तात्या ‘विंचू’ची भूमिका दिलीप प्रभावळकर यांनाच का दिली? इतक्या वर्षानंतर महेश कोठारे यांनी केला खुलासा..

दादासाहेब फाळके यांनी चित्रपटसृष्टीचा पाया रचला. सुरुवातीच्या काळात मराठी चित्रपट हे उत्कृष्ट दर्जाची असायचे त्याकाळी झालेले लेखनासमोर आजचे लेखन हे अगदी शुल्लक म्हटले तरी वावगे ठरणार नाही. कारण उत्तम विश्लेषण करून त्याकाळी कोणत्याही चित्रपटाचे लेखन केले जायचे.
मराठी चित्रपटसृष्टीने अनेक दिग्गज कलाकार दिले आहेत. दरम्यान, एकेकाळी लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, महेश कोठारे आणि सचिन पिळगावकर यांच्या चौकटीने मराठी चित्रपट सृष्टी दणाणून सोडली होती. आजही त्यांच्या चित्रपटांची छाप प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयावर छापलेली आहे, आजही त्यांचे चित्रपट त्याच आवडीने बघितले जातात.
त्यात विशेष आकर्षण म्हणजे ‘अशी ही बनवाबनवी. चित्रपट या चित्रपटाच्या प्रेक्षकांमध्ये असंख्य वाढ अजूनही होताना दिसत आहे. सोशल मीडियावर रोज नवनवीन मिम्स या चित्रपटावर बनत असतात. दरम्यान, असाच एक चित्रपट होता झपाटलेला या चित्रपटाचे दिग्दर्शक महेश कोठारे होते या चित्रपटात तात्या विंचूचा अभिनय करणारे दिलीप प्रभावळकर यांनाच तात्या विंचूची भूमिका का दिली या बद्दल बोलणार आहोत
काही मराठी चित्रपट आणि त्यातील पात्रं ही वर्षानुवर्षे प्रेक्षकांना लक्षात राहतात. चित्रपटांमधील नायक विशेषकरून जरी प्रेक्षकांची मनं जिंकत असली तरी काही खलनायकसुद्धा प्रेक्षकांच्या मनावर कायमची छाप सोडून जातात. अशीच एक भूमिका म्हणजे ‘तात्या विंचू’. महेश कोठारे दिग्दर्शित ‘झपाटलेला’ या चित्रपटातील ‘तात्या विंचू’ हे पात्रं खूप गाजलं.
कोणत्याही मराठी रसिकाला हे पात्र विसरणं शक्य नाही. ही भूमिका अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी साकारली होती. प्रेक्षकांनी पहिल्यांदाच दिलीप प्रभावळकर यांना अशा रुपात पाहिलं होतं. तात्या विंचूच्या भूमिकेसाठी त्यांचीच निवड का करण्यात आली, यामागचं कारण महेश कोठारे यांनी एका मुलाखतीत सांगितलं.
‘तात्या विंचू’साठी दिलीप प्रभावळकर का?
एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत महेश कोठारे म्हणाले, “कुठल्याही चित्रपटात दमदार कलाकारांची निवड करणं म्हणजे अर्ध युद्ध जिंकल्यासारखंच आहे. चित्रपटात कास्टिंग परफेक्ट असणं हे अत्यंत गरजेचं असतं आणि भन्नाट कास्टिंग करणं यात एक वेगळीच मजा असते. व्हिलनच्या रोलमध्ये दिलीप प्रभावळकर आणणं हा एक भन्नाट विचार होता.
लेखक अशोक पाटोळे आणि मी ठरवून दिलीप प्रभावळकरांकडे गेलो आणि त्यांना भूमिका समजावून सांगितली. त्यांनासुद्धा चौकटीबाहेरच्या भूमिका साकारायला खूप आवडतं. तात्या विंचूची कल्पना त्यांनाही खूप आवडली. मी त्यांचा दात लावलेला गेटअप कुठेतरी पाहिला होता, म्हणून मी त्यांना सांगितलं की ते दात लावून केलं तर अजून छान वाटेल. त्यांनी स्वत:हून ती कवळी बनवून घेतली आणि सर्व तयारी केली. तात्या विंचूचं श्रेय दिलीप प्रभावकरांचं आणि लेखक अशोक पाटोळे यांचं आहे.”