२ रुपयांसाठी ‘चला हवा येऊ द्या’ मधील ‘हा’ कलाकार भांड्यावर लिहायचा नाव..

राज्य काय,देश काय, तर साता समुद्रापार प्रक्षकांना हसवून ‘चला हवा येऊ द्या’ शो,अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर जाऊन पोहोचला. या शो ने मराठी चित्रपटसृष्टीमधील विनोदी कलाकरांना एक वेगळीच आणि खास अशी ओळख मिळवून दिली.
अर्थातच त्यासाठी त्या सर्व कलाकारांनी अथक परिश्रम घेतले, आणि आज केवळ राज्यातीलच नाही तर देशातील नावाजलेल्या मोठ्या कॉमेडी शो पैकी एक म्हणून हा शो ओळखला जातो. भाऊ कदम यांची भन्नाट विनोदी शैली, सोबतीला श्रेया बुगडे आणि भारत गणेशपुरे यांची परफेक्ट टायमिंग, कुशल बद्रिके आणि सागर करांडे यांची धमाल मस्ती या सर्वांचे मिश्रण म्हणून ‘चला हवा येऊ द्या’ हा शो प्रेक्षकांसाठी पर्वणीच आहे.
या शोने केवळ मराठीच नाही तर बॉलीवूड मधील दिगग्जना देखील आपल्याकडे आकर्षित केले. बॉलीवूडचा भाईजान सलमान खान पासून ते सिंघम रोहित शेट्टी, बाजीराव रणवीर सिंह सोबत अनेक बॉलीवूड करांनी या शो मध्ये हजेरी लावली होती.
राजकारण, खेळ, बातम्या सगळंच काही अगदी मनोरंजन आणि विनोदी शैली मध्ये, चला हवा येऊ द्या मधले कलाकार आपल्या सर्वां समोर मांडत असतात. आणि प्रेक्षकांचा त्याला भरगोस असा प्रतिसाद देखील मिळतो. चला हवा येऊ द्या मधील जवळपास सर्वच कलाकार कोणत्या ना कोणत्या मराठी सिनेमामधून किंवा मालिकेमधून प्रेक्षकांना भेटले होते.
पण त्यांना जी ओळख चला हवा येऊ द्या मधून मिळावी त्याची त्यांनी कल्पना देखील केली नव्हती असे, यामध्ये काम करणारे अनेक कलाकार सांगतात. आज या सर्व कलाकरांना, राज्यातीलच काय कर देशातील जनता देखील ओळखते. जवळपास सर्वच कलाकारांना हे यश मिळवण्यासाठी अनेक कठीण प्रसंगांना तोंड द्यावे लागले होते, प्रत्येकाचा संघर्ष वेगळा होता.
याच सर्वांमध्ये अजून एक महत्वाचे नाव आहे अंकुर वाढावे यांचं. आपल्या खास अश्या विनोदी शैलीने, प्रेक्षकांना खळखळून हसवणारा अंकुर, कधी काळी इतका संघर्षमय जीवन जगत होता यावर तुमचा विश्वासच बसणार नाही. चला हवा येऊ द्या च्या आधी अंकुर यांनी, गाढवाचं लग्न, सर्किट हाऊस, आम्ही सारे फर्स्ट क्लास अश्या नाटकांमधून काम केले आहे.
सोबतच काही मराठी चित्रपटांमध्ये देखील त्याने काम केले आहे, मात्र अंकुर ला खरी ओळख मिळाली ती चला हवा येऊ द्या मधूनच. आपल्याला खळखळून हसवणाऱ्या अंकुरचा प्रवास मात्र खूप संघर्षमयी होता. त्याबद्दलचा खुलासा एका व्हिडियोद्वारे त्याने केला आहे. आपल्या सोशल मीडियाच्या अकाउंट वरून एक व्हिडियो शेअर करत आपल्या जुन्या कठीण दिवसांच्या आठवणींना उजाळा दिला.
‘आज खूप दिवसांनी हि मशीन हाती घेतली आहे. बहिणीचं लग्न आहे ना म्हणून आईने या कामाला लावलं. आज बहिणीच्या मायेपोटी तिच्या भांड्यावर नावं टाकत आहे. मात्र एक वेळ अशी होती जेव्हा २ रुपयांसाठी भांड्यावर नावं टाकण्याचं काम करत होतो. अक्षर चांगलं होत म्हणून लोकं येत होते, आणि अवघ्या दोन रुपयांवर मी भांड्यावर नाव टाकून देत होतो.
असे अंकुर ने आपल्या पोस्ट मध्ये लिहले आहे. यश मिळाल्यावर आपल्याला प्रत्येक व्यक्तीचा हेवा वाटतो, मात्र त्यासाठी त्या व्यक्तीने आधी किती संघर्ष केला आहे याचा आपण अंदाज देखील लावू शकत नाही.