बॉलिवूड अभिनेत्रींना सुंदरतेच्या बाबतीत टक्कर देतात साऊथच्या ‘या’ सुपरस्टार्सच्या बायका..पहा फोटो…

बॉलीवूडच्या अभिनेत्री खूप सुंदर आणि मनमोहक अश्या असतात. केवळ बॉलीवूडचं नाही तर, टॉलीवूड म्हणजेच, दक्षिण चित्रपटसृष्टीमधील अभिनेत्री देखील खूप सुंदर आहेत. श्रेया सरन, तमन्ना भाटिया, अनुष्का शेट्टी, त्रिशा, असीन या दाक्षिणात्य अभिनेत्रींनी केवळ, टॉलीवूड किंवा बॉलीवूड मधेच नाही तर साता समुद्र पार देखील खूप चाहते कमवले आहेत.
सुंदरतेच्या बाबतीत या अभिनेत्री, बॉलीवूडच्या अभिनेत्रींना देखील माघे टाकतात. मात्र, केवळ या अभिनेत्रीच नाही तर या दक्षिण सुपरस्टारच्या पत्नी देखील खूप सुंदर आणि ग्लॅमरस आहेत. या सुपरस्टारच्या पत्नींला बघितले कि एखादी सुंदर अभिनेत्री किंवा मॉडेल च आहे असे वाटते.
महेश बाबू-नम्रता शिरोडकर :- चाळिशीतील महेश बाबू आजही तरुण आणि हँडसम दिसतो. महेश बाबूचा जगभरात खूप मोठा चाहतवर्ग आहे. आजही त्याच्यावर अनेक मुली फिदा आहेत. हा महेश बाबू मात्र, मराठमोळ्या नम्रता च्या प्रेमात पडला. मिस इंडिया बनलेल्या नम्रताने बॉलीवूडमध्ये, पूर्वीच खूप मोठा चाहतावर्ग बनवला होता.
मात्र दक्षिण मध्ये तिने पहिलाच सिनेमा महेश सोबत केला आणि महेश बाबू तिच्या प्रेमात पडला. काहीच दिवसात दोघांचे लग्न झाले. गौतम आणि सितारा हे दोन अपत्य या दोघांना आहेत. कॅन्सरवर मात केलेल्या, नम्रताने लवकरच पुन्हा आपला फिटनेस प्राप्त केला. नम्रता खूपच सुंदर दिसते. महेश बाबू आणि नम्रता यांनी आपल्या आयुष्यात खूप चढ-उतार पहिले, मात्र दोघांनी एकत्रितपणे त्यावर मात केली. एक आयडियल कपल म्हणून या दोघांची ओळख आहे.
अल्लू अर्जुन- स्नेहा रेड्डी :- आर्या सिनेमामधून चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केलेल्या अल्लू अर्जुनच्या, देशभरात कित्येक मुली चाहत्या आहेत. त्याने आपल्या पहिल्याच सिनेमाने सर्वांना स्वतःचे फॅन बनवले. दक्षिण मधेच नाही तर, संपूर्ण देशात कित्येक मुलींना त्याच्यासोबत लग्न करायची इच्छा होती. मात्र, अल्लू अर्जुन ने लवकरच सर्वच मुलीचे हृ’दय तो’डले आणि स्नेहा रेड्डी सोबत लग्न केले.
बिजनेसमैन कांचरला चंद्रशेखर रेड्डी यांचे आणि अल्लू अर्जुन च्या कुटुंबाचे पूर्वीपासूनच खूप उत्तम सं’बंध होते. आणि त्यांच्याच मुलीसोबत अल्लू ने विवाह केला. २०११ मध्ये ता दोघांचा विवाह झाला आणि या दोघांना एली नावाची गोंडस मुलगी आणि अयान नावाचा मुलगा देखील आहे. दोन मुलं असून देखील स्नेहा खूप फिट आहे. स्नेहा खूप सुंदर आणि ग्लॅमरस आहे. त्यामुळेच लग्नाच्या १० वर्षांनंतरही अल्लू अजूनही स्नेहवर पूर्णपनये फिदा आहे. तो नेहमीच आपल्या बायकोचे, खूप फोटोज शेअर करत असतो.
धनुष- ऐश्वर्या रजनीकांत :- सुपरस्टार रजनीकांत ची मुलगी ऐश्वर्या जेव्हा धनुष च्या प्रेमात पडली, तेव्हा तो आपले करिअर बनवण्यासाठी स्ट्रगल करत होता. मात्र, लवकरच आपल्या उत्तम अभिनयाने त्याने खूप मोठा चाहता वर्ग कमवला.
ऐश्वर्या खूपच सुंदर आहे. कोलावरी दि या गाण्यात काही क्षणांसाठी ती झळकली होती, आणि फक्त तिला बघण्यासाठी देखील कित्येक चाहत्यांनी वारंवार ते गाणं पाहिलं होत. रांझणा मधून धनुष ने बॉलीवूड मध्ये एंट्री घेतली होती. त्याचा तो सिनेमा खूप जास्त हिट ठरला होता, आणि बॉलीवूडमध्ये देखील त्याचा खूप मोठा चाहतावर्ग आहे.
राणा दग्गुबाती -मिहिका बजाज :- बाहुबली मधील बल्लाळ देव म्हणजेच राणा दुग्गाबत्तीने बऱ्याच हिंदी सिनेमामध्ये देखील काम केल आहे. टॉलीवूड सोबतच बॉलीवूड मध्ये देखील त्याचा मोठा मित्रपरिवार आहे. आणि याच मित्रपरिवारामध्ये त्याची आणि मिहिकाची ओळख झाली. मिहिका बजाज हि सोनम कपूरची खास मैत्रीण आणि म्हणून ती देखील तिच्याप्रमाणेच अगदी स्टयलिश आहे. मिहिका दिसायला खूपच सुंदर आहे आणि काही बॉलीवूडच्या अभिनेत्यांना देखील तिच्या सोबत विवाह करण्याची इच्छा होती. मिहिका खूप ग्लॅमरस आणि स्टायलिश आहे.
एनटीआर राम राव जूनियर- लक्ष्मी प्रणति
ज्युनियर एनटीआर चा सगळीकडेच खूप मोठा चाहतावर्ग आहे. त्याच्या स्टायलिश लूकवर आजही खूप मुली फिदा आहेत. तो जितका जास्त स्टायलिश आहे त्याची पत्नी तेवढीच सिम्पल आहे. मात्र असे असले तरीही, लक्ष्मी दिसायला खूप छान आहे. लक्ष्मी प्रणिती, अत्यंत सुंदर असून तिला ग्लॅम लूक आवडत नाही. लक्ष्मी, प्रसिद्ध बिझनेसमॅन नरने श्रीनिवास ची मुलगी असून ती एनटीआर च्या बिझनेस मध्ये त्याला मदत करते.
सुदीप-प्रिया राधाकृष्ण
कन्नडचे सुपरस्टार सुदीप, यांना मक्खी सिनेमा मुळे बॉलीवूड मध्ये नवीन ओळख मिळाली. सलमान खानच्या दबंग सिनेमा मध्ये देखील त्यांनी काम केले आहे. सुदीप जितका फिट आहे त्यांनी पत्नी प्रिया देखील तेवढीच फिट आहे. प्रिया खूप सुंदर दिसते. २००१ मध्ये या दोघांचे लग्न झाले होते मात्र २०१६ मध्ये तत्यांनी डा’यव्हो’र्स घेण्याचे ठरवले होते. आणि तसा अर्ज देखील दा’खल केला होता. मात्र लवकरच त्या दोघांमधील सर्व गैरसमज दूर झाले आणि आता ते एक हॅपी कपल आहेत.