‘Devmanus’ मंगल, वंदीआत्यासह लेडी गॅंगचा धमाकेदार डान्स; VIDEO होतोय VIRAL

अवघ्या अर्ध्या तासांच्या, मालिकांचे चित्रीकरण हे कित्येक तास सुरु असत. मेकअप, कपडे, मग प्रॅक्टिस आणि त्यानंतर शॉट्स या सर्व बाबींमध्ये खूप वेळ जातो. अनेक वेळा ९- १० ताससुद्धा या कलाकरांना सेटवरच घालवावे लागतात. अश्या परिस्थितीमध्ये सेटच त्यांचे दुसरे घर बनून जात. मग फावल्या वेळात हे कलाकार, काही छोट्या छोट्या बाबींमध्ये आपला आनंद शोधतात.
लंचच्या वेळी आपला आवडता पदार्थ, किंवा कडक चहा, आल्या सहकलाकाराला चिडवणे अश्या अनेक गोष्टी या सेटवर सुरु असतात. विशेष म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून, आता हे सर्व आपल्या चाहत्यांपर्यंत हे कलाकार पोहचवत असतात. अनेक वेळा काही फोटो आणि व्हिडियोज हे कलाकार, थेट आपल्या सेटवरून आपल्या सोशल मीडियावर शेअर करतात आणि चाहते देखील त्याला भरभरून प्रतिसाद देतात.
मात्र काही व्हिडिओ अगदी हटके आणि खास बनतात आणि मग ते तुफान वायरल देखील होतात. सध्या एक तसाच व्हिडियो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. हा व्हिडियो थेट देवमाणूस या मालिकेच्या सेटवरून आला आहे. झी मराठी वरील ‘देवमाणूस’ या मालिकेने अल्पावधीतच मोठी लोकप्रियता मिळवली आणि म्हणूनच या मालिकेशी निगडित कोणतीही गोष्ट सतत जोरदार चर्चेत असते.
ही मालिका जितकी जास्त थ्रिलर आहे, या मालिकेचे कलाकार खऱ्या आयुष्यात तेवढेच बिनधास्त असलेलं आपल्या बघायला मिळतात. मालिकेतील सगळेच कलाकार नेहमीच सेटवर भरपूर मजामस्ती करताना दिसतात. दिव्या म्हणजेच अभिनेत्री नेहा खान नेहमीच मजेशीर व्हिडिओ शेअर करते.
याशिवाय डिम्पल म्हणजेच अभिनेत्री अस्मिता देशमुख ही असेच व्हिडिओ शेअर करत असते. आणि म्हणूनच या मालिकेच्या सेटवर वर सतत धम्माल आणि मस्ती पाहायला मिळते. सेटवरील कलाकार मंडळी नेहमीच मोकळ्या वेळात एकमेकांसोबतचे काही मजेशीर व्हिडिओ शेअर करत असतात.
आणि हा सध्या वायरल होत असलेला व्हिडियो देखील तसाच आहे. या मालिकेतील लेडीज-क्लबने हा व्हिडियो बनवला आहे. ‘एक बार तुझको देखा तो सनम’ या जुन्या सुपरहिट गाण्यावर, साधी भोळी मंगल, आगाऊ वंदी आत्या, कर्तव्य दक्ष एसीपी दिव्या सिंग आणि वकील आर्या देशमुख. या सगळ्याजणी या व्हिडियोमध्ये अगदी भन्नाट डान्स करताना दिसत आहेत.
त्यांच्या या नृत्यावर, त्यांना अनेक मजेशीर कमेंट्सदेखील मिळत आहेत. मात्र, या गँग मध्ये अनेकांनी सरू-आजीला मिस केलं. काही नेटकऱ्यांनी देवी सिंगला पकडण्याची मागणी केली. सध्या मालिकेत देवी सिंगने मोठ्या चातुर्याने कोर्टातून स्वतःची सुटका करून घेतली आहे. पुराव्याअभावी कोर्टाला देखील त्याच्या बाजूने निकाल द्यावा लागला आहे. म्हणून आता प्रेक्षकांचीही उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.