वाव ! ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेत झाली ‘या’ हॉट अभिनेत्रीची एंट्री..

मागील जवळपास एक दशकापासून तारक मेहता का उल्टा चश्मा हा शो प्रेक्षकांचे मनोरंजन करत आलेला आहे. दैनंदिन जीवनात सुरू असलेला ताण दुःख सर्व बाजूला ठेवून काही वेळ तरी हा शो बघून लोक खळखळून हसतात. यामुळे आपला त्रास काही काळ तरी लोक विसरून जातात आणि हाच या शोचा मुख्य हेतु होता.
सुरुवातीपासूनच या शोचा टीआरपी अव्वल राहिला आहे. आता या शोचे फॅन्स फक्त भारतातच नाही तर सातासमुद्रापार इतर देशातही बनले आहे. गोकुळधाम सोसायटी ची ओळख केवळ आपल्या देशात नाही तर संपूर्ण जगात आहे. या मालिकेमध्ये नवीन पात्राची एन्ट्री होणे हे सुरूच असते. काही काळापासून या मालिके मधील काही प्रमुख पात्र मिसिंग आहे, तरी या मालिकेचा टीआरपी चांगला आहे.
जेठालाल आणि त्याचा मित्र तारक यांची केमिस्ट्री खासकरून सर्वांच्या पसंतीची आहे. आता सध्या मालिकेत याच तारक मेहता ची असिस्टंट म्हणून एक हॉ’ट अभिनेत्री पदार्पण करत आहे. अभिनेत्री अर्शी भारती या शोमधून टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये एन्ट्री करत आहे. सध्या ची कथा तारक मेहता आणि त्याच्या ऑफिसच्या अवतीभवती फिरत आहे.
बऱ्याच दिवसांपासून तारक मेहता आणि त्याच्या ऑफिस मध्ये सुरू असलेल्या गोष्टीबद्दलच या मालिकेत दाखवण्यात येत आहे. बर्याच दिवसांनी तारक ऑफिसला जातो, मात्र पुन्हां जेठालाल साठी आपल्या बॉसला खोटं बोलून सुट्टी घेतो. तारक मेहता ची सेक्रेटरी म्हणून अर्शी भारती आता झळकणार आहे, तर तारक मेहताच्या बॉसच्या भूमिकेत राकेश बेदी दिसत आहे.
अर्शी भारती हिने यापूर्वी देखील काही सिनेमांमध्ये काम केले आहे. अर्जुन कपूर आणि कृती सेनन यांचा बहुचर्चित सिनेमा पानिपत यामध्ये देखील तिने भूमिका साकारली आहे. या सिनेमांमध्ये ती कृती सेननच्या मैत्रिणीच्या भूमिकेत दिसली होती. तारक मेहता मध्ये काम करायला भेटलं यासाठी ती अतिशय उत्सुक आहे.
विशेष म्हणजे या भूमिकेसाठी तिने ऑडिशन देखील दिले होते. ऑडिशन दिल्यानंतर इतक्या मोठ्या मालिकेत आपल्याला काम भेटेल याची आशा सोडून देत ती त्याबद्दल विसरून देखील गेली होती. मात्र अचानक एक आठवड्याने तिला मेकरचा फोन आला आणि तिला शॉर्टलिस्ट केली असल्याचं सांगितलं हे ऐकून तिला आश्चर्याचा सुखद धक्का बसला.
मात्र एवढ्या मोठ्या मालिकेत काम करायला भेटत आहे याचा तिला आनंद झाला आहे. तारक मेहता चा फॅन कोण नाहीये, आपल्या देशात असा एकही व्यक्ती भेटणार नाही ज्यांनी तारक मेहता का उल्टा चश्मा मालिका पाहिली नाही. एकदा तरी कोणी न कोणी या मालिकेचा जबरदस्त फॅन बनलेलाच आहे. या मालिकेत काम करायला भेटण हे मोठं स्वप्न पूर्ण झाल्या सारखाच आहे, असं अर्शी म्हणाली आहे.