‘रंग माझा वेगळा’ फेम कार्तिक उर्फ आशुतोषचे वडील आहेत दिगग्ज मराठी अभिनेते…

‘नेपोटीझम’ हा शब्द अलीकडे चांगलाच रसिद्ध झाला आहे. आपल्याकडे या शब्दाला काय म्हणतात हे ददेखील कोणाला माहित नव्हते. मात्र बॉलीवूड मध्ये त्याचा वापर सुरु झाला आणि त्यामुळे आपल्याला देखील या शब्दाची ओळख झाली. कॉफी विथ कारण या शो मध्ये सर्वात पहिले कंगनाने करणवर तो नेपोटीझम्स चा जनक आहे असे म्हणून डिवचले.
सुरु झालेली चर्चा अजूनही सुरूच आहे. या शब्दाचा साधा आणि सोपा अर्थ म्हणजे, आपल्या आई-वडिलांच्या आणि कुटुंबाच्या मदतीने कोणत्याही क्षेत्रात प्रवेश करून तिथे यश मिळवणे. साहजिकच बॉलीवूड मध्ये याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे तिथून हा शब्द उदयास आला. केवळ बॉलीवूडचं नाही तर, मराठी चित्रपट सृष्टीमध्ये देखील आपल्याला, असे बघायला मिळतेच.
वडील किंवा आई अभिनेता किंवा अभिनेत्री आहे, आणि त्यांच्या ओळखीने किंवा त्याच्या मुळे त्यांच्या मुलांना काम मिळते. त्यामुळे जे खरोखर या जगात आपले स्थान निर्माण करण्यासाठी झटत आहेत, त्यांना मात्र निराशाच पडती पडते. त्यामुळे साहजिकच त्यांच्यावर अन्याय होतो. म्हणून सगळीकडूनच नेपोटीझम चा विरोध करण्यात येत आहे.
मात्र, काही असेही अभिनेते आणि अभिनेत्रीला आहेत. जे आपल्या पालकांची ओळख किंवा त्यांच्या नावाचा वापर न करता स्वतः संघर्ष करतात. त्यामुळे त्यांना संघर्ष देखील,करावा लागतो आणि कोणाच्या वाट्याचं नशीब त्यांनी घेतलं असा आरोप देखील होत नाही. असाच काही विचार, रंग माझा वेगळा मधील कार्तिक उर्फ आशुतोष गोखले याने केला.
आशुतोष ने आपल्या स्वतःच्या बळावर सर्व काम मिळवली. ‘तुला पाहते रे’ यामालिकेने सगळीकडे थोड्याच काळात प्रचंड लोकप्रियता मिळवली. सुबोध भावे सारख्या मोठ्या अभिनेत्यासोबत आशुतोष ने या मालिकेमध्ये काम केले. मात्र, इतक्या मोठ्या कलाकारांसोबत काम करत असताना देखील त्याने आपल्या उत्तम आणि दमदार अभिनयामुळे या मालिकेमधून आपली वेगळी ओळख निर्माण केली.
या मालिकेमध्ये त्याने सुबोध भावेंच्या छोट्या भावाची म्हणजेच जयदीप ची भूमिका साकारली होती आणि ती लोकांच्या प्रचंड पसंतीस उतरली होती. तिथूनच त्याला खरी वेगळी ओळख मिळाली. आज आपण त्याला, रंग माझं वेगळा मध्ये कार्तिक च्या भूमिकेमध्ये बघत आहे. यामध्ये प्रथम एक समंजस आणि उत्तम असा डॉक्टर आणि मुलाच्या भूमिकेत होता.
सुरुवातीला त्याच्या भूमिकेला सकारत्मक छटा होती मात्र आता, तोच साधा कार्तिक नकारत्मक झालेला दिसत आहे. आपल्या बायकोच्या चा’रित्र्यावर सं’शय घेणारा पती म्हणून तो आता पात्र रंगवत आहे. मात्र, सुरुवातीला अगदी पॉजिटीव्ह आणि आता नंतर निगेटिव्ह असे दोन्ही पण रंग यामध्ये कार्तिकचे आहेत.
आणि आशुतोष ते दोन्ही पात्र अगदी उत्तम प्रकारे रेखाटत आहे म्हणून सगळीकडून त्याचे प्रचंड कौतुक होत आहे. आशुतोष, प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेते विजय गोखले यांचा मुलगा आहे. विजय गोखले यांनी अनेक मोठाले पात्र रंगवले आहेत. त्यांच्या खास अस्यविनोदी शैली मुळे आपण सर्वच त्यांना ओळखतो. आशुतोष त्यांचाच मुलगा आहे.
‘माझ्या बाबानी जे काही कमवले त्याचा मला खूप अभिमान आहे. मात्र त्यांनी मिळवलेल्या नावावर मी काम मिळवले तर माझं वेगळं अस्तित्व कसे निर्माण होईल. म्हणून मी त्यांची ओळख सांगण्याच आवर्जून टाळतो.त्यांचा मुलगा म्हणून ओळख मला खूपच आवडतेच, मात्र माझे वडील म्हणून त्यांना ओळखले जावं यासाठी मी काम करत आहे,’ असे आशुतोष ने सांगितले होते.