‘आई कुठे ..’ अरुंधतीचा आधार बनणार कॉलेजमित्र ! हिंदी मालिकेतील ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता साकारणार महत्वाची भूमिका…

मनोरंजन
मालिकांमध्ये कधीही काहीही होऊ शकते. मे’लेला माणूस अचानक जि’वंत होतो, किंवा त्यांची प्ला’स्टिक स’र्जरी होते. कधीकधी अशिक्षित महिला अचानकच पूर्ण शिक्षण घेऊन डॉक्टर किंवा प्रोफेसर बनते. तर, कधी आहे वय कमी असताना देखील अचानक कोणीतरी पो’लिस ऑफिसरसुद्धा बनते.
साधारण आणि घरगुती सुरू केलेला व्यवसाय, काहीच महिन्यात मोठा होतो आणि करोडोंचा व्यापार सुरू होतो. अशा तर्कहीन बाबी अनेक वेळा, मालिकांमध्ये दाखवल्या जातात. पण प्रेक्षक देखील त्याचा आनंद घेतात. त्यामुळे मेकर्स असे अनेक ध’क्कादायक गोष्टी, रोमांच वळणाच्या नावाखाली मालिकांमध्ये दाखवतच राहतात. अगदी काहीच मालिका असतात, ज्या वास्तवास धरून चालतात.
अशा मालिकादेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतात. मात्र या मालिका वास्तवाशी दूर, केवळ रंजक वळण दाखवायचे म्हणून कधीकधी कथानकामध्ये काहीही दाखवले जाते. मात्र आजकाल अशा गोष्टींना चांगले ट्रो’ल देखील केले जाते. अशा मालिकांवर टी’का करताना प्रेक्षक मागेपुढे बघत नाहीत. आई कुठे काय करते, या मालिकेवर सध्या जोरदार टी’का सुरू आहे.
मालिकेतील नायिका म्हणजेच आई, अर्थात अरुंधतीचा चांगुलपणा कोणालाही रुचण्यासारखा नाहीये. शिवाय मालिकेमध्ये, अरुंधती आपल्या जुन्या नवऱ्याच्या अर्थात अनिरुद्धच्या घरी, त्याच्या नवीन बायकोसोबत म्हणजेच संजना सोबत राहत असल्याचे दाखवले आहे. सर्वसाधारण आयुष्यामध्ये अशा गोष्टी कधीही होत नाहीत, किंवा एकाच घरात दोन्ही, सवत आणि नवरा आपल्या कुटुंबासोबत गुण्या गोविंदाने राहतात असेही होत नाही.
त्यामुळेदेखील या मालिकेवर चांगलीच टी’का होत आहे. असे असले तरीही मालिकेचा टीआरपी मात्र कायमच उच्चांकावर आहे. सध्या मालिकेचे कथानक काहीसे वेगळ्या वळणावर आहे. मालिकेमध्ये देशमुख कुटुंबाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अरुंधतीने केलेल्या एका चुकीमुळे, देशमुख कुटुंबावर आ’र्थिक संक’ट उभारले आहे.
आणि आता तिला याच आर्थिक सं’कटातून बाहेर काढण्यासाठी मालिकेमध्ये नवीन पात्राची एन्ट्री होणार आहे. मालिकेच्या सुरुवातीपासूनच अरुंधतीच्या एका कॉलेज मित्राची चर्चा झाली होती. मालिकेमध्ये एक-दोन वेळा त्याच्याबद्दल उल्लेख देखील करण्यात आला होता. आता हाच कॉलेज मित्र अरुंधतीला आ’र्थिक सं’कटातून बाहेर काढण्यासाठी तिच्या आयुष्यात एंट्री घेणार आहे.
तिच्या आयुष्यातील या महत्वपूर्ण भूमिकेमध्ये,, हिंदी मालिकेतील प्रसिद्ध अभिनेता समीर धर्माधिकारी झळकणार आहे. केवळ हिंदी मालिकाच नाही तर, अनेक हिंदी सिनेमांमध्ये देखील समीर धर्माधिकारी यांनी काम केले आहे. अनेक मराठी मालिकांमध्येसुद्धा समीर यांनी काम केले आहे. मराठी सिनेसृष्टीमध्ये, समीर धर्माधिकारी यांचा मोठा चाहतावर्ग आहे.
‘झाशी की राणी लक्ष्मीबाई,’ या हिंदी मालिकेमध्ये देखील समीर धर्माधिकारी झळकले होते. शिवाय, ‘प्रेम रतन धन पायो,’ या राजश्री प्रॉडक्शनच्या सिनेमांमध्ये सुद्धा समीर धर्माधिकारी यांनी काम केले होते. कलर्स वाहिनीच्या ‘चक्रवर्तीन सम्राट अशोका’ या मालिकेमध्ये त्यांनी राजा बिंदुसारची भूमिका साकारली होती. त्यावेळी देखील त्यांच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक करण्यात आले होते.
‘महाभारत’ या मालिकेमध्ये, त्यांनी शंतनू राजाची भूमिका साकारली होती. शिवाय ‘छत्रपती शिवाजी महाराज’ यांच्या जीवनचरित्रावर आधारित ‘फत्तेशिकस्त’ आणि ‘फर्जंद’ या सिनेमामध्ये देखील ते झळकले होते. आता हेच समीर धर्माधिकारी, आई कुठे काय करते मध्ये अरुंधतीच्या कॉलेज मित्राच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यामुळे चाहत्यांमध्ये चांगलीच उत्सुकता बघायला मिळत आहे.