Bigg Boss Marathi : बाब्बो ! एका एपिसोडसाठी महेश मांजरेकर घेतात इतकी मोठी रक्कम ! आकडा वाचून चक्रावतील डोळे..

मनोरंजन
बिग बॉस या रियालिटी शोची कायमच चर्चा सुरु असते. कोणते स्पर्धक त्यामध्ये सहभागी झाले आहेत, बिग बॉसच्या घरात येण्यापूर्वी त्यांनी काय काम केले आहे. कोणत्या वा’दामध्ये त्यांचे नाव आले होते का, आणि यासर्वांसोबतच शोमध्ये सहभागी होण्यासाठी आणि प्रेत्येक भागासाठी ते किती रक्कम मोजत आहेत? अशा अनेक विषयांवर, बिग बॉसच्या शोची चर्चा होत असते.
या शोमध्ये सहभागी होण्यासाठी, स्पर्धकांना चांगलीच मोठी रक्कम दिली जाते, हे तर आपल्या सर्वाना माहितच आहे. मात्र त्याचसोबत, शो होस्ट करणाऱ्या कलाकाराला देखील चांगलीच मोठी रक्कम दिली जाते. मराठी बिग बॉसचा हा, केवळ तिसरा सिझन आहे. मात्र, पहिले दोन्ही सिझन चांगलेच हिट ठरले.
शिवाय, तिसऱ्या सीझनचा टीआरपी देखील सध्या चांगलाच आहे. पहिल्याच पर्वापासून बिग बॉस मराठीचे सूत्रसंचालन नक्की कोण करणार या चर्चाना उधाण आले होते. अभिनेता रितेश देशमुख, बिग बॉस मराठी होस्ट करणार असल्याच्या चांगल्याच चर्चा रंगल्या होत्या. त्याच्यासोबतच, अंकुश चौधरी आणि वैभव तत्ववादीचे नाव देखील समोर आले होते.
मात्र, यासर्वांना माघे टाकत महेश मांजरेकर यांची निवड बिग बॉस मराठीचा होस्ट म्हणून करण्यात आली. महेश मांजरेकर यांनी केवळ मराठीच नाही तर हिंदी आणि साऊथच्या चित्रोटसृष्टीमधे देखील आपली वेगळी आणि खास अशी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे, त्यांचेच नाव सर्वात योग्य ठरले. शिवाय त्यांचे सूत्रसंचालन, कोणाचीही बाजू न घेता अगदी प्रामाणिक असते.
म्हणून प्रेक्षकांना देखील, बिग बॉस मराठीचे होस्ट म्हणून महेश मांजरेकर चांगलेच आवडतात. इतक्या मोठ्या शोला होस्ट करण्यासाठी महेश मांजरेकर यांना किती रक्कम दिली जात असेल, असा प्रश्न कायमच आपल्या मनात येतच असेल. तर हो, महेश यांना, बिग बॉस मराठी होस्ट करण्यासाठी खूप मोठी रक्कम मोजली जाते.
हि रक्कम ऐकून नक्कीच तुमचे डोळे चक्रावतील. महेश, बिग बॉसच्या एका एपिसोडसाठी ५० लाख म्हणजेच एका आठवड्यासाठी १ कोटी रुपयांचे मानधन घेतात. बिग बॉस शो इतर प्रादेशिक भाषांमध्ये देखील, बनवला जातो, तेथील होस्टच्या मानधनाच्या तुलनेत महेश मांजरेकर यांचे मानधन चांगलेच आहे.
नागार्जुन मात्र, बिग बॉसला होस्ट करण्यासाठी ५ कोटी रुपये प्रत्येक आठवड्याला घेतात. बिग बॉस मराठीची दिवसेंदिवस वाढणारी लोकप्रियता बघून मेकर्सला, महेश मांजरेकर यांना, १ कोटी इतकं मानधन देणं नक्कीच परवडत. शिवाय महेश मांजरेकर यांचा एक वेगळा असा चाहतावर्ग आहे.
त्यामुळे अनेकजण केवळ, त्यांच्या चावडीवरील मस्तीसाठी आणि स्पर्धकांना देत असलेल्या ताकीद पाहण्यासाठी बिग बॉसचा वीकेंडचा म्हणजेच चावडी खास भाग बघतात. बिग बॉसची चावडी, या शनिवार आणि रविवारच्या भागांचे टीआरपी अव्वल आहे. म्हणूनच, बिग बॉस मराठीच्या मेकर्सला, महेश मांजरेकर यांना १ कोटी मानधन देणे, नक्कीच परवडते.