बिग बॉसमधील ‘हा’ कलाकार आहे ‘अरुण गवळी’ उर्फ ‘डॅडी’ यांचा जावई…पहा फोटो..

मनोरंजन
मराठी बिग बॉसचे तिसरे पर्व 19 सप्टेंबरपासून कलर्स मराठी या वाहिनीवर सुरू झाले आहे. या शोमध्ये अनेक कलाकार आपल्याल दिसत आहेत. त्यामध्ये मीरा जोशी, भुमाता ब्रिगेड अध्यक्ष तृप्ती देसाई यांच्यासह इतरांचा समावेश आहे. त्यामुळे या शोमध्ये आता खूप मोठ्या प्रमाणात रंगत येत असल्याचे दिसत आहे.
प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते महेश मांजरेकर या शोचे सूत्रसंचालन करताना दिसताहेत. मराठी बिग बॉस मध्ये याआधी अनेक कलाकार सहभागी झाल्याचे आपण पाहिले आहे. बिग बॉसच्या गेल्या पर्वामध्ये आपण उषा नाडकर्णी सारख्या ज्येष्ठ अभिनेत्रीला सहभागी झाल्याचे पाहिले होते.
उषा नाडकर्णी या देखील या शोमध्ये सहभागी होऊन त्यांनी आपल्या बोलण्या वागण्याने सगळ्यांनाच आपलेसे केले होते. या शोमध्ये त्यांचा आदर देखील करण्यात आला होता. उषा नाडकर्णी यांचा आनंद नाडकर्णी यांच्या सोबत घटस्फोट झाला आहे. गेल्या काही वर्षापासून ते एकटेच राहत आहेत. तसेच या शोमध्ये किशोरी शहाणे या देखील सहभागी झालेल्या होत्या.
किशोरी शहाणे यांनी देखील या शोमध्ये आपल्या अदाकारीने सगळ्यांनाच घायाळ केले होते. आता यंदाच्या शोमध्ये मीरा जगन्नाथ यांच्यासह भरमसाठ कलाकार यामध्ये सहभागी झालेले आहेत. बिग बॉसच्या पहिल्या दिवशी मीरा जोशी हिने अनेकांसोबत भांडण केल्याचे पाहायला मिळत आहे. कारण अगदी शुल्लक होते.
जेवण बनवले नाही आणि ते पुरले नाही. यामुळे तिने सहकारी स्पर्धकाला चांगलेच सुनावले. मला सकाळी ब्रेकफास्ट पूर्ण भेटला नाही. त्यामुळे जेवण आपण व्यवस्थित बनवा, असा तिने सल्ला दिला. त्यावरून समोरची स्पर्धक कलाकार देखील चांगली रागवली. तिनेदेखील मीरा जोशीवर आपला पारा काढला. आता या शोमध्ये वेगवेगळे वाद होत असल्याचे समोर येत आहे.
या शोमध्ये भुमाता ब्रिगेड च्या अध्यक्षा तृप्ती देसाई या सहभागी झाल्या आहेत. त्यामुळे आता या शोमध्ये निश्चितच मोठा काहीतरी वाद होईल, अशी शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. आता बिग बॉस या तिसऱ्या पर्वामध्ये दिवंगत ज्येष्ठ अभिनेते दादा कोंडके यांचा नातू देखील सहभागी झाला आहे, त्याचे नाव अक्षय वाघमारे असे आहे.
अक्षय वाघमारे यांनी आधी अनेक चित्रपट व मालिकामध्ये देखील काम केले आहे. अक्षय वाघमारे याने आधी मुंबई-पुणे-मुंबई, फत्तेशिकास्त, युथ या सारख्या चित्रपटात काम केले आहे. अक्षय याची आजी ही दादा कोंडके यांची बहीण होती. त्यामुळे या नात्याने तो दादा कोंडके यांचा नातू लागतो. अक्षय वाघमारे याने अरूण गवळी यांच्या मुलीसोबत लग्न केले आहे.