Finally! अभिनेत्री सायली संजीव अडकली विवाहबंधनात! ‘या’ मराठी अभिनेत्यासोबत केलं लग्न, पहा लग्नाचे काही खास फोटो…

मराठी मालिका जेव्हा प्रसिद्ध होते तेव्हा लोकप्रियतेच्या सर्वच सीमा पार पडतात. आणि जेव्हा या मालिकेमध्ये, प्रेक्षकांच्या आवडीची भूमिका साकारणारे पात्र लग्नबेडीत अडणार असतात तेव्हा चाहते, अक्षरशः त्या मालिकेचा प्रत्येक भाग खूप आवडीने बघतात.
तुझ्यात जीव रंगला मधील,राणा आणि अंजलीचे लग्न असेल किंवा, लगीर झालं जी मधील अजय आणि शीतलचे लग्न असेल; टीआरपीच्या फलक या मालिकांनी तोडले होते. साहजिकच, त्यांची प्रेमकथा सर्वाना खूपच आवडली होती म्हणून त्यांच्या लग्नासाठी चाहते खूपच आतुर होते.
आणि जेव्हा त्यांचे लग्न या मालिकांमध्ये दाखवण्यात आले होते तेव्हा सगळीकडेच त्याची जोरदार चर्चा होती. अगदी तशीच चर्चा आता पुन्हा एका मालिकेची होत आहे. शुभमंगल ऑनलाइन’ मधील शंतनू आणि शर्वरीच्या लग्नाची चांगलीच चर्चा रंगली आहे. मालिकेत अभिनेत्री सायली संजीव शर्वरीची तर अभिनेता सुयश टिळक हा शंतनूची भूमिका साकारत आहे.
सोशल मीडियापासून ते काही न्यूज वाहिन्यांपर्यंत, सगळीकडेच या दोघांचुआ लग्नाची चर्चा सुरु आहे. काही दिवसांपूर्वी, शर्वरी म्हणजेच सायली संजीव हिच्या मेहंदीचे फोटोज तुफान वा’यरल झाले होते. सायलीच्या हातावर मेहंदीचे फोटो बघून, सर्वच चाहत्यांना एक क्षण वाटले कि खरोखरच सायलीचे लग्न तर होत नाहीये ना? मात्र ते फोटोज शर्वरीच्या लग्नाचे असल्याचे समोर आले.
मोठ्या प्रयत्नांनी शंतनूने शर्वरीच्या आईला म्हणजेच माधुरीला या लग्नासाठी तैयार केले आणि आता त्या दोघांचे लग्न होत आहे. या मालिकेमध्ये शंतनू त्याच्या आवडत्या व्यक्तीसोबत म्हणजेच शर्वरी सोबत लग्न करण्याकरिता अतोनात प्रयत्न करत होता. अखेर त्याच्या प्रयत्नांना यश आले आहे. शंतनू आणि शर्वरी यांच्या प्रेमकथेच्या अध्यायातील आता नवीन पर्व सुरु होणार आहे.
या दोघांचा आता विवाह झाला आहे. या दोघांची प्रेमकथा प्रेक्षकांच्या खूपच पसंतीस उतरली आहे. त्यामुळे या दोघांच्या विवाह सोहळ्याचे सर्वच फोटोज आणि व्हिडियोज बघण्यासाठी चाहते आतुर आहेत. त्याआधी शर्वरीचा मेहंदीचा कार्यक्रम झाला, त्यानंतर तिच्या आणि शंतनूच्या हळदीचे फोटो समोर आले.
आता या दोघांच्या विवाह सोहळ्याचे फोटो समोर आले आहेत आणि आता त्याच फोटोंची सगळीकडे चर्चा होत आहे. दोघांचे लग्न पारंपरिक पद्धतीने पार पडणार आहे आणि प्रत्येक विधीला साजेसा असा उखाणादेखील घेण्यात आला.मात्र सप्तपदी जरा जास्तच खास असणार आहे. शंतनूने शर्वरी ला उचलून घेऊन सप्तपदीचा विधी पार पडला आहे.
हिरव्या रंगाची साडी, हिरवा चुडा, गुलाबाच्या फुलांची केसाला वेणी, नाकात नाथ आणि मंगळसूत्र या लूकमध्ये शर्वरी खूपच सुंदर दिसत आहे.सोबतच निळ्या रंगाच्या शेरवानी मध्ये शंतनू देखील खूपच हँडसम नवरदेव दिसत आहे. आता खऱ्या अर्थाने शंतनूला शर्वरीची सात जन्मासाठी साथ मिळाली आहे.लवकरच रात्री १० वाजता हा एपिसोड प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.