सुंदरतेच्या बाबतीत हुबेहूब आईची कार्बन कॉपी दिसते ऐश्वर्या, पहा तिच्या आईचे फोटो…

जगातील सर्वात सुंदर महिलांपैकी एक म्हणून ऐश्वर्याचा सगळीकडेच नावलौकिक आहे. संपूर्ण जगात तिचे करोडो चाहते आहेत. तिने वयाच्या १६-१७ व्या वर्षीच, मॉडेलिंग सुरु केली. तेव्हाच तिला चांगलीच लोकप्रियता मिळाला होती. मिस इंडिया स्पर्धेमध्ये सहभागी होण्यापूर्वीपासूनच, जगातील सर्वात सुंदर स्त्री म्हणून, ऐश्वर्याने ख्याती कमावली होती.
तिचे सुंदर असे डोळे, कोणालाही मंत्रमुग्ध करतात. तिचे हास्य आणि तिचे रूप, कोणालाही वेड लावेल असं आहे. तिचे हे सुंदर रूप, देखणी काया कोणाकडून मिळाली असं नेहमीच विचारलं जात. मात्र तिचे हे सुंदर रुप, तिला तिच्या आईकडूनच मिळाले आहे. ऐश्वर्याची आई देखील, तिच्या इतकीच सुंदर आहे.
मुलांना मिळणारे रूप., त्यांचे व्यक्तित्व हे त्यांच्या आई-वडिलांचीच देणं असते हे, पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. काही दिवसांपासून एक फोटो, सोशल मीडियावर जबरदस्त वायरल होत आहे. ऐश्वर्या सारखीच दिसणारी हि सुंदरी कोण, असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. तर हा फोटो अजून कोणाचा नसून, तो फोटो खुद्द ऐश्वर्या च्या आईचा म्हणेजच वृंदा राय यांचा आहे.
वायरल होणाऱ्या फोटोंमध्ये, वृंदा यांच्या कुशीत ऐश बसलेली आहे. आपल्या आईच्या कुशीमध्ये बसून, ऐश समोर ठेवलेल्या केक कडे बघत आहे. एखाद्या साधारण लेकराप्रमाणे, हा केक कधी कापू आणि खाऊ असे भाव ऐशच्या चेहऱ्यावर त्यावेळी दिसत आहेत. मात्र, या फोटोमध्ये दिसणारी चटई ऐश बघून कोणीही म्हणेल कि ती हुबेहूब आपल्या आईसारखीच दिसते.
ऐश्वर्याने, काही दिवसांपूर्वी आपल्या पालकांचा कृष्णराज राय आणि आई वृंदा या दोघांचा तरुणपणाचा फोटो शेअर केला होता. तिच्या पालकांचा ५१ वा लग्नाचा वाढदिवस होता. त्यामुळे तिने आपल्या आईचा आणि वडिलांचा, सुरुवातीच्या काळातला फोटो शेअर केला आहे. यामध्ये वृंदा राय, म्हणजेच ऐश्वर्याच आहे असं भासत आहे. ‘माय गोल्डन एन्जल्स’ असं म्हणत ऐश्वर्याने हा फोटो शेअर केला आणि काहीच वेळात त्यावर लाईक्स चा अक्षरशः वर्षाव झाला.
ऐश्वर्याने मिस वर्ल्डचा खिताब तर जिंकलंच होता. मात्र, २०१४ मध्ये मिस वर्ल्डच्या स्पर्धेच्या वेळी, जगातील सर्वात सक्सेसफुल मिस वर्ल्ड म्हणून देखील गौरवान्वित करण्यात आल होत. २०१४ च्या या स्पर्धेच्या वेळी, ऐश्वर्याला गेस्ट म्हणून बोलावण्यात आलं होत. त्यावेळी, नवख्या मॉडेल्सला देखील लाजवेल असं तीच रूप होत.
वयाच्या २१व्य वर्षी मिस इंडिया बनलेल्या ऐश्वर्याचे सौंदर्य आजही अगदी तसेच आहे. मधल्या काळात, आराध्याला जन्म दिल्यांनतर ऐश्वर्याचे वजन चांगलेच वाढले होते. त्यावेळी, संपूर्ण जगभरात तिच्या वाढलेल्या वजनाचीच चर्चा होती. काहींनी तिच्यावर खूप टीका डॆहील केली होती. मात्र, काहीच दिवसांमध्ये ऐश्वर्याने आपला फिटनेस परत मिळवला आणि पुन्हा ती तेवढीच सुंदर दिसू लागली.
आजही ऐश्वर्याचा फिटनेस, एखाद्या नवख्या अभिनेत्रीला, मॉडेलला किंवा तरुण मुलीला लाजवेल असा आहे. तिला हे तिचे सौंदर्य आपल्या आईकडूनच मिळाले आहे. बॉलीवूड मध्ये तिने अनेक सिनेमामध्ये काम केल आहे. आणि आजही जेव्हा ती एखादा सिनेमा करते तेव्हा, केवळ तिला बघण्यासाठी चाहते थिएटर मध्ये गर्दी करतात.