विराट कोहलीपेक्षाही अधिक मानधन घेतात ‘हे’ ५ क्रिकेटपटू; कोटींचा आकडा पाहून चकित व्हाल..

खेळ
क्रिकेटप्रेमींची प्रतीक्षा अखेर संपली. आयपीएलची पुन्हा सुरुवात झाली आहे. संपूर्ण जगाचे तिकडेच लक्ष आहे. कोणता खेळाडू कसा खेळ करतो, काय नवीन विक्रम नोंदवतो याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागलेले असते. केवळ आपल्या देशातच नाही तरं संपूर्ण जगात, आयपीएलचे करोडो चाहते आहेत.
प्रत्येक सामन्यासोबत एक नवीन खेळाडू उदयास येतो, हेच आयपीएलचे खास आकर्षण आहे. अनेक नवीन खेळाडू आपले कौशल्य दाखवत, भारतीय क्रिकेट संघात आपली जागा सुनिश्चित करण्याचा प्रयत्न करत असतात. हे सगळ्याच देशातील खेळाडूंच्या बाबतीत आपण पहिले आहे. आयपीएलचे अजून एक प्रमुख आकर्षण असते, आणि ते म्हणजे प्रत्येक खेळाडूला मिळणारी रक्कम.
प्रत्येक खेळाडूला, आयपीएलमध्ये भली मोठी रक्कम मिळते. कोणत्या खेळाडूला काय रक्कम मिळाली, याबद्दल देखील कायमच चर्चा रंगवली जाते. आपल्या देशात रोहित शर्मा, एम एस धोनी, विराट कोहली इ सर्वच खेळाडूंचे मानधन चांगलेच मोठे असते. विराट कोहली कायमच चर्चेत असतो. त्यातच त्याने, दोन मोठ्या ध’क्कादा’यक घोषणा केल्या आहेत.
त्यातून, सोशल मीडियावर चांगलाच वा’द पेटला. पहिली तर, या आयपीएलनंतर तो रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचे कर्णधारपद सोडणार आहे. मात्र याहून जास्त ध’क्कादा’यक घोषणा पुढची ठरली. टी-२० वर्ल्डकप नंतर, विराट कोहली भारतीय संघाचे देखील कर्णधार पद सोडणार आहे. विराट कोहलीच्या या निर्णयामुळे, जवळपास सर्वच स्तरातून त्याबद्दल त्याच्यावर टी’का देखील करण्यात येत आहे.
त्याबद्दल काहींनी त्याच्यावर चांगलीच टीका केली आहे तर, काहींनी त्या निर्णयाला योग्य देखील ठरवले आहे. यामध्ये विराट कोहलीच्या मानधना बद्दल देखील चांगलीच सुरु चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली. कोहलीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नेमकं किती मानधन मिळतं आणि इतर आंतरराष्ट्रीय खेळाडूंना मिळणाऱ्या मानधनाची तुलना करण्यात येत आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये, विराट कोहलीपेक्षा अधिक मानधन घेणारे खेळाडू कोण कोण आहेत, हे पण एकदा बघू. विराट कोहलीला आंतरराष्ट्रीय क्रिकेट साठी जितके मानधन मिळते त्यापेक्षा अधिक मानधन घेणारे पाच क्रिकेटपटू सध्या आहेत. बीसीसीआयकडून विराट कोहलीला सात कोटी रुपये वार्षिक मानधन मिळत.
1. जोस बटलर:- इंग्लंडचा यष्टीरक्षक म्हणजेच जोस बटलर वन-डे कसोटी आणि टी-20 या तिन्ही प्रकारांमध्ये इंग्लंडच्या क्रिकेट संघाचा भाग आहे. मागील दोन वर्षात त्याने देशाच्या कसोटी संघात पुनरागमन केले आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडून सध्या जोस बटलरला 19 कोटी इतके वार्षिक मानधन दिला जात.
2. स्टीव्ह स्मिथ:- स्टीव्ह हा ऑस्ट्रेलियातील सर्वात आघाडीचा क्रिकेटपटू आहे. हा देखील तिनही प्रकारात देशाच्या क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व करतो. यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्ड कडून त्याला चार मिलियन यु एस डॉलर म्हणजेच जवळपास 30 कोटी इतके मानधन दिलं जातं.
3. बेन स्टोक्स:- इंग्लंड क्रिकेट संघाचा एक अष्टपैलू खेळाडू म्हणून बेन स्टोक्सची ओळख आहे. सध्या तो क्रिकेटपासून दूर आहे मात्र, तरीही इंग्लंड क्रिकेट बोर्डाशी त्याचा करार आहे. त्यामुळे त्याला 8.85 कोटी इतका मानधन वर्षाला इंग्लंड क्रिकेट बोर्ड देत.
4. जोफ्रा आर्चर:- जोफ्रा आर्चर हा इंग्लंडचा सर्वात वेगवान गोलंदाज आहे. जोफ्रा देखील, कसोटी, वनडे आणि टी-20 या तिन्ही प्रकारांमध्ये इंग्लंडच्या संघाचं प्रतिनिधित्व करतो. आर्चरला 9.33 कोटी इतके मानधन इंग्लंड क्रिकेट बोर्ड देत.
5. जो रूट:- इंग्लंडचा कर्णधार जो रूट आणि कोहली या दोघांच्या मानधनामध्ये खूप जास्त फरक नाही. जो रूट याला देखील 7.22 कोटी इतका मानधन मिळतं. सध्या जो रूट इंग्लंडच्या कसोटी संघाचे नेतृत्व करतो, आणि कसोटी विश्वात सर्वाधिक मानधन घेणारा कर्णधार म्हणून तो अव्वल स्थानावर आहे.