मराठी चित्रपट सृष्टीवर शोककळा ! ‘आता तरी देवा मला पावशील का ‘ म्हणणारा आवाज कायमचा मावळला..!

को’रो’ना म’हा’मा’री मुळे अनेक जणांनी आपल्या आप्तांना ग’मावलेले आहे. याच म’हामा’रीने बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांना देखील गमावले आहेत. काही दिवसांपूर्वीच नदीम-श्रवण मधील श्रावण राठोड यांचे देखील को’रोना ने नि’धन झाले. तसेच पद्मभूषण पंडित राजन मिश्रा यांचे देखील को’रो’ना ने नुकतेच दिल्ली येथे नि’ध’न झाले.
त्यांचे वय 70 वर्षाचे होते. त्यांना हृ’दयवि’काराचा झ’टका आला होता. मराठी चित्रपट सृष्टी आणि लोक कवी हरेंद्र जाधव हे देखील आपल्याला सो’डून गेलेले आहेत. प्रबोधन च’ळवळीला त्यांनी बळ दिले होते. हरेंद्र जाधव यांनी अनेक अजरामर गीत लिहिलेली आहेत. त्यांनी लिहिलेल्या पहा पहा मंजुळा हा माझ्या भिमरायाचा मळा, हे गीत प्रचंड गाजले होते.
हरेन्द्र जाधव यांचे 87 वृ’द्धाप’काळाने नि;धन झाले. हरेंद्र जाधव यांचा जन्म 16 फेब्रुवारी 1933 मध्ये नाशिकचा निफाड येथील मिग ओझर येथे झाला. हरेंद्र जाधव यांनी आपल्या करिअरमध्ये जवळपास दहा हजार गाणी लिहिली होती. आता तरी देवा मला पावशील का? हे अजरा’मर गीत देखील त्यांनीच लिहिले होते.
तसेच आं’बेडकरी च’ळवळीमध्ये त्यांचे खूप मोठे योगदान होते. हरेंद्र जाधव यांनी मुंबई महापालिकेच्या विविध शाळांमध्ये जवळपास 33 वर्ष नोकरी केली होती. तसेच ते शेवटची काही वर्षे मुख्याध्यापक म्हणून देखील कार्यरत होते. शिक्षकी पेशामुळे त्यांनी च’ळवळीसाठी देखील खूप मोठे काम केले.
महात्मा फुले यांनी सुरू केलेल्या सत्यशोधक शाहीर जलसाचा प्रभाव त्यांच्या शायरी वर होत गेला. 1950 च्या सुमारास त्यांनी गीत लेखनाची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी अनेक असे अजराम’र गीते लिहिली आहेत. नाशिकच्या लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठान तर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमात हरेंद्र जाधव यांचा अ’मृतमहोत्सवी सत्कार करण्यात आला होता.
या वेळी ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांनी त्यांचा सत्कार केला होता. या वेळी दिवंगत कॉम्रेड गोविंद पानसरे हे देखील उपस्थित होते. जाधव यांनी अनेक संतांचे महात्मे राष्ट्रपुरुष यांची चरित्र आपल्या लेखांमधून सर्वसामान्य जनते पर्यंत पोहोचवले होते.
त्यांनी लिहिलेल्या पहा पहा मंजुळा हा माझ्या भिमरायाचा मळा, हे खरंच आहे खरं भीमराव आंबेडकर, भीमरायाने समतेचा जागी झेंडा रोविला यासारखी अ’जरामर गीत त्यांनी लिहिली. त्याचबरोबर तूच सुखकर्ता तूच दुखहर्ता, आता तरी देवा मला पावशील का?, मंगळवेढे भूमी संतांची, माझ्या नवऱ्यानं सोडलीया दा’रू, देवा मला का दिली बायको अशी यासारख्या अवीट गोडीचे गीत त्यांनी लिहिले.
शाहीर साबळे, प्रल्हाद शिंदे, विठ्ठल उमप यांच्यासह सुरेश वाडकर, अजित कडकडे, आनंद शिंदे, रोशन सातारकर, सुलोचना चव्हाण, अनुराधा पौडवाल, साधना सरगम, उत्तरा केळकर अशा नामवंत गायक संगीतकारांनी त्यांच्या गीतांना स्वरसाज चढवला होता. असा दिग्गज गीतकार आपल्यातून नि’घून गे’ल्याने अनेकांनी शोक व्यक्त केला आहे. त्याचप्रमाणे त्यांनी लिहिलेले गीत हे अजरामर राहतील, असे देखील अनेकांनी सांगितले आहे.