अभिमास्पद ! क्रिकेटमध्ये, आपल्या फलंदाजीने गोलंदाजांना घाम फोडणारा, ‘हा’ भारतीय खेळाडूने IAS ची परीक्षा पास करून झालाय कलेक्टर…..

आपल्याकडे, खेळापेक्षा जास्त अभ्यासावर भर दिला जातो. अर्थातच त्याचे कारण देखील तसेच आहे, प्रत्येक पालकांना वाटते आपल्या पाल्याचे भविष्य सुरक्षित असावे. खेळ किंवा कला हे उत्तम क्षेत्र आहे, मात्र त्यामध्ये सगळ्यांनाच यश मिळते असे नाही. त्यामुळे खेळ आणि कला क्षेत्राला, आपल्या इकडील पालक दुर्लक्ष करत अभ्यासावर भर देण्यास सांगतात.
त्यासाठीच हिंदीमध्ये एक म्हण आहे ‘खेलोगे कूदोगे तो होओगे खराब और पढ़ोगे, लिखोगे तो बनोगे नवाब…!’ ज्यांनी-ज्यांनी भारताचा सगळ्यात लोकप्रिय कर्णधार ह्यावर बनलेला ‘एम एस धोनी ‘ हा सिनेमा पहिला असेल त्यांना हि म्हण, नक्कीच तोंडपाठ असेल.
खेळ आणि अभ्यास ह्या दोन्ही क्षेत्रात उत्तम अशी कामगिरी करणारा व्यक्ती खरोखरच दुर्मिळ असतात. असे क्वचितच कोणी आपल्याला आढळून येतात जे खेळासहित, अभ्यासात देखील अव्वल असतात. आणि अश्याच दुर्मिळ व्यक्तींपैकी एक खेळाडू आपल्या भारतीय क्रिकेट संघामध्ये होता. ज्याने आपल्या खेळाने कौतुक तर कमवलेच होते, सोबतच तो चक्क IAS परीक्षा पास झाला होता.
होय, आपल्या भारतीय संघात असा एक क्रिकेटर होता की जो खेळण्यात आणि अभ्यासातही पुढे होता ! त्याने फक्त पदवीच संपादन केली नाही, तर त्याचबरोबर त्याने देशातील सर्वांत कठीण समजली जाणारी IAS परीक्षा देखील पास केली. यानंतर त्याने भारतीय क्रिकेट संघात दमदार एन्ट्री केली. या खेळाडूचं नाव आहे अमय खुरासिया आणि हा खेळाडू ९०च्या दशकात भारतीय संघासाठी क्रिकेट खेळत होता.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दुसऱ्या बॉलवर चौकार मारत पहिल्याच मॅचमध्ये पटकवाले होते अर्धशतक.
श्रीलंकेविरुद्धच्या पेप्सी चषक स्पर्धेत भारताकडून खुरासियाने १९९९ मध्ये एकदिवसीय सामन्यात प्रवेश केला होता.आपल्या पदार्पणाच्या सामन्यात त्याने दुसर्याच चेंडूवर चौकार ठोकला आणि त्यानंतर केवळ ४५ चेंडूत ५७ धावांची त्याने तुफान खेळी केली.
पहिल्याच एकदिवसीय सामन्यात अर्धशतक करणारा तो आठवा भारतीय क्रिकेटपटू ठरला. पेप्सी कपमधील ह्या उत्तम कामगिरीमुळे त्याला १९९ वर्ल्ड कपसाठी टीम इंडियामध्ये स्थान देखील देण्यात आले होते पण, त्याला खेळायची संधी मिळाली नाही.
कालांतराने त्याला संघातून वगळण्यात आलं. मात्र २००१ मध्ये अमय खुरासियाने पुन्हा भारतीय संघात स्थान मिळवलं. या वेळी पुन्हा श्रीलंकेविरुद्ध त्याला संधी मिळाली पण त्याची बॅट त्यावेळी बोलली नाही. त्यानंतर मात्र त्याला भारतीय संघात स्थान मिळवता आले नाही.
IAS परीक्षा पास आणि मोठ्या पदावर नियुक्ती झाली.
मध्य प्रदेश येथील जबलपूर येथे अमय खोरासियाचा जन्म झाला.भारतीय संघामधील, तो डावखुरा फलंदाज होता. जलद धावा करण्याची उत्तम कला त्याच्याकडे होती. पण, भारतीय संघात स्थान मिळवण्यापूर्वीच त्याने आयएएस परीक्षा पास केली होती व भारतीय सीमा शुल्क आणि केंद्रीय उत्पादन शुल्क विभागात निरीक्षक पदावर त्याची नेमणूक झाली.
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १९८९-१९९० च्या हंगामापासून त्याने पदार्पण केले आणि तो २००४-२००५ च्या हंगामापर्यंत खेळत होता. देशांतर्गत क्रिकेटमध्ये मध्य प्रदेशसाठी त्याने ११९ प्रथम श्रेणी सामन्यात ४०.८० च्या सरासरीने तब्ब्ल ७३०४ धावा केल्या होत्या. २३८ हि त्याची सर्वोत्तम धावसंख्या होती. प्रथम श्रेणीमध्ये त्याने २१ शतके तर ३१ अर्धशतके झळकावली. १९९०-९१, १९९१-९२ आणि २०००-०१ च्या प्रथम श्रेणी हंगामामध्ये त्याने ५०० हून अधिक धावा फटकावल्या होत्या.
अवघ्या १२ वनडे सामने खेळून आपलं करिअर संपवलं
भारताकडून अमय खुरासियाने १२ एकदिवसीय सामने खेळले. त्याने १९९९ मध्ये यापैकी १० सामने खेळले. १३.५४ च्या सरासरीने त्याने १४९ धावा केल्या. जेव्हा खुरासिया निवृत्त झाला तेव्हा तो आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वी होऊ शकला नाही, याची खंत त्याच्या मनात कायम होती. २००७ मध्ये त्याने क्रिकेटला गुड बाय केलं आणि यानंतर त्यांनी प्रशिक्षण आणि कॉमेंट्रीमध्ये आपली नवी इनिंग सुरु केली.