बाबो ! अतिशय सुंदर आणि हॉ’ट दिसते इशांत शर्माची बायको, तिच्या समोर अनुष्का शमार्च काय बॉलिवूडच्या अभिनेत्र्या देखील पडतील फिक्या….

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माने क्रिकेट विश्वात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे आणि तो टीम इंडियाच्या प्रमुख गोलंदाजांपैकी एक आहे. तथापि, आतापर्यंत त्याची कारकीर्द चढउतारांनीच भरली आहे. त्याने १२ वर्षांपूर्वी २००७ मध्ये आपल्या करिअरची सुरुवात केली होती. बांगलादेशविरुद्ध २००७ मध्ये ढाका येथे पहिला कसोटी सामना खेळला होता.
यानंतर इशांतने २००७ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरूद्ध पहिला एकदिवसीय सामना खेळला होता. एका वर्षानंतर या वेगवान गोलंदाजाने टी -२० मध्येही पदार्पण केले. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला टी -२० सामना खेळला होता. प्रथम श्रेणी आणि रणजी कारकीर्दीबद्दल बोलायचं झालं तर इशांतने २००७ साली टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीसह आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली.
तसेच इशांत शर्मा आता मोटेरा येथे खेळल्या जाणार्या तिसर्या कसोटी सामन्यात तो आपला 100 वा कसोटी सामना खेळेल, आणि या सामन्यात त्यांची पत्नी प्रतिमा सिंह देखील याचे मनोबल वाढविण्यासाठी हजेरी लावणार आहे, तसेच त्याची पत्नी प्रतिमाबद्दल बोलायचे झाले तर ती सो’शल मी’डियावर भरपूर प्रमाणत अॅक्टिव असते.
तसेच आपल्यापैकी बऱ्याच लोकांना इशांतच्या प’त्नीबद्दल फ़ारच कमी माहिती असेल पण आपणास सांगू इच्छितो कि प्रतिमा देखील दिसण्यात अनेक अभिनेत्रींना देखील मागे टाकेल इतकी ती सुंदर आणि मनमोहक आहे. यूपीच्या बनारस येथे ज’न्मलेली प्रतिमा बास्केटबॉलमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करते आहे. ती भारतीय महिला बास्केटबॉल संघाची सदस्य आहे.
2003 मध्ये वयाच्या 13 व्या वर्षी तिने बास्केटबॉल खेळायला सुरुवात केली होती आणि 2006 मध्ये प्रथम तिने भारतीय कनिष्ठ महिला बास्केटबॉल संघात प्रवेश केला होता आणि २००८ मध्ये ती या संघाची कर्णधार बनली. प्रतिमा एक बास्केटबॉल खेळाडू असल्यामुळे, तिची उंची देखील अगदी इशांत सारखी आहे.
तसेच इशांत शर्माची प्रेमकथा एखाद्या फिल्मी कथेपेक्षा कमी नाही. इशांत शर्मा यांनी १० डिसेंबर २०१६ रोजी भारतीय महिला बास्केटबॉल खेळाडू प्रतिमा सिंहशी लग्न केले. प्रतिमा सिंग आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल खेळाडू आहे. ५ बहिणींमध्ये ती सर्वात धाकटी आहे.
दोघांच्या पहिल्या भेटीबद्दल, प्रतिमाची मोठी बहीण दिव्या यांनी एकदा सांगितले की २०१३ मध्ये इशांत दिल्ली येथे झालेल्या बास्केटबॉल स्पर्धेत प्रमुख पाहुणे म्हणून आला होता. त्याच वेळी, तो प्रथमच प्रतिमाला भेटला. या सामन्यात प्रतिमाला दु’खाप’त झाली होती आणि ती खेळत नव्हती.
तिला स्कोअररची जबाबदारी मिळाली होती. इशांतने तिच्याकडे पाहिले आणि म्हणाला, “इथली स्कोअरर खूपच सुंदर आहे”. जेव्हा इशांत हे म्हणाला, तेव्हा त्याला माहित नव्हते की ही प्रतिमा आंतरराष्ट्रीय स्तराची खेळाडू आहे. मग येथून दोघांची ओळख झाली आणि बोलणं सुरू झाले.
दिव्याने या दोघांविषयी सांगितले होते की, इशांत जीजू जेव्हा रिकामे असत तेव्हा प्रतिमाचा सामना पाहण्यासाठी येत असत. वर्षभर बोलणं चालूच राहिले आणि या दोघांची मैत्री आणखी वाढली.” इशांतशी लग्न होण्यापूर्वीची गोष्ट सांगताना त्याची पत्नी प्रतिमाने एकदा सांगितले होते की, पहिल्या भेटीतच मला इशांतचा स्वभाव आवडला होता. पहिल्या भेटीनंतर त्याने माझा संपूर्ण सामना पाहिला होता. आमची मैत्री तिथूनच सुरू झाली आणि काही महिन्यांतच मैत्रीचे रुपांतर प्रे’मात झाले आणि मग २०१६ साली आमचं लग्न झालं.