‘आई कुठे काय करते’ मधल्या अनिरुद्धची खरी बायको आहे संजना पेक्षाही सुंदर, पहा फोटो…

आपण जेव्हा एखादी मालिका बघतो तेव्हा, ती मालिका बघत असताना त्या पात्रांमध्ये अगदी स्वतःला देखील विसरून जातो. जेव्हा एखादी मालिका खूप प्रसिद्ध होते तेव्हा त्या मालिकांचे पात्र, देखील तेवढेच प्रसिद्ध होतात. ते पात्र निभावणार कलाकार एक दुसरा व्यक्ती आहे, असे चाहत्यांचे मन मानातच नाही.
ते चाहते त्या पात्रांना इतके आपलेसे समजतात की त्यांना त्याच नावाने हाक मारतात. त्याच मालिकेमध्ये असणारी त्यांची नाती खरी असतील असे देखील आपण बऱ्याच वेळा समजतो. ते त्या कलाकारांचे खास असे कौशल्य असते की, भूमिका निभावताना ते इतक्या उत्तम प्रकारे निभावतात कि त्या भूमिकेला एकरुप करून टाकतात.
सध्या स्टार प्रवाह वरील ‘आई कुठे काय करते’ हि मालिका प्रेकक्षांच्या खूपच आवडीचे मालिका बनली आहे. खूपच कमी वेळेमध्ये ह्या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. ह्या मालिकेमधील सर्वच पात्र देखील चांगलेच लोकप्रिय होत आहेत.
सध्या भोळ्या आईचा, एक चतुर आणि धूर्त अश्या नवऱ्याची भूमिका म्हणजेच अरुंधतीच्या नवऱ्याची भूमिका अनिरुद्ध देशमुख म्हणजेच मिलिंद गवळी ह्यांनी निभावली आहे. सुंदर आणि तरुण अश्या संजना च्या तो लग्नानंतर प्रेमात पडतो आणि त्यानंतर सत्य समोर आल्यावर कथानक पुढे सुरु होते.
मात्र, ह्या अनिरुद्धची म्हणजेच मिलिंद गवळी ह्यांची खऱ्या आयुष्यातील बायको संजना पेक्षाही सुंदर आहे. मिलिंद गवळी ह्यांना, ह्या मालिकेच्या आधी आपण बरीच सिनेमांमध्ये आणि मालिकांमध्ये देखील पहिले आहे, मात्र दोन फुलांवर उडत राहणाऱ्या अनिरुद्धच्या भूमिकेमुळे त्याला नवी ओळख मिळाली. त्याच्या खऱ्या पत्नीचे नाव दीपा असे आहे.
दीपा गवळी ह्या आहेत, त्या लाइमलाईट पासून स्वतःला दूरच ठेवतात. ह्या दोघांची लव्हस्टोरी मात्र पक्की फिल्मी आहे. एकदा एका विवाहाला उपस्थित राहण्यासाठी मुळचे मुंबईचे असणारे मिलिंद गवळी जळगावला गेले होते.तिथे त्यांची नजर एका सुंदर मुलीवर पडली आणि पाहताक्षणी तिच्या प्रेमात पडले. दीपा ला बघून मिलिंद तिच्या प्रेमात पडले आणि दोघांनी विवाह देखील केला.
त्या दोघांच्या कुटुंबाचा ह्या लग्नाला होकार होता मात्र, मिलिंद ह्यांना ठोस नौकरी नाही अशी शंका मुलीच्या घरच्यांनी व्यक्त केली असताना मिलिंद ह्यांनी देखील त्यांचे म्हणणे समजले. आणि म्हणून मुंबई युनिव्हर्सिटीमधून एम.कॉमचे पदव्युत्तर शिक्षण त्यांनी घेतले होते.
ऑल इंडिया रेडिओसाठी त्यांनी रीतसर परीक्षा दिली व त्यात काम करायला सुरुवात केली. त्यामुळेच त्यांच्या अभिनयाच्या करियरमध्ये चांगलाच गॅप पडला. मात्र मिलिंद गवळीने पुन्हा कमबॅक केले आणि मग मागे वळून पाहिले नाही. मिलिंद गवळी आणि दीपा गवळी यांनी एक मुलगी असून तिचे नाव मिथिला आहे. ती उत्तम नृत्यांगना तर आहेच मात्र सोबत नृत्यदेखील शिकवते. २०१८मध्ये तिचा विवाह झाला आहे.