‘बिग बॉस’ मराठीमधील ‘हा’ स्पर्धक आहे अभिनेते दादा कोंडके यांचा नातू, आपल्या फिट बॉडीमुळे आहे प्रसिद्ध…

‘बिग बॉस’ मराठीमधील ‘हा’ स्पर्धक आहे अभिनेते दादा कोंडके यांचा नातू, आपल्या फिट बॉडीमुळे आहे प्रसिद्ध…

मनोरंजन

बिग बॉसचे घर कायमच वेगवेगळ्या गोष्टींसाठी प्रसिद्ध ठरले आहे. हिंदी बिग बॉसमध्ये अनेक वेगवेगळ्या लोकांना आपले कौशल्य दाखवत प्रसिद्धी कमावण्याची संधी मिळाली होती. त्याच प्रकारे आता बिग बॉस मराठीमध्ये देखील, आपली असलेली प्रतिमा क्लीन करण्याची संधी मराठी कलाकारांना आणि सेलिब्रिटीजला मिळत आहे.

त्यामध्ये, अनेक सेलिब्रिटीज त्याचा उपयोग देखील करत असलेल्या बघायला मिळत आहे. बिग बॉस मराठीच्या नवीन पर्वाला नुकतीच सुरुवात झाली आहे. आणि यंदाच्या सीझनमध्ये अनेक वा’दग्र’स्त अशी नावे या घराची सदस्य आहेत. त्यामुळे सुरुवातीपासूनच मेकर्सने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे.

वैविध्यपूर्ण अशा सदस्यांना घेऊन कदाचित हा सीजन अजूनच जास्त रोमांचकारी ठरेल याबद्दल, आता चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. यामध्ये एका नावाची चांगलीच चर्चा सध्या रंगलेली आहे. या नावाचा थेट संबंध मराठी चित्रपट सृष्टीचे सर्वोत्तम अभिनेते दादा कोंडके यांच्याशी आहे. सत्तर ते ऐंशीच्या दशकात दादा कोंडके यांनी कित्येक सुपरहिट सिनेमे दिले.

बहुरंगी व्यक्तिमत्त्व असणाऱ्या दादा कोंडके यांनी, मराठी चित्रपटसृष्टीवर आपल्या अभिनयाने आणि दर्जेदार अशा चित्रपटाने सर्वांनाच भुरळ घातली होती. त्यावेळी त्यांची लोकप्रियता एखाद्या हिंदी सिनेमाच्या अभिनेत्या पेक्षाही जास्त होती. दादा कोंडके यांची नक्कल करत, आज देखील अनेक कलाकार रसिकांचे मनोरंजन करत असलेले आपल्याला बघायला मिळतात.

त्यांना बघत दादा कोंडकेच्या आठवणी मध्ये अनेक रसिक रमतात तर, तरुण वर्ग पुन्हा एकदा दादा कोंडके यांचे सिनेमे बघून मनोरंजनाचा आनंद घेतात. केवळ अभिनयच नाही तर, अनेक सिनेमांची निर्मिती दादांनी केली. एक दोन नाही तर, तब्बल 16 चित्रपटांची निर्मिती दादांनी केली होती. या चित्रपटांचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे प्रदर्शित झालेले सगळे सिनेमे रौप्यमहोत्सवी ठरले.

या दैदीप्यमान विक्रमामुळे त्यांचे नाव गिनीज बुक मध्ये देखील नोंदवले गेले होते. डबल मीनिंग डायलॉग ही त्यांच्या चित्रपटांची खासियत होती. तरीही रसिकांना त्यांच्या सर्वच कलाकृती आवडतच होत्या. दादा कोंडके यांची लोकप्रियता इतकी जास्त होती की, लोकांनी अक्षरशः त्यांना डोक्यावरच उचलून धरले होते. त्यांच्या याच अभिनयाचा वारसा आता त्यांची पुढची पिढी संभाळत आहे.

अत्यंत कमी लोकांना माहित आहे की, मराठी अभिनेता अक्षय वाघमारे हा दादा कोंडके यांचा नातू आहे. अक्षय वाघमारे आपल्याला बिग बॉसच्या घरात बघायला मिळत आहे. विशेष म्हणजे अरुण गवळी यांचा जावई म्हणून अक्षय वाघमारेला ओळखले जाते. 2020 मध्ये लॉकडाऊनचे सर्व नियम पाळत अक्षयने अरुण गवळी यांची मुलगी योगिता हिच्यासह लग्न करत ताटात संसार मांडला.

या दोघांचं लग्न दगळी चाळमध्येच झालं होतं. या लग्नात फक्त दोन्हीकडचे कुटुंबीय उपस्थित होते. अक्षय केवळ अभिनय यासाठीच नाही तर, त्याच्या फिटनेससाठी देखील चांगलाच चर्चेत असतो. सोशल मीडियावर त्याचे अनेक वर्कआउट व्हिडिओ आणि फोटोज बघायला मिळतात. कोणत्याही परिस्थितीत आपल्या फिटनेस सोबत तो कधीच तडजोड करत नाही.

त्यामुळेच अगदी पिळदार बॉडी बनवण्यात त्याला यश मिळाले आहे. फत्तेशिकस्त,बेधडक, दोस्तीगिरी, बस स्टॉप यांसारख्या सुपरहिट ठरलेल्या मराठी सिनेमात त्याने काम केले आहे. मात्र आता बिग बॉस 3 मध्ये नक्की त्याचा खेळ कसा असेल हे बघणे रोमांचकारी ठरेल.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *