‘बिग बी’ अमिताभ यांनी शेअर केला 1979 मधील खास फोटो, ‘या’ फोटोतील मुलाला ओळखलं का? आज आहे बॉलिवूड मधील सर्वांत मोठा स्टार…

‘बिग बी’ अमिताभ यांनी शेअर केला 1979 मधील खास फोटो, ‘या’ फोटोतील मुलाला ओळखलं का? आज आहे बॉलिवूड मधील सर्वांत मोठा स्टार…

अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत.

बॉलिवूडचे मेगास्टार बिग बी अमिताभ बच्चन याच्याबद्दल माहिती सध्या फेमस शो कौन बनेगा करोडपतीचं सूत्रसंचालन करत आहे. अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. ते सो’शल मी’डियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असतात.

तसेच अनेक फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. त्यांच्या इन्स्टाग्रामवर ते अनेक जुने फोटो देखील पोस्ट करून जुन्या आठवणींना उजाळा देत असतात. आता त्यांनी काही दिवसांपूवी एक जुना फोटो त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट केला होता. आता हा फोटो सध्या सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

हा फोटो 1979 मधील आहे, या फोटोत आपल्याला एक चिमुकला मुलगा दिसत असून हा मुलगा आज मोठा सुपस्टार बनला आहे. अमिताभ यांनी इंस्टावरून एक फोटो शेअर केला आहे. त्यांनी शेअर केलेला हा फोटो मिस्टर नटरवलाल या चित्रपटातील असून हा फोटो संगीत तालमीच्या वेळेचा आहे.

या चित्रपटात मेरे पास आओ हे गाणे त्यांनी गायले होते. याच गाण्याची ते तालीम करत असताना हा फोटो काढण्यात आला होता. हा फोटो शेअर करताना त्यांनी एक खास कॅप्शनही यास दिलं आहे. ते लिहितात, कि पहिलं गाणं मी गायलं होत ते म्हणजे मिस्टर नटवरलाल या सिनेमासाठी, मेरे पास आओ हे ते गाणे होते.

त्यावेळी म्युझिक डायरेक्टर राजेश रोशन याच्यासोबत म्युझिकच रिहर्सल आणि हे सगळं चाललं होतं तेव्हा हा फोटो काढण्यात आला होता. या फोटोत आपल्याला खुर्चीवर बसलेला एक लहान मुलगा दिसत आहे.

बिग बींचा हा फोटो सध्या सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी यावर कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. पण आपणास सांगू इच्छितो कि या फोटोत आपल्याला खुर्चीवर बसलेला एक लहान मुलगा दिसत आहे. हा लहान मुलगा दुसरा कोणीही नसून आजचा सुपरस्टार हृतिक रोशन आहे. तर या फोटोत आपल्याला राजेश रोशन दिसत आहे.

मिस्टर नटवरलाल मधील मेरे पास आओ हे मी गायलेले सगळ्यात पहिले गाणे आणि या गाण्यासाठी मी राजेश रोशन यांच्यासोबत तालीम करत होतो आणि माझ्यासोबत दोन लहान मुलं बसलेली होती. त्याच्यातील एक लहान मुलगा म्हणजे आजचा आपल्या सर्वाचा लाडका हृतिक रोशन.

हृतिक रोशनने कहो ना प्यार है या चित्रपटाद्वारे एक नायक म्हणून चित्रपटसृष्टीत एंट्री केली. हृतिकचा हा पहिला चित्रपट असला तरी या चित्रपटात त्याने रोहित आणि राज अशा दोन वेगवेगळ्या भूमिका खूपच चांगल्या प्रकारे साकारल्या होत्या.

या पहिल्याच चित्रपटासाठी हृतिकला सर्वोत्तम अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता. हृतिक रोशनने कोई मिल गया, क्रिश, काबील, धुम, जोधा अकबर यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. त्याच्या दिसण्यावर तर मुली फिदा आहेत. बॉलिवूडमधील हँडसम अभिनेत्यांमध्ये त्याची गणना केली जाते.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *