‘तारक मेहता’मध्ये नट्टू काका गेल्यामुळे आता ‘ही’ व्यक्ती घेणार नट्टू काकांची जागा, नाव वाचून चकित व्हाल…

‘तारक मेहता’मध्ये नट्टू काका गेल्यामुळे आता ‘ही’ व्यक्ती घेणार नट्टू काकांची जागा, नाव वाचून चकित व्हाल…

मनोरंजन

तारक मेहता का उलटा चष्मा ही आपल्या देशातील सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय मालिका आहे. माघील जवळपास पंधरा वर्षांपासून, या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. इतक्या वर्षांनंतर आजही या मालिकेची लोकप्रियता कायम आहे. केवळ आपल्याच देशात नाही तर, जगभरात या मालिकेचे असंख्य चाहते आहेत.

ही मालिका जितकी जास्त यशस्वी ठरली, तेवढेच जास्त या मालिकेचे पात्र देखील लोकप्रिय ठरले. जेठालाल, दयाबेन, बापूजी आणि टपु यांच्या अवती-भोवती या मालिकेचे कथानक असते. मात्र असे असले तरीही, मालिकेतील इतर पात्रांना देखील चांगलीच लोकप्रियता मिळाली. तारक मेहता, भिडे गुरुजी, भिडे भाभी, अंजली भाभी, बबिता, अय्यर इ सर्वच पात्रांना देखील भरगोस लोकप्रियता या मालिकेने मिळवून दिली.

त्याचबरोबर, जेठालालच्या दुकानातील पात्र म्हणेजच, नट्टू काका आणि बग्गा या पात्रांना देखील चांगलीच लोकप्रियता मिळाली होती. जेठालालचे दुकान दाखवले की, नट्टू काका शिवाय ते अपूर्णच वाटते. माघील बऱ्याच काळापासून, नट्टू काका मालिकेमध्ये दिसत नव्हते. नट्टू काकाची भूमिका साकारणारे घनश्याम नायक यांचा दीर्घ आ’जारानंतर नि’धन झाले.

त्यांचा नि’धनामुळे संपूर्ण टेलिव्हिजन इंडस्ट्रीवर दुःखाचे सावट पसरलेले आहे. संपूर्ण मनोरंजन सृष्टीमधून त्यांच्या नि’धनावर शोक व्यक्त केला जात आहे. तारक मेहताच्या मालिकेमध्ये त्यांच्या जाण्यामुळे कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. मात्र असे असले तरीही, शो मस्ट गो ऑन. अर्थात काम तर केलेच पाहिजेच ना. म्हणून आता नट्टू काकांच्या जागी दुसऱ्या कलाकाराची निवड शोच्या मेकर्स कडून करण्यात आली आहे.

नट्टू काका हे पात्र मालिकेच्या अविभाज्य घटकांपैकी एक समजले जाते. म्हणून इतर कोणी त्यांची जागा घेऊच शकत नाही, हे सत्य आहे. आणि त्यामुळे आता, नट्टू काकांच्या जागी बग्गाची मैत्रीण ‘बावरी’ जेठालालचे दुकान सांभाळणार असल्याचे बघायला मिळणार आहे. बावरी यापूर्वी देखील मालिकेमध्ये झळकली होती.

बावरी, म्हणजेच नट्टू काकाचा पुतण्या, बग्गाची खास मैत्रीण म्हणून मालिकेमध्ये झळकली होती. आता हीच बावरी, प्रामाणिक आणि विश्वासू नट्टू काकांच्या जागी, जेठालालचे गडा इलेकट्रोनिक्स सांभाळताना बघायला मिळणार आहे. ‘नट्टू काका हे पात्र, आमच्या सर्वांच्याच खूप जवळचे होते. त्यांच्या जागी इतर कोणत्या पुरुष कलाकाराचा आम्ही विचार देखील करू शकत नाही.

आणि चाहते देखील त्या कलाकाराला स्वीकारतीलच, याची शाश्वती नाही. म्हणून आम्ही त्यांच्या जागी, बावरीच्या पात्राचा विचार करत आहोत. अद्याप त्याबद्दल, फायनल निर्णय झाला नाहीये. मात्र, कथानकांमध्ये पुन्हा एकदा बावरीची एंट्री होऊन ती, गडा लेकट्रोनिक्स सांभाळताना दिसू शकते,’ असं शोच्या मेकर्सने एका मुलाखतीदरम्यान सांगितले आहे. तरीही नट्टू काकांच्या जागी, बहिरीला चाहते स्वीकारतील का, हे वेळच ठरवेल.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *