मराठी इंडस्ट्री मधील ‘हा’ वजनदार व्यक्ती आहे सईचा पती, ‘या’ वादामुळं लग्नाच्या काही वर्षांतच झाला घ’टस्फो’ट..

सई ताम्हणकर ही मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. तिने दुनियादारी, बालक पालक, वजनदार यांसारख्या मराठी चित्रपटात तर हंटर, गजनी यांसारख्या हिंदी चित्रपटातही खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. तिने हिंदीमध्ये साकारलेल्या भूमिकांचे देखील तितकेच कौतुक झाले आहे.
सईच्या अभिनयासाठी तिला आजवर अनेक पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे. सई ही मराठी इंडस्ट्रीतील एक बिनधास्त अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. ती कधीच आपले खाजगी आयुष्य मीडियापासून लपवत नाही. तिला प्रचंड फॅन फॉलॉव्हिंग असून तिच्याविषयी जाणून घ्यायची तिच्या चाहत्यांची नेहमीच इच्छा असते.
तुम्हाला माहीत आहे का, सईचे काही वर्षांपूर्वी लग्न झाले होते. पण काही कारणास्तव त्या दोघांनी घ’टस्फो’ट घ्यायचा निर्णय घेतला. आज सई तिचे सिंगल आयुष्य अतिशय आनंदित जगत आहे. सई आणि अमेय गोसावी यांचे लग्न १५ डिसेंबर २०१३ ला झाले होते. अमेय आणि सईने लग्नाचा निर्णय घेतल्यानंतर त्यांचे कुटुंबीय, मित्रमैत्रीण चांगलेच खूश झाले होते.
त्या दोघांनी ७ एप्रिल २०१२ ला साखरपुडा केला होता. साखरपुड्यानंतर ते दोघे लगेचच लग्न करणार असल्याचे म्हटले जात होते. पण सई कामात व्यग्र असल्याने त्यांनी एक वर्षं लग्न पुढे ढकलले. त्यानंतर त्यांनी अतिशय धुमधडाक्यात मराठमोठ्या पद्धतीने लग्न केले होते. अमेय देखील चित्रपटसृष्टीशी संबंधित आहे. तो एक प्रोड्युसर असून त्याची लोडिंग पिक्चर्स नावाची कंपनी आहे.
सई आणि अमेय हे दोघे एकाच क्षेत्रातील असले तरी या दोघांनी कधी एकत्र काम केलेले नाही. सई आणि अमेय यांनी प्रेमविवाह केला होता. तीन वर्षांच्या नात्यानंतर त्यांनी लग्न केले होते. सई आणि तिच्या पतीमध्ये सगळे काही सुरळीत सुरू आहे असाच तिच्या फॅन्सचा समज होता. पण त्या दोघांनी अचानक घ’टस्फो’ट घेतला.