अभिनयाला राम राम करत प्रीती झिंटा करतेय ‘हे’ काम, पाहणाऱ्यांना बसतोय धक्का..

बॉलीवूड मध्ये काम करावं, एक उत्तम अभिनेत्री बनाव. आपले लाखो चाहते असावे, प्रसिद्धीच्या शिखरावर आपण जावं असं, जवळपास प्रत्येक मुलीला एकदा तरी वाटतच. मात्र, काही मुलीचे तेच स्वप्न असते. आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी, वाटेल ते कष्ट घेण्यास त्यांची तैयारी असते.
त्यासाठी कोणी मॉडेलिंगचे प्रोफेशन निवडत तर कोणी मिस इंडिया आणि अशा अनेक सौंदर्य स्पर्धांमध्ये भाग देखील घेतात. त्यामधून काहींना संधी मिळते मात्र काहींना त्यासाठी, केवळ प्रतीक्षाच करावी लागते. संधी मिळाली तरीही, तीच सोनं करणे सर्वानाच जमत नाही. तर काहींचे नशीब त्यांना साथ देत नाही.
प्रसिद्ध अभिनेत्री, विद्या बालन जवळपास ७-८ वर्ष योग्य संधीची वाट बघत होती. सुरुवातीला काही सिनेमामध्ये तिची निवड देखील झाली होती. मात्र तिने सायन केलेल्या सिनेमांपैकी दोन सिनेमाचं चित्रीकरण थांबवावं लागलं, त्यामुळे ती सिनेमांसाठी लकी नाहीये असा समज करत तिला बाकी सिनेमामधून सुद्धा बाहेर काढण्यात आलं.
त्यानंतर कित्येक वेळा तिच्या पदरी निराशाच आली. सुंदर चेहरा आणि दमदार अभिनय असूनदेखील तिला अनेक वर्ष योग्य संधीसाठी संघर्ष करावा लागला. परिणिता सिनेमाने तिला ती संधी मिळाली आणि तिने त्याच सोन केलं. तर दुसरीकडे, प्रीती झिंटा आहे. कॉलेजमध्ये काही तरी वेगळं म्हणून तिने पर्क चोकोलेटच्या जाहिरातीमध्ये काम केलं आणि तीच नशीबच पालटलं.
त्या जाहिरातीमध्ये तिच्या गालावरची खळी आणि तिचे सौंदर्य इतके जास्त खुलून आले की, थेट मणिरत्नमच्या सिनेमामधून बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्याची संधी तिला मिळाली. दिल से सिनेमामधून प्रितीने बॉलीवूडमध्ये एंट्री केली आणि त्यानंतर कधीच माघे वळून नाही पाहिले. एका पाठोपाठ एक अनेक हिट आणि सुपरहिट सिनेमध्ये तिने काम केले.
त्याच काळात तिने आयपीएल मध्ये किंग्स ११ पंजाब संघ देखील खरेदी केला होता. त्यात देखील तिला चांगलेच यश मिळाले. आजही ती आपल्या टीमला समर्थपणे सांभाळत आहे. मात्र बऱ्याच वर्षांपासून ती कोणत्याच सिनेमामध्ये झळकली नाहीये. काही रियालिटी शोजमध्ये गेस्ट जज म्हणून अधून मधून ती दिसत असते. शिवाय ती सोशल मीडियावर देखील बऱ्यापैकी सक्रिय असते.
आता तिने आपला एक व्हिडियो शेअर केला आहे. यामध्ये तिने बॉलीवूडला आता रामराम ठोकल्याचं सांगितलं आहे. या व्हिडियोमध्ये ती एका शेतामध्ये वावरताना दिसत आहे. निरखून पाहिलं असता त्या सफरचंदच्या बागा असल्याचं दिसत आहे. यामध्ये फिरताना ती म्हणाली,’मी आता पूर्णपणे शेतकरी बनले आहे.
या उत्तम अशा वातावरणामध्ये मला अगदी ताज वाटत आहे. निसर्गाच्या सान्निध्यात मला अभूतपूर्व असा आनंद मिळत आहे. आजवर माझ्या आयुष्याने नेहमीच कलाटणी अनपेक्षित कलाटणी घेतली आहे. मी आयुष्यात सगळं काही मिळवलं. प्रसिद्धी, यश, पैसे पण या आनंदापुढे सर्व काहीच नगण्य आहे.
म्हणून आता मी नेहमीच येथे येत राहण्याचा निर्णय घेतला आहे.’ या सफरचंदाच्या बागा शिमला येथील असून त्या प्रीती झिंटा यांच्या कुटुंबाच्या आहेत. शिमलायेथे त्यांचे एक फार्महाउस आहे, आणि त्याच्या चहुबाजूने या बागा आहेत.