‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील जयदीपचा सख्खा भाऊ आहे त्याच्यापेक्षाही प्रसिद्ध अभिनेता…

मनोरंजन
याच महिन्यात राखी पौर्णिमा आहे. त्यामुळे आता सेलेब्रिटी सिबलिंग्स म्हणजेच भाऊ-बहिणीच्या जोडीची चर्चा सगळीकडेच सुरु झाली आहे. याकाळातच आपल्या आवडत्या सेलेब्रिटी कलाकारांचे भाऊ बाहीण आपल्याला समजतात.
अनेकवेळा हे कलाकार आपल्या कुटुंबासोबतचे फोटो शेअर करत असतात, मात्र ते प्रत्येक वेळी त्याकडे लक्ष जातेच असे नाही. यामुळे अनेक कलाकारांचे भाऊ बहीण एकाच क्षेत्रात यशस्वीरीत्या काम करत असले तरीही ते आपल्या लक्षात येत नाही. या चंदेरी दुनियेत हे कलाकार आपल्या कामात व्यस्त असतात आणि त्यामुळे आपल्या कुटुंबासोबत घालवायला त्यांना फारसा वेळ मिळत नाही.
अशा वेळी, राखी, दिवाळी असे सण आणि उत्सवच असतात जेव्हा ते आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवतात. तेव्हा ते भाऊ-बहीण असल्याचं आपल्याला समजत आणि मग त्यांची जोरदार चर्चा सुरु होते. सध्या अशाच एका जोडीची सगळीकडेच चर्चा सुरु आहे. दोन अगदी उमदा अभिनेत्याची सध्या सगळीकडेच चर्चा सुरु आहे.
सुख म्हणजे नक्की काय असत या लोकप्रिय मालिकेत जयदीपची भूमिका साकारणारा मंदार जाधव आज घराघरात पोहोचला आहे. या मालिकेच्या आधी त्याने वीर शिवाजी, क्राईम पेट्रोल अशा हिंदी मालिकांमध्ये मंदारने काम केलं आहे. हिंदी मालिकांमध्ये देखील मंदारच्या लूकची आणि दमदार अभिनयाची चांगलीच चर्चा होत होती.
आता तो मराठी मालिकेमध्ये काम करत आहे आणि याच मालिकेने त्याला लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचवले आहे. मात्र तुम्हाला कदाचित ठाऊक नसेल मंदारचा भाऊ देखील हिंदी मालिकांमध्ये काम करतो. मंदारच्या भावाचे नाव मेघन आहे, त्याने एकता कपूरच्या तेरे लिये या मालिकेमधून अभिनयसृष्टीमधे पदार्पण केले.
तेरे लिये मालिकेत देखील मेघनच्या कामाची चांगलीच चर्चा रंगली होती. त्यानंतर त्याने कधीच माघे वळून पहिले नाही. त्याने अनेक हिंदी मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. महाकाली या लोकप्रिय मालिकेमध्ये त्याने कार्तिकीची भूमिका साकारली होती. आणि सध्या सोनी वाहिनीवर सुरु असलेल्या विघ्नहर्ता गणेश मालिकेमध्ये ते माधवदासची भूमिका साकारत आहे.
मेघन आणि मंदार या दोघांचा देखील भलामोठा चाहतावर्ग आहे. अनेकवेळा मंदार आणि मेघन ब्रो-कोड म्हणतं सोबत वर्कआऊट करतानाचे फोटो अनेक वेळा शेअर करत असतात. मेघन जाधव देखील आपल्या भावाप्रमाणेच हँडसम दिसतो. मंदारची पत्नी मितिका शर्मा देखील अभिनेत्री आहे. तिने अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केलं आहे.
देवों के देव महादेव या मालिकेत देखील तिने काम केले आहे. मंदार आणि मितिकाला एक मुलगी देखील आहे. मंदार आपल्या सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतो. आपल्या कुटुंबासोबतचे अनेक फोटोज तो त्यावरून शेअर करत असतो. तर मेघन आपल्या पुतणीसोबत फोटो शेअर करतच असतो. माझी क्युट एंजेल म्हणून अनेकवेळा मेघन आपल्या पत्नीचे फोटो आपल्या सोशल मीडियावर शेअर करत असतो. या दोघं भावांची जोडी सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे.