‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अरुंधतीची आई देखील आहे ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री, ‘या’ हिंदी मालिकेत करतेय काम..

सध्या मराठी मालिकांची लोकप्रियता चांगलीच वाढलेली बघायला मिळत आहे. अनेक मराठी मालिकांनी टीआरपीच्या बाबतीत नवीन विक्रम केले आहे आहेत. अनेक महिन्यांपासून देवमाणूस या मराठी मालिकेने आपले अव्वल स्थान जपून ठेवले होते.
मात्र आता देवमाणूसच्या टीआरपीच्या रँकिंग मध्ये घसरण झाली आहे. एका मालिकेने सध्या राज्यातही सर्वच कुटुंबाना, भावुक करत पाहिलं स्थान प्राप्त केलं आहे. आई कुठं काय करते, या मालिकेने लोकप्रियतेच्या बाबतीत बाकी सर्वच मालिकांना आता माघे टाकले आहे. अल्पावधीतच या मालिकेने आपला भलामोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे.
आणि सध्या तर या मालिकेने संपूर्ण राज्यालाच वे’ड लावलं आहे. अरुंधतीचा सं’घर्ष बघून सर्वच, महिला चांगल्याच भावुक झाल्या आहेत. या मालिकेतील जवळपास सर्वच पात्र चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत. अरुंधती, अनिरुद्ध, संजना, गौरी, अभिषेक, यश, असे सर्वच पात्र चांगलेच लोकप्रिय झाले आहेत. मालिकेत आता अरुंधती आणि अनिरुद्धच्या घ’टस्फो’ट झाला आहे.
आई म्हणजेच अरुंधती आपलं घर सोडून जातानाचा एपिसोड बघताना सर्वांचेच डोळे पाणावले. आता अरुंधती आपल्या माहेरी आपल्या आई आणि भावासोबत राहताना दिसणार आहे. इतके दिवस केवळ दोन किंवा तीनच वेळेस अरुंधतीच्या आईला आणि भावाला दाखवण्यात आले होते. कदाचित म्हणून अरुंधतीच्या आईची ओळख सर्वाना पटली नसावी.
मात्र, अरुंधतीच्या आईची भूमिका सरकारणाऱ्या मेधा जांबोटकर या एका खूपच प्रसिद्ध अशा हिंदी मालिकेमध्ये काम करत आहेत. होय, स्टार प्लसची ‘ये रिश्ता क्या केहलता है’ या मालिकेतील अक्षरा आणि नैतिकच्या भाभी माँ दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून मेधाच आहेत. मालिकेत राजस्थानी मारवाडी भूमिका साकारणाऱ्या मेधा महाराष्ट्रीयन आहेत, हे कित्येक दिवस कोणाला ठाऊकही नव्हते.
ये रिश्ता क्या केहलता है या मालिकेने अनेक विक्रम आपल्या नावे नोंदवले आहेत. जवळपास १ दशकाहून अधिक काळापासून ही मालिका सुरु आहे, आणि अजूनहीया मालिकेचा मोठा चाहतावर्ग आहे. एवढ्या मोठ्या मालिकेत काम केल्यानंतर, एका नव्या मराठी मालिकेत काम करताना कस वाटत आहे असं मेधा यांना विचारले तेव्हा त्या म्हणाल्या की,’माझं नशीब चांगलं आहे की, मला या मालिकेत काम करायला संधी मिळाली.
सर्वसामान्य स्त्रियांच्या आयुष्याची ही कथा खूपच सुंदर पद्धतीने सर्वांसमोर मांडण्यात मेकर्सला यश आले आहे. यामध्ये अगदी छोट्या भूमिकेसाठी मला विचारण्यात आलं, मात्र इतक्या छान मालिकेचा मला भाग बनता आलं यातच मी आनंदी आहे.’ पुढे त्या म्हणाल्या, ‘दोन्ही मालिकांचे प्रोडक्शन हाऊस एकच आहे. त्यामुळे ते माझी खास काळजी घेतात.
एखाद्या दिवशी मला दोन्ही मालिकांच्या सेटवर काम करावं लागत. मात्र त्यामध्ये मला काही अडचण होऊ नये याची काळजी मेकर्स घेतात. सध्या मालिकेमध्ये अरुंधती आपल्या आईच्या घरी आपल्या आई आणि भावासोबत राहताना दिसणार आहे. इतके वर्ष खंबीरपणे संसार सांभाळून आता मात्र अरुंधती आपली नवीन ओळख बनवणार आहे.
मात्र अनिरुद्धाला आपल्या आयुष्यात अरुंधतीची कमतरता प्रकर्षाने जाणवणार आहे. मात्र या वयात आपली ओळख निर्माण करण्यात अरुंधतीला यश मिळेल कि नाही हे बघणे रोमांचक असणार आहे.