हेमांगी कवीला ‘या’ अभिनेत्रीने दिला पाठींबा ! म्हणाली; स्त’न बेंबीपर्यंत गेले तरी चालेल, पण मी ब्रा घालणार नाही..

अभिनेत्री हेमांगी कवी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तसेच तिच्या चाहत्यांसोबत संवाद साधत असते. बऱ्याचदा ती सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत आली आहे. आता तिने बाई, बु’ब्स आणि ब्रा यावर फेसबुकवर पोस्ट शेअर केली आहे. तिच्या या पोस्टची जोरदार चर्चा होत असून ही पोस्ट व्हायरल होताना दिसत आहे.
हेमांगी कवीने या पोस्टमध्ये लिहिले की, बाईने तिचे बु’ब्स (स्त’न), त्याला असलेली पुरुषांसारखीच स्तनाग्रे आणि त्यांना धरून ठेवायला, झाकायला किंवा मला आवडत नाही पण लोक काय म्हणतील म्हणून लाजेखातर का होईना ब्रा वापरायची की नाही हा सर्वस्वी त्या बाईचा चॉइस असू शकतो! मग ती घरी असो किंवा सोशल मीडियावर किंवा कुठेही!
हाँ त्यावरून परिक्षण करण्याचा, त्याबद्दल घा णेरडया चर्चा आणि गॉसिप करण्याचा सुद्धा ज्याचा त्याचा चॉइस! तिने पुढे म्हटले की, पण यानिमित्ताने सांगावसं वाटतं…ब्रा, ब्रेसीयर (अं’तर्व’स्त्रा)चा चार लोकांसमोर किंवा सोशल मीडियावर तरी येताना वापरण्याचा, न वापरण्याचा, अ’श्लील’तेचा, त्या स्त्रीच्या संस्कारांचा, बुद्धिमत्तेचा आणि तिच्या इमेजचा जो काही संबंध जोडला जातो त्यासाठी स्त्रियांना त्यांच्याच शा’रीरिक स्वातंत्र्यासाठी अजून किती स्ट्रगल करायचाय हे लक्षात येतं!
आणि गंमत म्हणजे या चर्चा करणाऱ्यांंमध्ये पुरुषांपेक्षा स्त्रियाच जास्त अग्रेसर असतात. पुरुष निदान त्याची मजा घेऊन गप्प बसतात पण स्त्रिया स्वतः त्यातून जात असताना ही खालच्या स्तराला जाऊन चर्चा करून कुठलं पदक मिळवतात कुणास ठाऊक! हेमांगी कवीने समाजाच्या मा’नसिकतेबाबत म्हटले की, टीशर्ट मधून पुरुषांची दिसणारी स्त नाग्रे किंवा कपड्यांमधून दिसणारा त्याचा कुठलाही अवयव किती नैसर्गिक पद्धतीने आपण पाहतो किंवा दुर्लक्ष करतो? सवयीचा भाग म्हणूनच ना!
दरम्यान, तिची हि पोस्ट चर्चेत असताना तिला एका हॉलिवूड अभिनेत्रीची साथ मिळाली आहे. या अभिनेत्रीने कधीही ब्रा घालणार नसल्यचे म्हटले आहे. हॉलिवूड अभिनेत्री गिलियन अँडरसनने नुकताच सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी गप्पा मारल्या.
दरम्यान तिने, ‘मी खूप आळशी आहे आणि यापुढे मी ब्रा घालणार नाही. माझे स्त’न माझ्या बेंबीपर्यंत पोहोचले तरी चालतील. पण मी ब्रा घालणार नाही’ असे म्हटले आहे. सध्या तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
गिलियनचा हा व्हिडीओ पाहिल्यावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. एका यूजरने ‘मी देखील या पुढे ब्रा घालणार नाही’ असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने ‘मी सुद्धा! १७ महिने घरुन काम केल्यानंतर… गिलियन तुझे अगदी बरोबर आहे’ असे म्हटले आहे. तर तिसऱ्या एका यूजरने ‘गोल्डन ग्लोब आणि एमी अवॉर्ड जिंकणाऱ्या अभिनेत्रीने ब्रा न घालण्याचा निर्णय घेतल्यानंतर आपण असहमती दाखवणारे कोण आहोत’ असे म्हटले आहे.
गिलियन अँडरसन ही ब्रिटीश-अमेरिकन अभिनेत्री आहे. तिने ‘द हाउस ऑफ मिर्थ’, ‘द माइटी’, ‘द लास्ट किंग ऑफ स्कॉटलँड’, ‘द एक्स फाइल्स’ आणि ‘द एक्स फाइल्स: आय वॉण्ट टू बिलिव्ह’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे.
GILLIAN ANDERSON DOESN’T WEAR BRAS ANYMORE. EVERYBODY CLAPPED EVERYBODY SCREAMED pic.twitter.com/lRvNGYHPHx
— melanie (@blnchdubois) July 12, 2021