‘देवमाणूस’ मालिका परत येणार? अर्धवट शेवट झाल्याने नाराज होते चाहते !

देवमाणूस या मालिकेने थोड्याच काळात मोठी प्रसिद्धी मिळवली होती. वेगळं कथानक आणि सोबतीला सर्वच कलाकारांचा दमदार अभिनय यामुळे या मालिकेने चांगलीच लोकप्रियता कमावली. या मालिकेचा भाला मोठा चाहतावर्ग आहे. या मालिकेतील अजित कुमार पासून बालकलाकार टोण्या पर्यंत सर्वानाच चाहत्यांनी अक्षरशः डोक्यावरच घेतले आहे होते.
खूप कमी कालावधीत ही मालिका प्रचंड प्रमाणात लोकप्रिय झाली होती. यातील कथानक देखील वेगळे असल्यामुळे याला खूप मोठा चाहतावर्ग लाभला होता. डॉक्टर देवीसिंगच्या भूमिकेला अभिनेता किरण गायकवाड याने उत्तम अभिनयाने न्याय मिळूवन दिला. आता मालिका कथानक संपल्यामुळे मालिकेने देखील प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे.
शूटिंगच्या शेवटच्या दिवशी मालिकेत सगळे कलाकार अगदी भावुक झाले होते. शूटिंगच्या पहिल्या दिवसाची आठवण करत सगळी टीम भावुक झाली होती. आपल्या इंस्टाग्रामवरून विडिओ शेअर करत सगळ्या कलाकारांनी सेटचा आणि आपल्या सहकलाकारांचा निरोप घेतला..
15 ऑगस्टला मालिकेचा शेवटचा भाग प्रदर्शित झाला. त्यामुळे चाहते फारच उत्सुक होते. पण शेवटी प्रेक्षकांची निराशाच झालेली पाहायला मिळाली. तर सोशल मीडियावरही अनेकांनी सं’ताप व्यक्त केला. आता तरी देवी सिंग पो’लिसांच्या ताब्यात जाईल असं प्रेक्षकांना वाटत होतं पण तसं झालं नाही.
दरम्यान शेवटी चंदाचा आणि विजयचा मृ’त्यू दाखवला आहे. याशिवाय नव्यानेच मालिकेत एन्ट्री दाखवलेल्या स्त्रीचा देखील डॉक्टरने खू’न केलेला दाखवला आहे. वाड्यातील लोकांना देवमाणसाचा खरा चेहरा मात्र समजला नाही. चंदा आणि डॉक्टरचा मृ’त्यू झाल्याचं लोकांना समजत. तर डॉ’क्टरच्या मृ’त्यूने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
एकूणच संपूर्णपणे अनपेक्षित शेवट पाहायला मिळाला आहे. दरम्यान डॉ’क्टरचा मृ’त्यू झाला नसून तो जि’वंत आहे. डिम्पलने चंदाचा खू’न केला. तर तिची बॉ’डी देखील जा’ळून टा’कली. याशिवाय आणखी एक बॉ’डी तिथे ज’ळत असते. तिच्या आजूबाजूला डॉ’क्टरच साहित्य पसरवलेल असतं. त्यामुळे डॉ’क्टरचाच मृ’त्यू झाल्याचं डिम्पलने भासावल होतं.
तर आता ती देखील घरातून प’ळून गेली आहे. डॉ’क्टर एका दवाखान्यात अॅडमिट आहे. व तो अजूनही जि’वंत आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांमध्ये ‘देवमाणूस 2’ची उत्सुकता वाढली आहे. तर मालिकेचा अद्याप शेवट झाला नसल्याने आणखी एक भाग येणार अशी चर्चा रंगताना दिसत आहे. अनेकांनी शेवट योग्य केला नाही यामुळे नाराजी व्यक्त केली आहे. तेव्हा मलिकचा दुसरा भाग येणार यात अजूनही संभ्रम आहे. मालिकेच्या प्रोडक्शन टीम कडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही.