नगर जिल्ह्यातील ‘या’ पठ्ठ्याने तैवान पेरू पिकवून १४ महिन्यात घेतले चाळीस लाखाचे उत्पन्न..

नगर जिल्ह्यातील ‘या’ पठ्ठ्याने तैवान पेरू पिकवून १४ महिन्यात घेतले चाळीस लाखाचे उत्पन्न..

भारत हा कृषिप्रधान देश आहे, हे आपण लहानपणापासून असे ऐकत आलेलो आहोत. तर सध्याच्या जमान्यामध्ये शेतकरी म्हटलं की नाक मुरडणारे देखील अनेक जण आहेत. शेतकऱ्यांच्या मुलांना लग्न करण्यासाठी मुली देखील भेटत नाहीत. मात्र, आता बदलत्या भारतामध्ये आधुनिक शेती करण्याची पद्धत देखील मोठ्या प्रमाणात रुजत आहे.

मोठमोठे अधिकारी किंवा मोठ्या कंपनीत असलेले मुले देखील आता नोकरी सोडून शेतीकडे वळताहेत. तंत्रज्ञानाचा अतिशय चांगल्याप्रकारे वापर करून शेती करून लाखोंचे उत्पन्न कमावत आहेत. मात्र, कोरडवाहू शेतकरी जे असतात, त्यांना पाहिजेत असे पीक घेता येत नाही.

त्याचे कारण वेगवेगळे असते. त्या शेतकऱ्यांकडे साधन समृद्धी देखिल नसते. त्यामुळे त्या शेतकर्‍यांना असेच यश मिळत नाही. मात्र, त्यांना देखील शेतीतून उत्पन्न घेण्याची खूप मोठी इच्छा असते. मात्र, त्यांच्या बाबतीत असे होत नाही. मात्र, काही प्रयोगशील शेतकरी असे प्रयोग करून लाखोंचे उत्पन्न मिळवत आहेत.

नगर जिल्ह्यातील पारनेर येथील एका शेतकऱ्याने तब्बल चाळीस लाखाचे उत्पन्न पेरूच्या माध्यमातून कमावले आहे. या शेतकऱ्याचे नाव बाळासाहेब गुंजाळ असे आहे. त्यांच्याकडे जवळपास 35 एकर शेती आहे त्यांची शेती दैठणे गुंजाळ येथे आहे.

बाळासाहेब गुंजाळ यांनी केवळ 14 महिन्यांमध्ये आपल्या शेतीमधून चाळीस लाखाचे उत्पन्न तैवान पेरू च्या माध्यमातून कमावले आहे. आगामी तीन महिन्यात या काळामध्ये आणखी 20 लाखाचे उत्पन्न होईल असे देखील त्यांनी सांगितले आहे. याबाबत बोलताना गुंजाळ यांनी सांगितले की, पेरू हे कमी पाण्यामध्ये येणारे उत्पन्न आहे.

पेरूच्या झाडांना पावसाचे पाणी जरी आले तरी हे झाड वाढत असते. तसेच त्याला इतर पाणी लागत नाही. त्यामुळे तैवान पेरूचे पीक घेण्याचा निर्णय आम्ही काही दिवसापूर्वी घेतला होता. आम्ही दहा एकरामध्ये साडेआठ हजार झाडांची लागवड केली आहे. त्यातून हे उत्पन्न आम्हाला मिळाले आहे, असेही ते म्हणाले.

या पेरूला सध्या खूप मोठी मागणी आहे साधारणत हा एक पेरू 400 ते 900 ग्रामपर्यंत असतो. त्यामुळे या पेरूचे हे वेगळे वैशिष्ट्य आहे. तसेच हा पेरू अतिशय मऊसूत असतो आणि याची गोडी थोडी कमी असते. त्यामुळे याला मागणी जास्त आहे. बाहेर देशांमध्ये या पेरू ला खूप मोठी मागणी आहे आणि खूप दिवस हा पेरू टिकतो, असेही बाळासाहेब गुंजाळ म्हणाले.

या पेरूच्या झाडांना ठिबक सिंचनाद्वारे आम्ही पाणीपुरवठा करत असल्याचे देखील त्यांनी सांगितले. यासाठी फारसे कष्ट लागत नाहीत आणि पाणीही कमी लागते. तसेच या पिकाला कुठलाही रासायनिक खत हे लागत नाही. अतिशय कमी खर्चात घेतलेले हे पीक गुंजाळ यांना खूप मोठा नफा देऊन जात आहेत. त्यामुळे इतर शेतकऱ्यांनी देखील हे पीक घ्यावे, अशी आग्रही विनंती त्यांनी केली आहे.

admin

Leave a Reply

Your email address will not be published.