणार आहोत.

हिंदी आणि मराठी सोबतच दाक्षिणात्य चित्रपटातही जयवंत वाडकर यांनी काम केलं आहे. चित्रपट, मालिका आणि नाटकांमध्ये त्यांनी एकाहून एक सरस भूमिका साकारल्या आहेत. आज त्यांचा वाढदिवस असून त्यांचे चाहते त्यांना सोशल मीडियाद्वारे शुभेच्छा देत आहेत.

जयवंत वाडकर यांनी १९८८ साली ‘तेजा’ब’ या हिंदी चित्रपटातून करिअरची सुरुवात केली. तर मराठीत त्यांनी १९८८ साली एक गाडी बाकी अनाडी या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत एन्ट्री केली. आतापर्यंत त्यांनी मराठीत १०० हून अधिक तर हिंदीत ४५ हून अधिक चित्रपटात काम केले आहे.

याशिवाय छोट्या पडद्यावरही त्यांनी भरपूर काम केले आहे. जयवंत वाडकर यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. तन्मय वाडकर हे त्यांच्या मुलाचे नाव असून स्वामिनी हे मुलीचे नाव आहे.

जयवंत वाडकर यांची कन्या स्वामिनी वाडकर हिनेदेखील वडिलांचा अभिनयाचा वारसा पुढे नेण्याचे ठरवले आहे. स्वामिनीने महेश मांजरेकरांच्या ‘एफ यू’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केेले होते. तसेच सचिन पिळगावकर यांच्या ‘ये है आशिकी’ या चित्रपटात तिने काम केले होते. स्वामिनी सोशल मीडियावर सक्रिय असून तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अनेक ग्लॅमरस फोटोज शेअर करत असते.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *