‘दृश्यम’ सिनेमातील अजय देवगनची मुलगी आहे ‘या’ सुपरस्टार अभिनेत्याची पत्नी…

काही सिनेमा आणि मालिका नेहमीच प्रेक्षकांच्या मनात घर बनवून असतात. अनेक मालिका आणि सिनेमा बनत राहतात मात्र त्यापैकी काहीच चाहत्यांच्या मनात कायमची जागा निर्माण करतात. सुरुवातीच्या काळात अनेक हिंदी मालिका वेगवेगळ्या विषयांवर बनत होत्या. सध्या जसे सासू-सुनांचे भावनिक कथानक सुरु असते, तसे सुरुवातीच्या काळात नव्हते.
अनेक वेगळ्या आणि खास विषयांवर आधारित मालिका बनवल्या जात होत्या. मालगुडी डेज, ब्योमकेश बक्षी, वागले की दुनिया, फौजी, मुंगेरीलाल की हसीन दुनिया, खानदान, शांती अशा सर्व विषयांवर आधारित मालिका बनत होत्या. कॉमेडी, थ्रिलर, ड्रामा, यांच्यासोबत महाभारत, रामायण, ओम नमः शिवाय सारख्या मायथॉलॉजिकल मालिकांनी देखील चाहत्यांना वेड लावले होते.
त्याचबरोबर मधल्या काळात देखील काही मालिका वेगळ्या कथानकांवर आधारित बनवल्या गेल्या होत्या. अशीच एक लग्नानंतर मुलींना आपल्या आईवडिलांची काळजी घ्यायची असल्यास कसा संघर्ष करावा लागतो या विषयवार आधारित ‘एक घर बनाउंगा’ मालिका प्रदर्शित झाली होती. या मालिकेचे देखील अनेक चाहते निर्माण झाले होते.
खास करुन मालिकेची अभिनेत्री पूनम म्हणजेच इशिता दत्त्ताला चांगलीच लोकप्रियता मिळाली होती. मिस इंडिया तनुश्री दत्ताची बहीण इशिताने टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधून अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. आपल्या पहिल्याच मालिकेतून, प्रेक्षकांच्या मनात वेगळी जागा निर्माण करण्यात तिला यश मिळाले. त्यानंतर काही जाहिरातींमध्ये ती झळकत राहिली.
आणि २०१५ मध्ये बनलेल्या अजय देवगनच्या दृश्यम या सिनेमामधून तिने बॉलीवूडमध्ये एंट्री घेतली. या सिनेमामध्ये तिच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक करण्यात आले होते. त्यानंतर साऊथमध्ये काही सिनेमा करुन तिने २०१७ मध्ये लग्न केले. तिचा पती मनोरंजन जगातील एक नावाजलेला अभिनेता आहे. सुरुवातीच्या काळात म्हणजेच ९०च्या दशकात जस्ट मोहब्बत मालिका प्रदर्शित झाली होती.
या मालिकेने अक्षरशः छोट्यांपासून ते मोठ्यानं वेड लावले होते. एका छोट्या मुलाची, कॉलेजात जाण्यापर्यतची कथा त्यामध्ये दाखवण्यात आली होती. या मालिकेतील सर्वच पात्र चांगलेच लोकप्रिय देखील झाले होते. खास करून जय मल्होत्राचे पात्र तर सर्वांच्या खास पसंतीस उतरले होते. बॉलीवूडचा अभिनेता वत्सल शेठने ही भूमिका साकारली होती.
आपल्या पहिल्याच मालिकेमधून वत्सल शेठने प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. त्यानंतर त्याने अनेक मालिकांमध्ये आणि काही म्युझिक अल्बम मध्ये देखील काम केले होते. त्याने बऱ्याच सिनेमामध्ये देखील काम केले आहे. हाच वत्सल शेठ इशिताचा नवरा आहे. रीश्तो का सौदागर-बाजीगर या मालिकेत त्या दोघांनी सोबत काम केले होते. याच मालिकेच्या दरम्यान ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि वर्षाच्या आत दोघांनी लग्न सुद्धा केले.
इशिता आणि वत्सल या दोघांनाही आपले वैयक्तिक आयुष्य सर्वांसोबत शेअर करायला फारसे आवडत नाही. दोघेही सोशल मीडियावर सक्रिय असतात, मात्र अगदी मोजक्याच बाबी ते आपल्या सोशल मीडियावरून शेअर करत असतात. इशिता सध्या थोडा बदल थोडा पाणी या मालिकेतून लवकरच प्रेक्षकांना भेटायला येत आहे. तर वत्सल शेठ प्रभासच्या आदिपुरुष या सिनेमात झळकणार आहे.