Pandya Brothersवर येणार बायोपिक ? कृणाल पांड्याने सांगितलं ‘हे’ दोन अभिनेते साकारणार आमची भूमिका..?

Pandya Brothersवर येणार बायोपिक ? कृणाल पांड्याने सांगितलं ‘हे’ दोन अभिनेते साकारणार आमची भूमिका..?

मनोरंजन

बॉलीवूडने सुरुवातीपासूनच बायोपिक चित्रपटांना पसंती दिली आहे. अनेक दिग्गज आणि मोठाल्या लोकांचे बायोपिक आजवर बॉलीवूडमध्ये बनले आहेत. मात्र मागील काही वर्षांपासून, खेळाडूंचे बायोपिक बनवनन्यावर बॉलीवूड भर देत असलेले बघायला मिळत आहे. अनेक खेळाडूंवर आत्तापर्यंत बॉलीवूडमध्ये बायोपिक बनले आहेत.

तर काही खेळाडूंवर बायोपिक बनवणे सुरू आहे. क्रिकेटरपासून ते अथीलेटपर्यंत, जवळपास सर्वच मोठाल्या खेळाडूंवर बायोपिक बनले आहेत. त्यामुळे अनेकांना खेळाची आवड निर्माण होते, असे मेकर सांगतात. मात्र एखाद्या यशस्वी खेळाडूवरती जेव्हा बायोपीक बनते, तेव्हा त्याचा संघर्ष पाहायला सर्वांनाच आवडते.

त्यामुळे निश्चितच त्याचा फायदा निर्मात्यांना होतो, हे त्यामागचे सर्वात मोठे कारण आहे. कॅप्टन-कुल धोनीच्या आयुष्यावर बायोपिक बनवली होती. एम एस धोनीच्या बायोपिकने 100 कोटींहून अधिकचा बिझनेस केला होता. सुशांत सिंग राजपूतने अगदी हुबेहूब कॅप्टन कूल धोनीचे पात्र रेखाटले होते. त्यामुळे सगळीकडूनच त्याचे चांगलेच कौतुक करण्यात आले होते.

प्रियंका चोप्राने मेरी कोम हिच्यावर बायोपिक बनवली होती. केवळ आपल्या देशातच नाही तर, संपूर्ण जगभरात तो चित्रपट बघितला गेला. भाग मिल्खा भाग, सांड की आख, अजझहर, सचिन या काही इतर बायोपिक वेगवेगळ्या खेळांवर बनवल्या गेल्या होत्या. भाग मिल्खा भाग या चित्रपटाला जगभरातून उत्तम प्रतिसाद मिळाला होता.

त्यामुळे आता कोणताही खेळाडू यशस्वी ठरला की, मुलाखतीदरम्यान त्याची बायोपिक कधी बनणार हा प्रश्न ठरलेलाच असतो. सध्या आयपीएलचे दुसरे सत्र चालू झाले आहे. त्यामुळे सगळीकडेच क्रिकेट मय वातावरण बघायला मिळत आहे. आयपीएलचे सुरू असलेले सामने कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मध्यातच थांबवण्यात आले होते.

आता ते पुन्हा नव्याने सुरू झाले आहेत, त्यामुळे क्रिकेटप्रेमीमध्ये आनंद आहे. अनेक खेळाडू उत्तम प्रदर्शन करत आहेत. पांड्या ब्रदर्स नेहमीच आपल्या दर्जेदार खेळाने विजय खेचून आणतात. हार्दिक पांड्या आणि कुणाल पांड्या दोघेही, मुंबई इंडियन्स कडून खेळत असतात. त्याच पार्श्वभूमीवर कृणालची एका मीडिया हाऊसने मुलाखत घेतली होती.

त्यादरम्यान त्याला वेगवेगळे प्रश्न विचारण्यात आले. करिअरच्या शेवटी कोणता रेकॉर्ड स्वतःच्या नावावर करायला आवडेल, हा प्रश्न कुणाला विचारला. तेव्हा त्याने उत्तर दिले, ‘एका ओव्हरमध्ये 6 सिक्स मारायचे आहेत. 6 बॉल 6 सिक्स मारण्याचा विक्रम करण्याचा माझे स्वप्न आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये, सहा बॉलला 6 सिक्स मारणं हा आजही सगळ्यात मोठा विक्रम मानला जातो.

अमेरिकेच्या जस्करण मल्होत्राने नुकताच हा रेकॉर्ड स्वतःच्या नावावर नोंदवला आहे. 2007 साली वन-डे वर्ल्ड कप मध्ये नेदरलांडसविरुद्ध गिब्जने देखील हा विक्रम केला होता. त्यानंतर भारताचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने 2007 t20 वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडविरुद्ध स्टुअर्ट ब्रॉडला 6 बॉल मध्ये सहा सिक्स लगावले होते. आजही तो सामना अनेक क्रिकेटप्रेमींचा अगदी आवडीचा सामना आहे.

कायरन पोलार्डने देखील याचवर्षी यायादीत स्थान मिळवलं होतं. तसाच विक्रम करण्याचे स्वप्न आहे’, असे त्यांनी सांगितले. पुढे त्याला विचारलं की, ‘हार्दिक पांड्याचा कधी स्लेजिंग केल आहेस का? त्यावर कृणाल विचार उत्तरला, ‘जेव्हा आम्ही दोघं सराव करत असतो तेव्हा, कोण बरोबर आहे, हे ठरवण्यासाठी तिसरा व्यक्ती तिकडे असणं गरजेचं असतं.

आऊट, एक रन, फॉर की सिक्स याचा निर्णय तिसरी व्यक्ती घेते. कारण आम्ही दोघंच असू तर, अंतिम निर्णय कधीच येणार नाही.’ हे सर्व तर ठीक आहे मात्र, तुमच्या दोघांवर बायोपिक बनला तर कोणत्या अभिनेत्यांनी भूमिका साकारावी, असे तुला वाटते हा प्रश्न कृनालला विचारण्यात आला. त्यावर बराच वेळ विचार केल्यानंतर कृणालने उत्तर दिले, ‘विकी कौशल आणि रणवीर सिंग या दोघांनी आमच्या बायोपिक मध्ये काम करावं असं मला वाटतं. विकी कौशल माझी भूमिका करू शकतो आणि हार्दिक पांड्याच्या रोलसाठी रणवीर सिंग’, असे कृणाल म्हणाला.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *