‘या’ एकमेव मराठी कलाकाराने दिला क्रांती रेडकर आणि समीर वानखेडे यांना पाठिंबा, सांगितले आपले मराठी कलाकार पुढे का येत नाही?

‘या’ एकमेव मराठी कलाकाराने दिला क्रांती रेडकर आणि समीर वानखेडे यांना पाठिंबा, सांगितले आपले मराठी कलाकार पुढे का येत नाही?

मागील जवळपास एक महिन्यापासून सगळीकडे केवळ आर्यन खान या एकाच नावाची चर्चा बघायला मिळत आहे. महिन्याच्या सुरुवातीलाच अ’मली प’दार्थ विभागाच्या अधिकाऱ्यांनी आर्यन खानला अ’टक केली आणि त्यानंतरच सगळीकडे त्याबद्दल चर्चा सुरू झाली. जवळपास एक महिना झाला असला तरीही आर्यन खानला अजून जामीन मिळालेला नाही.

काल रात्री उशिरापर्यंत याच प्रकरणाबद्दल को’र्टामध्ये यु’क्तिवा’द सुरू होता. मात्र काल रात्री को’र्टाने याबद्दल कोणताही निर्णय देण्यास नकार दिला आणि निर्णय स्वतःकडे राखून ठेवला आहे. मात्र यामध्ये अनेक वेगवेगळ्या दिग्गज आणि सेलिब्रिटीजच्या नावाचा उल्लेख झाल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्र राज्यातील काही दिग्ग्ज नेत्यांच्या मुलाचा सं’बंध जाणून-बुजून या प्रकरणामध्ये जोडला जात होता.

त्याबद्दलची योग्य माहिती देखील, नैतिक जबाबदारी म्हणून एनसीबीने दिली नाही. म्हणून पुन्हा एकदा राज्याचीच ब’दना’मी होत होती. म्हणून, ‘काम करा पण योग्य पद्धतीने’ इथून नवाब मलिक यांनी आपला सल्ला देण्यास सुरुवात केली. पण त्या सल्ल्याचा चुकीचा अर्थ घेऊन वानखेडे यांनी आपले टीकास्त्र चालूच ठेवले. त्यानंतर अखेर नवाब मलिक यांनी, समीर वानखेडे मुस्लीम असल्याचा दावा केला आणि त्याबद्दलचे अनेक पुरावे सगळ्यांना दिले.

नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांचा जन्म दाखला आणि पहिल्या लग्नाचा फोटो पोस्ट करत ते मुस्लिम असल्याचा दावा केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून समीर वानखेडे यांची दुसरी पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकर हिने देखील एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये नवाब मलिकांवर तिने खो’चक टी’का देखील केली. ‘आज-काल बायका पण असं वागत नाही.

हे सगळं किचनमधले पॉलिटिक्स आहे. एखादी चाळ आहे का? चोमडेपणा केल्यासारखं वागायला. यांना लाज वाटत नाही का?’ असं म्हणत तिने महाराष्ट्र सोबतच, देशभरातून समर्थनाचे मेसेज येत आहेत. परंतु ते उघडपणे दाखवू नये अशी विनंती ते लोकं करत असल्याचे सांगितले आहे. सोशल मीडियावरती मात्र या सर्व प्रकरणांमध्ये संमिश्र प्रतिसाद बघायला मिळत आहे.

परंतु एकही मराठी कलाकार अजून पर्यंत क्रांतीच्या पाठिंब्यासाठी का पुढे येत नाही, अशा चर्चांना उधाण आले आहे. त्यातच अभिनेता ‘आरोह वेलणकर’ याने देखील हाच सवाल सर्वांना केला आहे. सोशल मीडिया वरती एक पोस्ट करत क्रांतीला त्याने जाहीर पाठिंबा दिला आहे. ‘क्रांती मला खरंच आश्चर्य वाटतं की, आपल्या मराठी इंडस्ट्री मधील एकही मित्र तुझ्या पाठिंब्यासाठी उघडपणे समोर आलेला नाही.

सोशल मीडिया वरून सुरू असलेली तुझ्या कुटुंबा वि’रोधातील ही मोहीम अ’स्वस्थ करणारी आहे. मला माहित आहे आपण खूप चांगले मित्र नाही. फक्त ओळखीचे आहेत. मात्र तरीही माझा तुला पूर्णपणे पाठिंबा आहे.’ असं म्हणत त्याने क्रांतीला जाहीरपणे पाठिंबा दिला आहे. सोशल मीडिया वरून पुढाकार घेणारा हा पहिलाच मराठी अभिनेता आहे.

सोशल मीडिया वरती समीर वानखेडे आणि नवाब मलिक, या प्रकरणाला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. ‘तुम्ही देखील इतरांच्या खासगी आयुष्याबद्दल चॅट आणि इतर गोष्टी उघडपणे न्यूज चॅनल वाल्यांना विकतात. त्यावेळी तुमची प्रायव्हसी कुठे जाते,’ असा सवाल एका नेटकऱ्याने क्रांतीला विचारला आहे. तर काहींनी तिचे समर्थन देखील केले आहे.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *