फोटोतल्या ‘या’ चिमुकलीला ओळखलं का? आज मराठी चित्रपटसृष्टीत गाजवतेय नाव, पहा आई देखील आहे आघाडीची अभिनेत्री…

फोटोतल्या ‘या’ चिमुकलीला ओळखलं का? आज मराठी चित्रपटसृष्टीत गाजवतेय नाव, पहा आई देखील आहे आघाडीची अभिनेत्री…

आपण अनेक वेळा आपल्या आवडत्या कलाकारांचे बालपणातील फोटो बघतो आणि आपल्याला ते ओळखता येतातच असे नाही. सध्याच्या ह्या डिजिटल जगात, सो’शल मी’डियामुळे आपल्या आवडीच्या कलाकारांचे आयुष्य आपण जवळून बघू शकतो.

सोशल मीडियावर अनेकवेळा आपल्या आयुष्यातील क्षण सोशल मीडियावर टाकतात. अश्या वेळी ते कलाकार आपल्या बालपणीचे फोटोज देखील आपल्या सुखद अनुभवासह टाकतात. कलाकारांचे हे बालपणीचे फोटो बघून ते नक्की त्याच कलाकारांचे आहेत का असेही बऱ्याच वेळा आपल्याला वाटते.

कलाकार आपल्या आठवणी, आपले मौल्यवान क्षण सोशल मीडियावरील आपल्या अकाउंट वरून चाहत्यांसोबत शेअर करत असतात त्याचबरोबर आपल्या चाहत्यांसाठी व्हिडियो देखील शेअर करत असतात.

सध्या बऱ्याच दिवसांपासून एका चिमुकलीचा फोटो सध्या सो’शल मी’डियावर चांगलाच व्हा’यरल झाला आहे. हि चिमुकली दुसरी तिसरी कुणी नसून प्रसिद्ध अभिनेत्री अमृता सुभाष आहे. अमृता सुभाष हिने सोशल मीडियावर तिच्या लहानपणीचा आईसोबतचा फोटो शेअर केला आहे.

अमृता ही प्रसिद्ध अभिनेत्री ज्योती सुभाष यांची मुलगी आहे. फोटोमध्ये तिच्यासोबत ज्योती सुभाष देखील आहेत. अमृताने या फोटोला ‘आई’ असे अर्थपूर्ण कॅप्शन दिले आहे. अमृताच्या या फोटोवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा अक्षरशः वर्षाव केला आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून अमृता नेहमीच आपल्या फॅन्सच्या संपर्कात असते. तिच्या फोटो आणि व्हिडीओना फॅन्स भरभरुन लाईक्स आणि कमेंट्स देत असतात. आपल्या खासगी आणि आगामी प्रोजेक्टबद्दलची सर्व माहिती ती फॅन्स सोबत देखील शेअर करते. ती आपले फोटोसुद्धा फॅन्ससह शेअर करत असते आणि त्यांच्यासोबत संवाद देखील साधत असते.

अमृताचे शिक्षण दिल्ली येथील नॅशनल स्कूल आॅफ ड्रामामध्ये झाले आहे. तिने हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषांच्या नाटकात काम केले. तिचे ‘ती फुलराणी’ हे नाटक खूप गाजले. २००४ साली तिने ‘श्वास’ या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. अमृता ही एक प्रशिक्षित शास्त्रीय गायिका सुद्धा आहे.

२०१२ साली तिने मराठी ‘सा रे ग म प’ या रिअ‍ॅलिटी शोच्या सेलिब्रिटी पर्वात भाग घेतला होता. अमृता सुभाष ही उत्तम लेखिका असून तिचे २०१४ साली ‘एक उलट एक सुलट’ हे पुस्तक प्रकाशित झाले. अमृता ह्यांनी हिंदी चित्रपटांमध्ये देखील चांगलीच धुमाकूळ घातली आहे.

ओटीटी प्लॅटफॉर्म वर देखील अमृता सुभाष ह्यांनी काम केलं आहे. बॉलिवूडचा काही वर्षांपूर्वीचा सर्वात हिट ठरलेला सिनेमा ‘गल्ली बॉय ‘ ह्यामध्ये देखील तिचे पात्र प्रेक्षकांच्या चांगलेच पसंतीस उतरले आहे.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *