दिवसाला केवळ सात रुपये गुंतवा आणि दरमहा मिळवा ५ हजार रुपये, केंद्र सरकारची भन्नाट योजना..

दिवसाला केवळ सात रुपये गुंतवा आणि दरमहा मिळवा ५ हजार रुपये, केंद्र सरकारची भन्नाट योजना..

आपल्या देशामध्ये असंघटित क्षेत्र हे खूप मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे. या क्षेत्रासाठी सरकार वेगवेगळ्या योजना राबवत असते. काही वर्षांपूर्वी आपण पोस्टमध्ये आरडी, पीपीएफ यासारख्या योजना पाहिल्या असतील. याच प्रमाणे सूकन्या योजना, अल्पबचत योजना यासारख्या योजना देखील खूप मोठ्या प्रमाणात आपल्या देशात राबविण्यात येतात.

त्याचा फायदा देखील अनेक जण घेतात. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये यामध्ये मिळणारे व्याजदर हे कमी करण्यात आले आहेत. त्यामुळे म’ध्यमव’र्गीयांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली होती. नोकरी करणार्‍या लोकांसाठी पीएफ देखील ही चांगली योजना आहे. मात्र, या पीएफवरील व्याजदरा आता केंद्र सरकारने कमी करण्याचे ठरवले आहे.

त्यामुळे अनेक जणांची यावर नाराजी सरकारने ओढून घेतली आहे. मात्र, असे असले तरी काही योजना केंद्र सरकार चांगल्या पद्धतीने राबवते. काही वर्षापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून पंतप्रधान आवास योजना ही देखील राबवण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून गरजू लोकांना घर घेताना अडीच लाखांपर्यंत सबसिडी देखील देण्या त आली.

काही लोकांना याचा फायदा देखील झाला. आता ही योजना काही दिवसापूर्वी बंद करण्यात आल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे पूर्वीच्या लोकांना सबसिडी भेटली नाही. त्यांचे काय असा प्रश्न देखील उपस्थित राहिला होता. मात्र, योजना बंद होण्याच्या आधीच्या लोकांनी अर्ज केले आहेत, त्यांना सबसिडी ही मिळेल असे देखील सांगण्यात येत आहे.

मात्र, आता ती सबसिडी कधी मिळेल, हे मात्र काही समजत नाही. आज आम्ही आपल्याला एका अशा योजनेची माहिती देणार आहोत. ही योजना अतिशय चांगली आहे. कमी पैशांमध्ये गुंतवणूक करून आपण निवृत्तीनंतर दरमहा पाच हजार रुपये पेन्शन मिळू शकता. यासाठी काही अटी देखील आहेत. केंद्र सरकारने काही वर्षांपूर्वी ही योजना सुरु केली असून या योजनेचे नाव अटल पेन्शन योजना असे आहे.

ही योजना पी एफ आर डी ए हा विभाग चालवतो. प्रामुख्याने असंघटित क्षेत्रासाठी ही योजना सुरु करण्यात आलेली आहे. 18 ते 40 वयोगटातील लोकांसाठी ही योजना राबवण्यात आलेली आहे. या योजनेसाठी तुम्हाला जवळपास वीस वर्ष गुंतवणूक करावी लागेल. अनेकांना वयाच्या 60 वर्षांनंतर इन्कम सोर्स हा नसतो. त्यामुळे ही योजना त्यांच्यासाठी भाग्यशाली ठरू शकते.

या योजनेमध्ये तुम्हाला १ हजार ते पाच हजार रुपये पर्यंत पेन्शन मिळू शकेल. त्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने गुंतवणूक करावी लागेल. उदाहरणार्थ ज्या व्यक्तीचे वय 39 वर्षे आहे, त्या व्यक्तीला सुमारे १३१८ हजार रुपये गुंतवावे लागतील. त्यानंतर या व्यक्तीला वयाच्या साठ वर्षानंतर महिना पाच हजार रुपये मिळू शकतो.

त्याचप्रमाणे वयानुसार ही योजना राबवण्यात येते. म्हणजेच आपल्याला महिन्याला 210 रुपये गुंतवावे लागतील. महिन्याला २१० रुपये म्हणजे प्रतिदिनी आपल्याला ७ रुपये येतात. असे करून आपल्याला आपल्या निवृत्तीनंतर किंवा वयाच्या साठाव्या वर्षानंतर आपल्या गुंतवणुकीप्रमाणे १ हजार रुपये ते ५ हजार रुपयेपर्यंत पेन्शन ही मिळू शकते.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *