‘Big Boss मराठी’ च्या घरात रंगणार ‘राम कृष्ण हरी’ चा गजर, ‘या’ प्रसिद्ध कीर्तनकाराची Big Bossच्या घरात धमाकेदार एंट्री…

‘Big Boss मराठी’ च्या घरात रंगणार ‘राम कृष्ण हरी’ चा गजर, ‘या’ प्रसिद्ध कीर्तनकाराची Big Bossच्या घरात धमाकेदार एंट्री…

मनोरंजन

नुकताच मी बॉस मराठी च्या सीझनला सुरुवात झाली आहे. हिंदी बिग बॉस ओटीटी ची सांगता झाली, आणि आता मराठी बिग बॉस ची सुरुवात अगदी धमाकेदार झाली आहे. बऱ्याच काळापासून मराठी बिग बॉसच्या सीजन ची चर्चा सुरु होती. यामध्ये कोण कोण समाविष्ट असेल याबद्दल देखील चांगलीच चर्चा रंगली होती.

वाहिनीकडून रिलीज केलेल्या टीझर मध्ये परम सुंदरी या गाण्यातील अभिनेत्री नक्की कोण आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता सगळ्यांना लागली होती. बिग बॉस हा शो कोणत्याही भाषेत तेवढाच प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहे. सुरुवातीला बिग बॉस हा शो केवळ इंग्लिश मध्ये बिग ब्रदर या नावाने येत होता. त्यानंतर हिंदी मध्ये बिग बॉस या रियालिटी शो ची सुरुवात झाली.

पहिल्याच सिझनपासून या शोला चांगलाच प्रतिसाद मिळाला. त्यामुळे या शोची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच गेली. आता बिग बॉस हिंदीचा पंधरावा सीजन काही दिवसांनी सुरू होणार आहे. बिग बॉस च्या वाढत्या लोकप्रियतेचा पार्श्वभूमीवरच त्यांच्या मेकर्स नि वेगवेगळ्या भाषेत देखील बिग बॉस सुरू केले.

केवळ हिंदी मध्येच नाही तर बिग बॉस तामिळ, मल्याळी, कन्नड आणि मराठी भाषेत देखील सुरू केले. बिग बॉस मराठीचा पहिलाच सीजन चांगलाच सुपर हिट ठरला. दुसरा सिझनदेखील त्या मनाने चांगला ठरला. त्यामुळे आता बिग बॉस थ्री चाहत्यांच्या भेटीला येऊन धडकला आहे. या बिग बॉस 3 बद्दल चाहत्यांच्या मनात चांगलीच उत्सुकता होती.

त्यादृष्टीने, यंदाच्या पर्वमध्ये कोणकोण मला मराठी कलाकार असतील, याबद्दलच्या चर्चा सोशल मीडियावर चांगल्याच रंगल्या होत्या. आणि आता कालच्या प्रीमियर नंतर सर्वच सदस्यांचा खुलासा सर्वांसमोर झाला आहे. मराठीच नाही तर हिंदी मालिकांमध्ये देखील आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या स्नेहा वाघ, या देखील बिग बॉस मराठीचा सदस्य आहेत.

शिवाय कित्येक दशकांपासून आपल्या नृत्याच्या अंदाजाने चाहत्यांना भुरळ घालणाऱ्या सुरेखा कुडची, या देखील यंदाच्या बिग बॉस मध्ये सदस्य म्हणून आल्या आहेत. त्याच सोबत वा’दग्र’स्त समाजसेविका तृप्ती देसाई यांनीदेखील बिग बॉस मध्ये हजेरी लावली आहे. मात्र या सर्वांमध्ये लक्ष वेधले आहे ते शिवलीला बाळासाहेब पाटील यांनी.

किर्तन या पुरुष प्रधान क्षेत्रांमध्ये शिवलीला पाटील यांनी आपली वेगळी नवीन ओळख निर्माण केली आहे. तरुण शिवलीला पाटील आपल्या कीर्तनाच्या द्वारे समाजप्रबोधनाचे कार्य करतात. त्यांचे कीर्तन चांगलेच प्रसिद्ध आहेत. आता याच शिवलीला पाटील यांनी देखील बिग बॉस मध्ये एन्ट्री घेतली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील, बार्शी या गावच्या शिवलीला पाटील संत साहित्य आणि संस्कृती या विषयांवर बोलत समाजप्रबोधनाचे कार्य करतात. सोशल मीडियावर देखील त्यांचे कीर्तन चांगलेच बघितले जातात. बदलत्या काळासोबत संस्कृती जपत कसे पुढे जाऊ शकतो याबद्दल मोलाचा संदेश शिवलीला पाटील आपल्या कीर्तनाद्वारे देतात.

हटके अशी विनोदी शैली आणि त्या जोडीला अभंगाचा संदर्भ, यामुळे शिवलीला पाटील यांनी अल्पावधीतच चांगलीच लोकप्रियता मिळवली. आता बिग बॉसच्या घरात हरिभक्त परायण शिवलीला बाळासाहेब पाटील कशाप्रकारे किर्तन रंगवतात हे बघणे अतिशय रंजक असेल.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *