काय सांगता ! हार्दिक पांड्याच्या घडाळ्याच्या किमतीत मुंबईत घेता येईल एक आलिशान बंगला ! किंमत वाचून चक्रावतील डोळे..

शौक एक अशी बाब आहे, ज्याबद्दल बोलावं तेवढं कमीच आहे. अनेकांना वेगवेगळे शौक असतात. कोणाला महागड्या गाड्यांचे, तर कोणाला महागड्या दागिन्यांचे; कोणी जगभर फिरणे पसंत करत, तर कोणी खास डिझायनर कपडे खरेदी करणं. काहींना जुन्या पुरातन वस्तू कलेक्ट करण्याचा शौक असतो तर कोणाला नवीन लेटेस्ट वस्तूंचा.
प्रत्येकाच्या आवडी-निवडी वेगळ्या असतात. मात्र आपले शौक पूर्ण करण्यासाठी नेहमीच सर्वजण धडपड करतच असतात. आपल्या देशातील सेलेब्रिटीजला पण वेगवेगळे शौक आहेत. अजय देवगण, रोहित शेट्टी याना महागड्या कार्स खरेदी करायला अवडतात. तर, जॉन अब्राहम, सलमान खान, एम एस धोनी याना महागड्या बाईक्स आवडतात.
करीना कपूर, दीपिका पदुकोण, यांना खास दागिन्यांची आवड आहे. तर प्रियांका चोप्रा, ऐश्वर्या राय बच्चन या दोघीना महागडे घड्याळ आवडतात. असे अनेक वेगवेगळे शौक आपल्या सेलेब्रिटीजला आहेत. आणि विशेष म्हणजे ते पूर्ण देखील करतात. मात्र त्यांच्या आवडीच्या वस्तूंच्या किंमती वाचुन सर्वसामान्य थक्क होतात. काही वर्षांपूर्वी ट्वीनकल खन्ना, कॉफी विथ करणच्या शो मध्ये आली होती.
त्यावेळी आवड म्हणून तिने हातात घातलेल्या हिऱ्याची किंमत तब्ब्ल १५ कोटी रुपये होती. त्याच शोमध्ये सोनम कपूरने, खास ड्रेस घातला होता त्याची किंमत तब्ब्ल २०लाख रुपये होती. याच शोमध्ये केलेल्या विधानामुळे अलीकडच्या काळात, प्रसिद्ध भारतीय क्रिकेटर हार्दिक पांड्या चांगलाच वा’दाच्या भोव’ऱ्यात सा’पडला होता.
त्यावेळी त्याने अनेक वेगवेगळे विधान केले होते, आणि एकूणच तो भाग इतका जास्त वा’दग्र’स्त बनला की मेकर्सला तो भाग काढून टाकावा लागला. त्यादरम्यान त्यानं संगितलं होतं की, त्याला गाड्यांचा वगैरे नाही तर महागडे आणि खास घड्याळ वापरायला अवडतात. अनेक वेळा जेव्हा सामने खेळण्यासाठी तो प्रदेशात जातो तेव्हा तो, तिथे काही खास घड्याळ मिळाले तर तो नक्कीच खरेदी करतो.
त्याला एक्स्ल्युजिव घड्याळं खूप आवडतात, मग त्यासाठी तो वाटेल ती किंमत मोजायला तैयार असतो. त्याने नुकत्याच शेअर केलेल्या फोटोमध्ये, आपलं हे वक्तव्य त्याने सत्य करुन दाखवलं आहे. सध्या प्रदेशात तो आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. आपल्या पत्नीच्या आवडीसाठी तो तिथे, आलिशान रोल्स रॉयल्स गाडीमधून फिरत आहे.
तर त्याच वेळी सुट्टीच्या मूडमध्ये त्याने आपला एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये त्याने पांढऱ्या रंगाचे बनियन, आणि हॅट घातली आहे. महागड्या गॉगल्स सह खास आकर्षण ठरत आहे ते त्याच्या हातातलं घड्याळं. त्याच जे घड्याळ अत्यंत दुर्मिळ आहे. पटेक फिलिप नॉटिलस प्लॅटिनम 5711 असं त्या घड्याळच नाव आहे. त्यावर हिरव्या रंगाचे 32 baguette-cut एमेराल्ड्सही आहेत.
प्लॅटिनम या महागड्या धातूच्या साह्याने हे घड्याळ तयार करण्यात आलं असून, त्याची केस 40 मिलिमीटरची आहे. घड्याळाची डायल डार्क ग्रे आहे आणि त्यात तास दर्शवण्यासाठीसुद्धा एमेराल्ड्स या महागड्या रत्नांचा वापर करण्यात आला आहे. 5711 सीरिजमध्ये काही ऑफ-कॅटलॉग व्हेरिएंट्स असून, ते खास ग्राहकांसाठीच राखीव असतात. आणि हार्दिकचे हे घड्याळ त्यापैकीच एक आहे. या घड्याळाची किंमत पाच कोटी रुपये आहेत. त्यामुळे हार्दिकच्या या घड्याळाची सगळीकडेच आता जोरदार चर्चा सुरु आहे.