‘चला हवा येऊ द्या’ फेम भारत गणेशपुरे यांनी ३ वर्षांपूर्वी केले होते दुसरं लग्न ! पहा त्यांची पत्नी आहे खूपच सुंदर..

‘चला हवा येऊ द्या’ फेम भारत गणेशपुरे यांनी ३ वर्षांपूर्वी केले होते दुसरं लग्न ! पहा त्यांची पत्नी आहे खूपच सुंदर..

प्रेम हा प्रकारचं आसा आहे की, भल्या भल्याना भुरळ घालतो. कधी कोणाला, कोणाशी प्रेम होईल हे आपण सांगूच शकत नाही. आपल्या सिनेसृष्टीमधे तर असे अनेक उदाहरण आहेत, की एखाद्या कलाकाराला दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा किंवा कित्येकदा प्रेम झाले. असे प्रेम प्रकरण आपल्याला ऐकायला आणि बघायला देखील मिळतात.

मात्र, चित्रपट विश्वास सोबत काम करुन समोरच्याची आवड, विचार त्यांना आवडायला लागतात, सोबत खूप वेळ घातलेला असतो म्हणून सहाजिकच अजूनच जवळीक निर्माण होते आणि प्रेमाची भावना जागरूक होते.

मात्र कधी कधी याच्या उलट देखील होते. आपल्या आवडत्या व्यक्तीपासून बराच वेळ कामासाठी दूर राहावं लागत आणि मग त्या व्यक्तीवर आपले किती जीवापाड प्रेम आहे हे लक्षात येऊन त्याच व्यक्तीवर पुन्हा प्रेम होते. असे किस्से मात्र दुर्मिळच असतात. मात्र असाच एक प्रेमळ किस्सा ३ वर्षांपूर्वी बघायला मिळाला. भारत गणेशपुरे यांच्याबद्दल..

चला हवा येऊ द्या मधून घराघरात पोहोचलेले, भारत गणेशपुरे यांनी सर्वाना आपल्या खास विनोदीशैली मुळे नेहमीच सर्वाना हसवले आहे. त्यांनी चला हवा येऊ द्या च्या आधी अनेक सिनेमा आणि मालिकांमध्ये काम केले आहे. पोस्टर बॉईज आणि चि व चि सौ कां या सिनेमामध्ये, त्यांचे पात्र सर्वानाच लक्षात राहते.

त्यांनी आजवर अनेक प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. कधी आपल्या विनोदीशैलीने हसवले तर कधी आपल्या गंभीर अश्या अभिनयाने खलनायकाचे पात्र रेखाटले. मात्र सर्वाना कधी हसवणारे, तर कधी रडवणारे भारत आपल्या खऱ्या आयुष्यात इतके रोमँटिक असतील असे कोणालाच वाटले नसेल.

मात्र, भारत यांनी पुन्हा दुसऱ्यांदा लग्न केले. आणि तुम्हाला खरोखर आश्चर्य वाटेल त्यांनी हा दुसरा विवाह आपल्या पहिल्या पत्नीसोबतच केला. ‘चला हवा देऊ या’ ची टीम परदेशात गेली होती. त्यावेळी भारत आपल्या कुटुंबापासून खास करून आपल्या पत्नीपासून दूर राहिले. त्यावेळी त्यांना आपल्या पत्नीची खूपच आठवण येत होती.

आणि त्यातच त्यांना, हृ’दयविकाराचा एक सौम्य झटका आला. त्यावेळी आपल्या पत्नीवर असलेले प्रेम त्यांना पुन्हा एकदा जाणवले. सोबतच त्यांचा ज्योतिष शास्त्रवर देखील खूप विश्वास आहे, तेव्हा विदेशातून परतल्यानंतर त्यांनी आपल्या ज्योतिषाकडे धाव घेतली. त्यावेळी त्यांच्या ज्योतिषाने त्यांना पुन्हा एकदा लग्न करणायचा सल्ला दिला.

आधीच आपल्या बायकोच्या दुराव्याने पुन्हा तिच्या प्रेमात पडलेल्या भारत यांनी त्वरित हा उपाय मान्य केला आणि आपल्या वाढदिवसाच्या दिवशीच आपल्या मुलासमोर पुन्हा एकदा आपल्याच पत्नीसोबत विवाह केला.

भारत आणि अर्चना यांचा पुन्हा विवाह झाला. मात्र फक्त अंतरपाठ आणि सप्तपदीच नाही तर रीतसर हळद आणि मेहंदीचा देखील कार्यक्रम त्यांच्या लग्नात झाला होता. बरेच दिवस झाले आपल्या, इतर नातेवाईकांना आणि मित्रपरिवाराला भारत भेटले नव्हते. तेव्हा त्यांनी आपल्या लग्नाचा थाट मांडला आणि सगळ्याना आवर्जून निमंत्रण दिले होते. चला हवा येऊ द्याची पूर्ण टीम त्यांची पहिल्या बायकोसोबतच्या दुसऱ्या रिसेप्शनला हजर होती.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *