अवघ्या ३ सिनेमात काम करणारी अनन्या पांडे आहे कोट्यवधी रुपयांची मालकीण, संपत्तीच्या बाबतीत वडील चंकी पांडेलाही टाकते मागे…

अवघ्या ३ सिनेमात काम करणारी अनन्या पांडे आहे कोट्यवधी रुपयांची मालकीण, संपत्तीच्या बाबतीत वडील चंकी पांडेलाही टाकते मागे…

सुरुवातीपासूनच अनेक स्टार किड्स चांगले चर्चेमध्ये राहतात. अशाच चर्चेमध्ये राहणाऱ्या स्टार कीडपैकी एक अनन्या पांडे देखील आहे. अभिनेता चंकी पांडेची मुलगी म्हणून अनन्याला सगळीकडे ओळखले जात होते, मात्र आता तिने आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. सुरुवातीपासूनच अनन्याने चांगलीच चर्चा रंगवली होती.

करन जोहरच्या स्टुडंट ऑफ द इयर २ मधून तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. त्यापुर्वी देखील तिच्या बद्दल चांगल्याच चर्चा रंगल्या होत्या. स्टुडन्ट ऑफ द इयर १चांगलाच लोकप्रिय ठरला. आलिया भट, वरून धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रा या तिघांनी आपल्या दमदार अभिनयाने आणि जोडीला करण जोहरचा बॉलिवूडचा ठरलेला मसाला यामुळे तो सिनेमा सुपरहिट ठरला.

त्यानंतर लगेच, करण जोहरने स्टुडन्ट ऑफ द इयर 2 ची घोषणा केली होती. या सिनेमामध्ये काम करण्यासाठी अनेक स्टार किड्स उत्सुक होते. पण ती संधी अनन्या पांडे आणि तारा सुतारियालाच मिळाली. या सिनेमामध्ये तारा सुतारिया आणि अनन्या पांडे सोबत टायगर श्रॉफ देखील झळकला होता.

पण पहिल्या सिनेमाच्या तुलनेत स्टुडन्ट ऑफ द इयर 2ने बॉक्स ऑफिसवर पाहिजे तशी उत्तम कामगिरी नाही केली. त्यातच एका मुलाखतीममध्ये, हा रोल मिळवण्यासाठी मला खूप स्ट्रगल करावे लागले, असे अनन्या पांडे बोलून गेली. त्यानंतर सगळीकडेच तिला चांगलेच ट्रोल करण्यात आले. विशेष म्हणजे या मधून तिला चांगलीच प्रसिद्धी मिळाली.

आर्यन खान मुंबई क्रूज-ड्रग्स प्रकरणांमध्ये देखील ती अडकली होती. आर्यन खान सोबत केलेल्या चॅटिंग मुळे एनसीबीने तिची कसून चौकशी केली होती. मात्र, चॅटिंग करत असताना तो केवळ एक मस्करीचा भाग होता, असेच वारंवार तिने म्हटले. तिच्या विरोधात कोणतेही ठोस पुरावे नसल्यामुळे, तिला अटक नाही झाली. पण त्यातून तिची चांगलीच चर्चा रंगली होती.

पहिल्याच सिनेमा नंतर मात्र अनन्याने निवडक सिनेमांमध्ये काम करण्याचे ठरवले. पती पत्नी और वो या सिनेमाचे कथानक आवडले म्हणून, कार्तिक आर्यन आणि भुमी पेडणेकर यांच्यासोबत तिने काम केले. इशान खट्टर सोबत खालीपिली या सिनेमात देखील ती झळकली होती. त्याचबरोबर अनेक जाहिरातींमध्ये देखील अनन्या पांडे झळकत असते.

चित्रपटसृष्टी मध्ये आपल्या अवघ्या दोन-तीन सिनेमातच इतकी जास्त प्रसिद्धी मिळणाऱ्या काही निवडक अभिनेत्रींपैकी एक अनन्या पांडे देखील आहे. अवघ्या तेवीस वर्षांच्या अनन्या पांडेची एकूण संपत्ती जवळपास 72 कोटी रुपयांची आहे. नुकताच अनन्या पांडे हिने 23 व्या वर्षात पदार्पण केले आहे,त्यामुळे सोशल मीडिया वरती तिची चांगलीच चर्चा रंगलेली बघायला मिळत आहे.

अनन्या एका सिनेमासाठी दोन ते तीन कोटी रुपये मानधन घेतले. त्याच बरोबर अनेक ब्रँड्सच्या जाहिरातींमध्ये देखील ती काम करते. त्यातून देखील दिला कोटींच्या घरात कमाई होते. सोशल मीडियावर देखील तिचे लाखो चाहते आहेत. तिच्या फोटो आणि व्हिडिओवरती चहा ते भरभरून प्रतिसाद देतात. विजय देवरकोंदा सोबत लायगर या चित्रपटातून ती तेलगू सिनेमा देखील पदार्पण करणार आहे. त्याचबरोबर दिग्दर्शक शकुन बत्रा यांच्या चित्रपटात देखील ती दीपिका पादुकोण आणि सिद्धार्थ चतुर्वेदी सोबत झळकणार असल्याचे बोलले जात आहे.

Neeta

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *