बघुचर्चित ‘शेरशाह’ या हिंदी चित्रपटात ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीचा पती झळकणार जवानाच्या भूमिकेत..हिरोपेक्षा त्याचीच होतेय चर्चा..

ऑगस्ट महिना सुरु झाला आहे आणि देशभक्तीपर सिनेमा आणि मालिकांचे सत्र आता सगळीकडेच सुरु झाले आहे. देशभक्तीपर बऱ्याच नवीन वेब-सिरीज आणि सिनेमा या महिन्यात रिलीज होणार आहेत. अक्षय कुमारच्या बेल बॉटमचे ट्रेलर नुकतंच रिलीज झालं आहे.
अजय देवगणच्या भुज सिनेमाचे ट्रेलर देखील रिलीज झालं आहे. भुज मधील अजय देवगणची जबरदस्त डायलॉगबाजीने आधीच चाहत्यांची मनं जिंकली आहेत. सोबतच नोरा फतेही, सोनाक्षी सिन्हा आणि संजय दत्त यांच्या अभिनयाचे देखील कौतुक होत आहे. त्यामुळे सगळीकडेच त्या सिनेमाच्या चर्चेला उधाण आले आहे.
त्याचबरोबर अमेझॉन प्राईम वर अजून देशभक्तीपर एक सिनेमा रिलीज होत आहे. कारगिल युद्धाचा थरार घेऊन शेरशहा हा सिनेमा येत आहे. कारगिल विजय दिवस म्हणजेच २६ जुलै रोजी या सिनेमाचे ट्रेलर रिलीज करण्यात आले होते. तेव्हापासून या सिनेमाची चर्चा सुरु आहे. कारगिल युद्धामध्ये आपल्या शौर्याने दुष्मनाला हैराण करुन सोडणाऱ्या कॅप्टन विक्रम बत्रा हे या सिनेमाचा केंद्रबिंदू असणार आहेत.
कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या भूमिकेत सिद्धार्थ मल्होत्रा आकर्षक दिसत आहे. कियारा अडवाणी देखील या सिनेमामध्ये प्रमुख भूमिकेत असणार आहे. मात्र अजून एका अभिनेत्याचं चांगलंच कौतुक होत आहे. हिमांशू मल्होत्रा हा एका पराक्रमी जवानाच्या भूमिकेत झळकणार आहे. या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये हिमांशू, सिद्धार्थ इतकाच भाव खाऊन जात आहे.
आपल्या महाराष्ट्रामध्ये तर त्याच्या लूकची जरा जास्तच चर्चा होत आहे. तर हा हिमांशू दुसरा कोणी नसून मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरचा नवरा आहे. राजी सिनेमामध्ये अमृताने देखील महत्वपूर्ण भूमिका पार पडली होती. तिच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक करण्यात आले होते. आता तिच्या पाठोपाठ तिच्या नवऱ्याने देखील बॉलिवूडमध्ये दमदार पदार्पण केले आहे.
यापूर्वी देखील हिमांशूने अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केल आहे. काही हिंदी सिनेमामध्ये देखील त्याने छोटे-मोठे पात्र रेखाटले आहेत. मात्र सध्या शेरशहा या सिनेमामध्ये त्याची महत्वपूर्ण भूमिका असणार आहे आणि त्याचा लूकदेखील चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. हिमांशूने आपल्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे.
त्यामध्ये मी जवान देशाचा झेंडा फडकवणार असं कॅप्शन टाकलं आहे. त्याच्या या पोस्टला नेटकऱ्यांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे. या सिनेमाची चांगलीच चर्चा सगळीकडे रंगली आहे. १२ ऑगस्ट रोजी हा सिनेमा रिलीज होत आहे. कारगिल युद्धाची, त्याग आणि बलिदानाची कथा या सिनेमामध्ये सांगितली गेली आहे. दरम्यान अमृताने देखील आपल्या नवऱ्याची म्हणजेच हिमांशूची ती पोस्ट शेअर केली आहे.
हिमांशूच्या तुलनेत अमृता सोशल मीडियावर जास्त सक्रिय असते. आपले नवीन प्रोजेक्ट्स आणि काम याबद्दल ती आपल्या चाहत्यांना महिती देतच असते. हिमांशू आणि अमृताने आपल्या नात्याचा खुलासा नच बलिये या रियालिटी डान्स शोमध्ये केला होता. त्याआधी अनेकांना त्या दोघांच्या नात्याबद्दल माहिती नव्हते. अनेक चढउतार सहन करत अमृता आणि हिमांशूचे नाते आता अगदी घट्ट झाले आहे असं, स्वतः अमृता अनेक वेळा सांगते.